
Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला महादेवांना प्रसन्न करायला हेच नेल आर्ट करा!
आपल्या व्यक्तिमत्त्वात आपले सुंदर हात खूप मोठी भूमिका बजावतात. जेव्हा आपण कोणाशी बोलतो तेव्हा त्यांची नजर नक्कीच आपल्या हातांकडे जाते. आणि हातांचे सौंदर्य आपल्या नखांवर अवलंबून असते. ज्याची स्वच्छता आणि देखभाल करणे खूप महत्वाचे आहे. केवळ स्वच्छताच नाही तर नखांना सुंदर नेल आर्टने सजवणेही आवश्यक आहे.
सध्या नखांवर वेगवेगळे नेल आर्ट करणे हा सध्याचा ट्रेंड आहे. उद्या महाशिवरात्री आहे. त्यामुळे तूम्हीही भगवान शंकरांचे भक्त असाल तर तूमच्यासाठी या खास नेल आर्ट डिझाईन तूम्ही करू शकता.
भगवान शंकरांना पुजणारे अनेक भक्त आहेत. यात तरूणांची संख्या लक्षणिय आहे. शंकरांसारखी हेअरस्टाईल, गळ्यात हातात रूद्राक्ष, कपाळावर भस्म लावणारे तरूण महाशिवरात्रीला हमखास दिसतील. मग यात तरूणीही मागे राहता कामा नयेत. त्यामुळेच तरूणींनीही असे नेल आर्ट करून भगवान शंकराची भक्ती जागृत करावी.

नेल आर्ट करण्यापूर्वी नखे स्वच्छ करणे आवश्यक आहे. सर्व प्रथम चांगल्या नेल पेंट रिमूव्हरने नखे स्वच्छ करा आणि नखे काही वेळ कोमट पाण्यात ठेवा जेणेकरून नखे व्यवस्थित स्वच्छ होतील.

स्वच्छ केल्यानंतर नखे ट्रिम करा. कोणतीही नेल आर्ट तेव्हाच चांगली दिसते जेव्हा नखांचा आकार चांगला आणि समान असतो.

भगवान शंकरांचे अस्त्र असलेले त्रिशूळ, डमरू, रूद्राक्ष यांची डिझाईन नखांवर अधिक खूलुन दिसेल. तर, त्यांचे वाहण असलेला नंदी आणि भस्माची ३ बोटे यानेही नखांची शोभा वाढवता येईल.
