Look Back 2020: महिलांनो आता तुमच्या सौंदर्यावरून हटणार नाही नजर: बघा २०२० मधील टॉप मेकअप ट्रेंड्स

स्नेहल कदम
Friday, 25 December 2020

फक्त हलकसं काजळ किंवा लिपस्टिक मेकमध्ये वापरलं तरी चेहरा खुलून दिसतो. मग विचार करा, आयलायनर, आयशेड, ब्लशर यांचा नियमित मेकअपसाठी उपयोग केला तर? आपल्याकडे जो बघेल त्याची नजर सौंदर्यावरून हटणार नाही.  

कोल्हापूर : मेकअप नसेल तर आपले सौंदर्य अपूर्ण राहतेच असे नाही. मात्र मेकअप असेल तर ते अधिकच खुलून दिसते. मेकअप आणि सौंदर्य हे आगळं वेगळं सूत्र आहे. चेहऱ्यावरील सौंदर्यात थोडसं उठावदार दिसावं म्हणून कधीतरी फक्त हलकसं काजळ किंवा लिपस्टिक मेकमध्ये वापरलं तरी चेहरा खुलून दिसतो. मग विचार करा, आयलायनर, आयशेड, ब्लशर यांचा नियमित मेकअपसाठी उपयोग केला तर? आपल्याकडे जो बघेल त्याची नजर सौंदर्यावरून हटणार नाही.  

अनेकांना कोरोनामुळे हे वर्ष काही खास गेलं नसेलही मात्र फॅशन आणि सौंदर्य (ब्युटी) या क्षेत्रांवर काही विषेश फरक पडला नसल्याचे चित्र दिसत आहे. या क्षेत्रावर काही फारसा परिणाम झाला नसला तरी बऱ्याच ठिकाणी काही प्रमाणात ट्रेंडमध्ये बदल झालेला पाहायला मिळतोय. या सरत्या वर्षी महिला वर्गाच्या पसंतीस उतरले. हे काही विषेश ट्रेंड आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

निऑन आयलायनर :

Neon Liner: Would You Dare To Try This Trend? | Hauterfly

यावर्षी ब्लॅक कलरच्या आयलायनरसह निऑन आयलायनरचा वापर जास्त झाला. हे आयलायनर बोल्ड असते यामुळे डोळ्यांचे सौंदर्य उठून दिसते.

ग्लॉसी लिप्स :

Glossy Lip Gloss - Noelia | Glossy lips makeup, Natural lips, Glossier lip  gloss

90 च्या दशकात हा ट्रेंड अधिक प्रमाणात प्रसिद्ध झाला होता. परंतु आता नव्याने या ट्रेंडने मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. स्मार्ट आणि सोबर, नॅच्युरल लूकसाठी किंवा वर्क फ्रॉम होम या दोन्हीसाठी हा बेस्ट पर्याय आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे यासाठी जास्त वेळ जात नाही. अतिशय कमी वेळात तुम्ही हे करू शकता.

ब्रॉड आयब्रोज :

It's time to talk about eyebrows! Everything that you need to know about  your brows! | aer Blowdry Bar

सुरुवातीस थ्रेडिंग करत असताना छोट्या आयब्रोज करण्यावर भर दिला जात असे मात्र आता त्या ट्रेंड पेक्षा युवती मोठ्या आयब्रोजना जास्त पसंती दर्शवत आहेत. खास आयब्रोज जेलचा वापर करून यांना सेट करता येते. 

गिल्टर मेक :

Classic Brown Glitter Eye Makeup Tutorial - YouTube

पार्टी मेकअपसाठी याचा उपयोग होतो. फक्त आयशॅडोसाठीच नाही तर ब्लशर आणि लिपस्टिक लावण्यासाठीही याचा उपयोग केला जातो. 

इनर आई कॉर्नर पॉप :

Eye Makeup Ideas: Inner Corner Highlight

डोळ्यांना काजळ लावत असताना डोळ्यांच्या कडांना स्ट्रोक करण्यासाठी युवती याचा उपयोग करतात. यासाठी विषेश पसंतीही दर्शवली आहे. स्मोकि आईज किंवा विंग्ड आयलायनरसाठी याचा उपयोग केला जातो. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Look Back 2020 know about top makeup trends in 2020