
Long Shrug for Women : काय, भारीये ना किर्तीचा श्रग? तुम्ही बनवू शकतात अगदी फ्री
Long Shrug for Women : सध्या इंस्टाग्रामवर (Instagram) फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतल्या किर्तीच्या अर्थात समृद्धी केळकरच्या एका पोस्टची खूप चर्चा होते आहे, स्टार प्रवाह वरच्या नवीन डान्स रिअॅलिटी शोच्या प्रमोशनसाठी तिने हा फोटो शेअर केला, या फोटोत ती सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतल्या छोट्या लक्ष्मीसोबत दिसते आहे.
या फोटोमध्ये किर्तीच्या लॉन्ग श्रगची खूप चर्चा होते आहे, असे नाहीये की ही लॉन्ग श्रगची फॅशन नवीन आहे, पण आता परत एकदा याकडे तरुण पिढी आकर्षित झाली आहे. हे श्रग साधारणपणे बाजारात ७०० रुपयांपासून सुरू होतात आणि अर्थात हे काही तितकं बजेट फ्रेंडली नाही.
पण हेच लॉन्ग श्रग तुम्ही एकही रुपया खर्च न करता घरच्या घरी बनवू शकतात. यासाठी तुम्हाला लागेल ती फक्त आपल्या आईची एक छान फ्लोरल प्रिंट असलेली रोजच्या वापरातली साडी. अर्थात आईला आपल्या साडीसाठी पटवणं जरा अवघड आहे पण ठिके.
साडी निवडतांनाची काळजी :
- ही साडी निवडतांना प्लेन फ्लोरल प्रिंट असलेली साडी बघा.
- त्यावर टिकल्या, लेस किंवा एम्ब्रोडरी नसेल अशी साडी निवडा.
- साडीची पोत विरळ नको, कापड शिवणात फाटेल असं नको.
- जर तुम्हाला रोजच्या वापरासाठी नको असेल तर तुम्ही काठाची साडी पण घेऊ शकतात.
कसे बनवायचे लॉन्ग श्रग ?
आपल्याकडे असलेली साडी किंवा कोणतेही फॅब्रिक घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापून तुम्ही हे श्रग शिवू शकतात, शिवाय यात तुम्ही आपल्या आवडीनुसार डिझाईन ठेवू शकतात, फक्त तुमची उंची लहान असेल तर जास्त लांब श्रग घेऊ नका नाहीतर तुम्ही बुटके दिसाल.
लॉन्ग श्रग नक्की कशावर वापरावे?
- लॉन्ग श्रग हे सहसा, डेनिम जीन्स आणि टॉप किंवा क्रॉप टॉपवर छान दिसते, तुम्ही हे शॉर्ट कुर्तीवर सुद्धा वापरू शकतात.
- जर एखादा बोल्ड लूक ट्राय करायचा असेल तर शॉर्ट्स आणि टॅंग टॉपवर सुद्धा हे श्रग छान दिसतात.
- शिवाय रेग्युलर लॉन्ग स्कर्टवर सुद्धा हे श्रग सुंदर दिसतात.