पपई पासून बनवा घरीच होममेड हेअर मास्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पपई पासून बनवा घरीच होममेड हेअर मास्क

पपई पासून बनवा घरीच होममेड हेअर मास्क

कोल्हापूर: केसांचे सौंदर्य (Beauty of Hair)आणि त्याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत अनेक युवती आणि महिला संवेदनशील असतात.आपले केस लांब, दाट आणि मुलायम असावेत असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु आजकालचे बदलते वातावरण, प्रदूषण आणि उन्हाची तीव्रता (Climate, pollution and heat intensity)यामुळे केस निर्जीव बनतात. अशावेळी आपल्या केसांना चमकदार बनवण्यासाठी काही घरगुती उपाय आपण करू शकतो.

Make a homemade hair mask from papaya tips marathi news

केस अधिक चमकदार होण्यासाठी आपण पपईचा उपयोग करू शकतो. पपई पासून केस चमकदार कसे होतात हे आपण याठिकाणी पाहू. पपई हे सर्वांनाच माहीत असणारे फळ आहे. आणि सर्वजण याचा स्वाद नक्कीच घेतलेला असावा. परंतु याच पपईचा वापर सौंदर्यासाठी सुद्धा होऊ शकतो. त्वचेला चमकदार बनवण्यापासून ते केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी पपईचा वापर होतो. या पासून तयार झालेले होममेड हेअर मास्क आपल्या निर्जीव झालेल्या केसामध्ये एक वेगळीच चमक आणते.

पपईचे केसासाठी फायदे

पपई केसांसाठी साठी अत्यंत उपयुक्त आहे. केस गळण्या पासून रोखण्यासाठी पपईचा चांगला उपयोग होतो. यामुळे केसांना नैसर्गिक वेगळीच चमक मिळते. पपई नैसर्गिक हेअर कंडिशनर सारखे काम करते, जे केसांच्या कंडिशन साठी अत्यंत उपयुक्त ठरते. आणि केसांचे सौंदर्य वाढते. यामध्ये काही घरगुती साहित्याचा वापर करून हेयर मास्क तयार केल्यास ते फायदेशीर ठरते. याच्या वापरामुळे केसात कोंड्याची समस्या कमी होते.

पपई बेसन आणि दही चा हेअर मास्क

यामध्ये आवश्यक प्रोटीन असतात. आपल्या केसांना मजबूत बनण्यासाठी मदत करतात. याच बरोबर पपई आणि बेसन हे आपल्या केसांना 1930 चमक देतात.

आवश्यक साहित्य

कापलेले पपई एक, कप बेसन, तीन चमचे दही.

तयार करण्याची पद्धत

सुरुवातीस पपई मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट तयार करा. पपईच्या पेस्टमध्ये दही आणि बेसन पीठ चांगल्या पद्धतीने मिक्स करा. आता याचा वापर केअर मास्क म्हणून करू शकता.

वापरावयाची पद्धत

केस चांगल्या पद्धतीने धुऊन घेऊन ते विभक्त करा. हेअर मास्कच्या सहाय्याने स्काल्प वर चांगल्या पद्धतीने मॉलिश करा. हेअर मास्क लावल्यानंतर ते अर्धा तास केसमध्ये ठेवा. केसांना शावर मास्क लावावा. अर्धा तासानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. पंधरा दिवसातून एकदा या पद्धतीचा आपण वापर करू शकतो. यामुळे केसांना एक वेगळी चमक येईल.

पपई आणि ऑलिव्ह ऑईल हेअर मास्क

ऑलिव्ह ऑईल केसांना पोषक घटक देते. त्यामुळे केस वाढण्यासाठी मदत होते. मजबूत आणि चमकदार केसांसाठी घरामध्येच आपण हेअर मास्क बनवण्यासाठी त्यामध्ये पपई मिक्स करू शकतो.

आवश्यक साहित्य

पपईचे पल्प चार चमचा

ऑलिव्ह ऑइल तेल दोन चमचे

बनवण्याची पद्धत

पपईचा पल्प एका बाऊलमध्ये घ्या आणि त्यामध्ये ऑलिव ऑइल मिक्स करा. या दोन्ही पासून तयार झालेली पेस्ट आपण हेअर मास्क म्हणून वापरू शकतो.

वापरायची पद्धत

आपल्या केसांना आणि स्काल्प ला हेअर मास्कच्या माध्यमातून मसाज करा. हेअर मास्क सुमारे एक तास केसावरती राहू द्या. या काळात केसावर शॉवर कैप लावा. एक तासानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. आठवड्यातून एक वेळा या हेअर मास्कचा वापर आपण करू शकतो. या हेअर मास्क मुळे आपल्या केसांची चमक वाढते.

Make a homemade hair mask from papaya tips marathi news

Web Title: Make A Homemade Hair Mask From Papaya Tips Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :lifestyle
go to top