Maharashtrian Look : खणाच्या साडीवर चुकूनही परिधान करु नका असे दागिने... प्राजक्ताकडून घ्या टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtrian Look

Maharashtrian Look : खणाच्या साडीवर चुकूनही परिधान करु नका असे दागिने... प्राजक्ताकडून घ्या टिप्स

Maharashtrian Look : प्राजक्ता माळी आपल्या लूकसाठी नेहमीच चर्चेत असते, सध्या तीचे चर्चेत असण्याचे आणखीन एक कारण म्हणजे तीने सुरु केलेला ज्वेलरी ब्रॅंड, प्राजक्ताराज. महाराष्ट्राच्या पारंपारीक दागिन्यांवर लक्ष केद्रिंत करत तिने हा ब्रॅंड एस्टॅब्लिश केला आहे. तिने आपल्या प्रत्येका कलेक्शनला एक नाव दिलेले आहे.

आता सण आणि लगीनसराई दोघेही खूप पीकवर आहे. अशात काठा पदारची साडी सगळेच नेसतात तुम्ही खणाची साडी निवडा अन् हे करतांना आपला पारंपरिक लुक कॉमन होणार नाही याची काळजी घ्या.. आता तुम्ही म्हणाल असं कसं करणार? सोप्पं आहे, याचं उत्तर प्राजक्ता माळीच्या म्हाळसा या कलेक्शनने दिलं आहे, हे सर्व दागिने पारंपरिक महाराष्ट्रीयन असले तरी त्यांचा लूक ऑक्सिडाईज किंवा सिल्व्हर आहेत.

सध्या तशीही ऑक्सिडाईज ज्वेलरीची फॅशन सुरूच आहे अशात आपल्या पारंपरिक लुकमध्ये असा हटके बदल करणे भारी दिसेल आणि सगळीकडे फक्त तुमचीच चर्चा असेल. फक्त दागिने निवडतांना कंफ्यूज होवू नका.

नक्की कोणते दागिने घ्यावे विकत?

१. ठुशी :

Maharashtrian Look

Maharashtrian Look

मराठमोळा साज म्हटला की पहिला दागिना डोळ्यासमोर येतो तो म्हणजे ठुशी, दिसायला खूप सुंदर शिवाय गळ्याशी खूप सुंदर बसते आणि तिची वीण मानेवर खूप सुंदरही दिसते.

२. बोरमाळ

Maharashtrian Look

Maharashtrian Look

बोरमाळ सध्या प्रत्येकाकडे बघायला मिळत नाही चुकून तुम्ही बोरमाळ म्हणून काही इमिटेशन दागिन्यांना बोरमाळ समजत असाल तर ती चूक करु नका, बोरमाळ ही शक्यतोवर दोन पदरी असते आणि त्याला कोणतेही लाॅकेट नसते.

३. नथ

Maharashtrian Look

Maharashtrian Look

पारंपरिक दागिने आणि नथ नाही.. अशक्य आहे.. आपल्या लुकला नथी इतकं परफेक्ट कोणीही करु शकत नाही.

४. पैंजण

Maharashtrian Look

Maharashtrian Look

नखंशिकांत नटलेल्या तुम्ही अन् चालतांना घुंगरांचा येणारा बारीक आवाज.. किती छान वाटत नाही? सध्या बाजारात जाड बॉर्डर असलेले सुंदर पैंजण दिसता आहे, नक्कीच हे ट्राय केले पाहिजे.

५. तोडे

Maharashtrian Look

Maharashtrian Look

आपल्या साडीला मॅचिंग अशा बांगड्या आणि सुरुवातीला तोडे, याहून सुंदर काही असूच शकत नाही. आपले तोडे निवडतांना ते आपल्या साडीत अडकणार नाहीत याची काळजी घ्या.