Love Story : उंचीने 2 फुट लहान आहे जोडीदार! लग्नानंतर झाला गिनीज बूकमध्ये रेकॉर्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Love Story

Love Story : उंचीने 2 फुट लहान आहे जोडीदार! लग्नानंतर झाला गिनीज बूकमध्ये रेकॉर्ड

Love Story : ज्या जोडप्यामध्ये पती 109.3 सेमी (3 फूट 7 इंच) उंच आहे आणि पत्नी 166.1 सेमी (5 फूट 5.4 इंच) उंच आहे त्यांच्या उंचीतील सर्वात मोठ्या फरकासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. दोघांचे प्रेम कसे फुलले? लेखात याबद्दल शिकाल. प्रेम आंधळं असतं हे काही खोटं नाही; आणि बहुदा ते असंच असावही. आपला जोडीदार दिसायला कसा आहे यापेक्षा तो मनाने कसा आहे हे जास्त महत्वाचं. ज्या व्यक्तीसाठी आपल्याला फिलिंग्स वाटतात तो आपला लाइफपार्टनर. मग तो दिसायला कसा आहे याने काहीही फरक पडत नाही.

हेही वाचा: Heart Care : फिटनेस प्रेमींनो सावधान! प्री वर्कआऊट सप्लीमेंट ठरू शकतात हार्ट अ‍ॅटॅकच कारणं

या बोलायच्या गोष्टी खऱ्या करून दाखवल्या आहेत

या जगप्रसिद्ध जोडप्याने. बहुदा जे कोण त्यांना पहिल्यांदा बघते त्यांचा विश्वासच बसंत नाही की ते नवरा बायको आहेत. कारण नवऱ्याची उंची खूप कमी आणि बायकोची उंची खूप जास्त आहे. या कपलने लव्ह मॅरेज केलेलं आणि गंमत म्हणजे लग्नानंतर या कपलने कमाल उंचीच्या फरकाचा विश्वविक्रमही केला.

हेही वाचा: Heart Health : निरोगी हृदयासाठी कसा असावा आहार ?

कोण आहे हे जोडपं!

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, या जोडप्याचे नाव जेम्स लस्टेड आणि क्लो सामंथा लस्टेड आहे, ज्यांनी 2016 मध्ये लग्न केले होते. दोघेही नॉर्थ वेल्स (यूके) मध्ये राहतात आणि दोघांच गाव एकच आहे. जेम्स 33 वर्षांचा आहे जो एक अभिनेता आणि प्रेझेंटर आहे आणि त्याची पत्नी क्लो एक शिक्षिका आहे आणि ती 29 वर्षांची आहे. 2 जून 2021 रोजी या दोघांनी विवाहित जोडप्याच्या उंचीतील सर्वाधिक फरकाचा विक्रम केला. जेम्स 109.3 सेमी (3 फूट 7 इंच) उंच आहे आणि त्याची पत्नी क्लो 166.1 सेमी (5 फूट 5.4 इंच) उंच आहे. दोघांमध्ये 56.8 सेमी म्हणजेच सुमारे 2 फूट (1 फूट, 10 इंच) फरक आहे.

हेही वाचा: Kashid Beach : एका रोमांचक अशा शांत ठिकाणी फिरायला जायची इच्छा आहे? या ठिकाणी प्लॅन करू शकता

या आजाराने ग्रस्त आहे जेम्स

मिळालेल्या माहितीनुसार, जेम्स बुटकेपणाच्या एका दुर्मिळ प्रकारांपैकी एका, डायस्ट्रोफिक डिसप्लेसिया या आजाराने ग्रस्त आहे, हा आजार अनुवांशिक आहे. याने हाडे आणि मज्जासंस्थेची वाढ थांबते. त्याच्या बुटकेपणामुळे, जेम्सला वाटलेल की तो कधीही लग्न करणार नाही, पण 2012 मध्ये जेम्स क्लोला भेटला आणि त्याने आपला विचार बदलला.

हेही वाचा: Food Recipe : फक्त गुजरात्यांची मोनोपॉली नाही तर घरच्या घरी बनवा खमंग चटपटीत ढोकळा

अशी होती प्रेमकथा

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डशी बोलताना क्लो म्हणाली होती, "माझी पसंती सुरुवातीपासूनच उंच लोकांना असायची. पण जेम्सला भेटल्यावर मी त्याच्या प्रेमात पडले. मला माहीत होतं की लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलतील. पण त्यांच्याकडे होतं. माझ्यावर प्रभाव नाही. क्लो पुढे म्हणाली, "आम्ही दोघे एका क्लबमध्ये भेटलो. मी त्यावेळी अभ्यास करत होतो, 2013 मध्ये एकमेकांना सात महिने डेट केल्यानंतर जेम्स मला एका तलावाजवळ फिरायला घेऊन गेला आणि त्याने मला गुडघ्यावर बसून प्रपोज केल. ही भावना माझ्यासाठी खूप चांगली होती. मी त्याला हो म्हणाले आणि लग्न केले. आज आपण दोघे खूप आनंदी आहोत.

हेही वाचा: Health News : मानसिक विकारांबाबत लोकांना हवे समुपदेशन

जेम्स सर्वकाही करतो

जेम्सने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, "3 फूट 7 असणे कधीकधी कठीण असते परंतु पण इतरांप्रमाणे मीही बरेच कामं करू शकतो. माझी 4 वर्षाची मुलगी नक्कीच मला एक बुटका म्हणून नाही तर कलाकार म्हणून बघेल याची मला खात्री आहे. नॉर्थ वेल्समधील लॅंडुडनो या समुद्रकिनारी असलेल्या शहरात सणासुदीच्या काळात 'ब्युटी अँड द बीस्ट' मधील बॉब हे कॅरेक्टर प्ले करणार आहे.

टॅग्स :lifestylelove storyLover