esakal | ब्लीच करताय, तर 'या' गोष्टींची काळजी घ्या

बोलून बातमी शोधा

ब्लीच करताय, तर 'या' गोष्टींची काळजी घ्या
ब्लीच करताय, तर 'या' गोष्टींची काळजी घ्या
sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : चेहऱ्यावर असलेले केस कव्हर करण्यासाठी बहुतेक मुली ब्लीच करतात. त्याने केसांचा रंग लाईट होतो व चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. मात्र त्वचेवर ब्लीचचा वापर करण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणे खूप जरुरीचे आहे. अनेक जणांमध्ये ब्लीच लावल्याने त्वचेशी संबंधित समस्या दिसू लागतात. त्यामुळे ब्लीचचा उपयोग चेहऱ्यावर कसा करावा हे जाणून घेणे आवश्यक आहे. तर चला...

माईल्ड ब्लीच क्रिमचा उपयोग करा

बाजारात ब्लीच क्रिम वेगवेगळ्या ब्रँड्समध्ये मिळून जाईल. मात्र याचा अर्थ नाही की ती सर्व तुमच्या त्वचेसाठी सुरक्षित आहेत. अनेक ब्लीच क्रिममध्ये सोडियम हायपोक्लोराइट असते. त्यामुळे रसायनिक रिएक्शन होऊ शकते आणि त्वचा फाटू शकते. जर तुम्ही महिन्यातून एकदाच ब्लीचचा उपयोग करत असाल तर माईल्ड ब्लीच क्रिम लावा. हे करताना त्यात किती प्रमाणात अॅक्टिव्हेटर मिक्स करायचे आहे. स्ट्राँग ब्लीच क्रिमचा वापर करण्यापासून दूर राहा. त्याने तुमच्या त्वचेला नुकसान होऊ शकते.

चेहऱ्यावर लावण्यापूर्वी टेस्ट करा

अनेकदा तरुणी ब्लीच डायरेक्ट चेहऱ्यावर लावतात. मात्र हे चुकीचे आहे. यामुळे तुम्हाला अॅलर्जी होऊ शकते. अशा स्थितीत केव्हाही ब्लीच क्रिम तयार करत असाल तेव्हा ती चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर तुमच्या हातावर पॅच टेस्ट करा. काही वेळेनंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसेल तर तेव्हाच चेहऱ्यावर लावा. विना टेस्ट ब्लीच लावल्याने अनेकदा त्वचेवर फोड किंवा त्वचा लाल होते.

संवेदनशील आणि कोरड्या त्वचेसाठी ब्लीच नको

जर तुमची त्वचा कोरडी आणि संवेदनशील आहे, तर ब्लीच करु नका. कारण याने अनेकदा अॅलर्जी होण्याची शक्यता असते. दुसरीकडे संवेदनशील त्वचेवर अनेकदा ब्लीच लावल्याने जळजळ होते. त्यामुळे तुम्ही ब्लीच न करणे हा सर्वोत्तम उपाय राहिल.

महिन्यातून एकदाच कार ब्लीच

जे लोक आठवड्याला किंवा १५ दिवसांनी एकदा ब्लीच करतात त्यांनी सावध राहणे आवश्यक आहे. ती तुमच्या त्वचेचा नैसर्गिक उजळपणा काढून घेते. त्याचबरोबर अनेक समस्याही सुरु होऊ शकतात. अनेक महिलांना वाटते, की ब्लीच केल्याने आपण गोरे होऊ, मात्र अस काही नाही.

ब्लीच केल्यानंतर उन्हात जाऊ नका

ब्लीच लावल्यानंतर बाहेर जाण्याचे टाळा. उन्हात सूर्य किरणे त्वचेवर पडल्यानंतर अॅलर्जी होण्याचा धोका असतो किंवा त्वचा जळण्याची. ब्लीच केल्यानंतर कमीत-कमी दोन तासानंतरच बाहेर पडा. तसेच दोन तासानंतर चेहऱ्यावर सनक्रिम लावा. ब्लीचनंतर कोणत्याही सौंदर्यप्रसाधनांचा वापर करु नका.