esakal | Maruti Suzuki: CNG गाड्या 15 हजार रुपयांनी महागल्या
sakal

बोलून बातमी शोधा

Maruti-Suzuki-India

Maruti Suzuki: CNG गाड्या 15 हजार रुपयांनी महागल्या

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Maruti Suzuki CNG car : सतत वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी वाइट बातमी आहे. कारण, देशातील सर्वात मोठ्या ऑटो कंपनीनं सीएनजीवरील कारच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुजुकी इंडिया लिमिटेडने सोमवारपासून सीएनजीवरील गाड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. Swift आणि सर्व CNG व्हेरियंट्सच्या Maruti Suzuki कंपनीच्या गाड्याच्या किंमती आजपासून वाढणार आहे.

इनपूट कॉस्ट वाढल्यामुळे Maruti Suzuki ने आपल्या गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. CNG च्या गाड्यांची किंमत 15,000 रुपयांपर्यंत (दिल्ली एक्स शोरूम) वाढवण्यात आलेल्या आहेत. नवीन किंमती आजपासून लागू करण्यात आल्या आहेत. सीएनजीशिवाय इतरीही गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुढील काही दिवसांत मारुती कंपनीकडून याबाबतची अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार आहे.

हेही वाचा: सेल्फी जिवाशी; वीज कोसळून 11 जणांचा मृत्यू, 16 जखमी

मारुती कंपनीने गेल्या महिन्यात 21 जून रोजी गाड्यांच्या किंमती महागणार असल्याची पूर्वकल्पना दिली होती. मागील वर्षभरापासून विविध इनपूट साधनांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळेच कंपनी गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ करणार आहे, असं मारुतीकडून सांगण्यात आलं होतं. मारुती सुजुकीने एप्रिल महिन्यातही आपल्या काही गाड्यांच्या किंमतीमध्ये 34,000 रुपयांपर्यंत वाढ केली होती.

हेही वाचा: एकाचवेळी दोन व्हेरियंटचा संसर्ग; पाच दिवसांत रुग्णाचा मृत्यू

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दररोज वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सीएनजी गाड्यांकडे आकर्षित झाला आहे. लोकांमध्ये सीएनजीवरील गाड्यांची क्रेज वाढली आहे. लोकांची आवड पाहता Maruti Suzuki ची प्रसिद्ध Dzire कार लवकरच CNG मध्ये लाँच होऊ शकते. याची कंपनीकडून तयारीही सुरु आहे. मागील काही दिवसांपूर्वी Maruti Dzire CNG या गाडीचे टेस्टिंग झाली आहे.

loading image