Makar Sankranti 2021:  मकर संक्रांतीच्या दिवशी करु नका 8 कामं

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 14 January 2021

सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये जातो, तेव्हा मकर संक्रांती होते.

नवी दिल्ली- सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये जातो, तेव्हा मकर संक्रांती होते. यावेळी सूर्य उत्तरायण असतो. मकर संक्रांतीने शुभ कार्यांची सुरुवात केली जाते. या दिवशी काही कामं शुभ मानली गेली आहेत, तर काही अशुभ. जाणून घेऊया या दिवशी कोणते काम करु नये... 

-काही लोक सकाळी उठून चहा आणि स्नॅक्स खातात, पण आजच्या दिवशी असं करु नका. या दिवशी अंघोळ न करता कोणतेही अन्न ग्रहन करु नका. मान्यता आहे की, यादिवशी पवित्र नदीमध्ये जाऊन अंघोळ करायला हवं. ज्या लोकांना हे शक्य नाही, त्यांनी किमान लवकर अंघोळ नक्की करा. 

Makar Sankranti 2021: मकर संक्रांत साजरी करण्यामागचं जाणून घ्या कारण

-मकर संक्रांती हा निसर्गासोबत साजरा करण्याचा सण आहे. यादिवशी झाड कापू नये किंवा फांदी छाटू नये. 

- मकर संक्रांती दिवशी दारू, सिगरेट, गुटका अशा वस्तूंपासून दूर रहा. या दिवळी मसालेदार अन्नही खाऊ नये. आजच्या दिवशी तीळ, गुळ, दाळ खिचडी खाणे शुभ मानलं जातं. तसेच या वस्तूंचे दानही केले पाहिजे

-सूर्य देवाची कृपा हवी असेल असेल तर सायंकाळी अन्नाचे सेवन करु नका. सूर्योद्य आणि सूर्यास्तावेळी पूजा-पाठ करा. 

-मकर संक्रांतीच्या दिवशी जर कोणी भिखारी, साधू किंवा वयस्कर व्यक्ती आपल्या घरी आला तर त्याला रिकाम्या हाती पाठवू नका. आपल्या क्षमतेनुसार त्यांना काही दान द्या.

Makar Sankranti 2021: संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची कपडे का घालतात?

- या दिवशी लसून, कांदा आणि मांसचे सेवन करु नका. जेवनामध्ये सात्विकतेचं पालन करा. 

-मकर संक्रांती प्रकृतीचा उत्सव आहे. त्यामुळे या दिवशी शेतीमधील कापणीचे कामं टाळायला हवीत.

- आजच्या दिवशी तुमच्या वाणीवर संयम ठेवा आणि राग व्यक्त करु नका. कोणाला काही वाईट बोलू नका आणि सगळ्यांशी प्रेमळतेने व्यवहार करा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Makar Sankranti 2021 things you should not do on this day