मौनी रॉयच्या लग्नातल्या दागिन्यांमध्ये विशेष ते काय? तुम्हीही सहज वापरू शकता

मौनी रॉय आणि सूरज नांबियारच्या लग्नातले फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत
मौनी रॉयच्या लग्नातल्या दागिन्यांमध्ये विशेष ते काय? तुम्हीही सहज वापरू शकता

मौनी रॉय आणि सूरज नांबियारच्या लग्नातले फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. साऊथ इंडियन कपडे आणि दागिन्यांमध्ये (Jewellery) मौनी अतिशय सुंदर दिसते आहे. लोकांना मौनीचा हा लूक खूप आवडतो आहे. पण तिच्या कपडे किंवा लूकपेक्षा तिने घातलेल्या दागिन्यांची जास्त चर्चा आहे. तिचे दागिने अनेकींना आवडले आहेत. मौनीने लग्नात पांढरी-लाल कॉम्बिनेशन असलेली साडी नेसली होती. त्यावर तिने कुठल्याही इतर दागिन्यांपेक्षा टेंपल ज्वेलरी वापरली होती. अनेक मुलींना (Women) तिची ही ज्वेलरी खूप आवडली. सध्या अशाच टेंपल ज्वेलरीची फॅशन (Fashion)आहे. तुम्हीही हे दगिने सहज वापरू आणि खरेदी करू शकता.

मौनी रॉयच्या लग्नातल्या दागिन्यांमध्ये विशेष ते काय? तुम्हीही सहज वापरू शकता
Korean Fashion Trend : कोरियन मुली इतक्या फॅन्सी कशा राहतात, जाणून घ्या सिक्रेट
mauni roy wedding  jewellery
mauni roy wedding jewelleryesakal

टेंपल ज्वेलरी म्हणजे काय?

टेंपल ज्वेलरी हे पारंपरिक दागिने मानले जातात. या प्रकारच्या दागिन्यांचा संबंध दक्षिण भारतीय संस्कृतीशी आहे. दक्षिण भारतात, पारंपारिक कार्यांमध्ये अशा प्रकारचे दागिने वापरले जाता. या दागिन्यांमध्ये मूर्ती, मंदिरांच्या भिंती - खांबांवर दिसणारी शिल्पे आणि कोरीवकाम केलेले असते. सोनेरी रंगातील धार्मिक चिन्हे शुभ मानली जातात. टेंपल दागिन्यांमध्ये हार, बांगड्या, कानातले, अंगठ्या, चोकर नेकलेस आणि कमरपट्टा डिझाईन केलेला असतो. काळानुरूप या दागिन्यांमध्ये सुधारणा करत ज्वेलरी डिझायनर्सनी स्टोन, डायमंड आणि फिलीग्री वर्कसह वेगवेगळे मौल्यवान खडे वापरण्यास आता सुरुवात केली आहे.

मौनी रॉयच्या लग्नातल्या दागिन्यांमध्ये विशेष ते काय? तुम्हीही सहज वापरू शकता
Fashion Tips : स्टायलिश दिसायला आवडतं? मग हे आऊटफिट ट्राय करा
temple jewellery
temple jewellerygoogle

असा आहे इतिहास

टेंपल दागिन्यांची उत्पत्ती चोल आणि पांड्य राजघराण्यात झाली असे म्हटले जाते. सुरुवातीच्या काळात, या प्रकारचे दागिने दक्षिण भारतातील मंदिरांना दिलेल्या मौल्यवान धातूच्या देणग्यांपासून बनवले जात होते. तेव्हा देव आणि राजघराणीच असे दागिने वापरत असत. काही वर्षांनंतर मंदिरात भजन - नृत्य करणारे कलाकार या दागिन्यांचा वापर करू लागले. हे दागिने बनवताना ज्वेलर्सनी मंदिराची वास्तू, इतिहास आणि देवांच्या सौंदर्यातून प्रेरणा घेतली. कालांतराने, हे दागिने दक्षिण भारतीय मुली लग्नात वारसा म्हणून वापरू लागल्या.

मौनी रॉयच्या लग्नातल्या दागिन्यांमध्ये विशेष ते काय? तुम्हीही सहज वापरू शकता
महिलांनो, बेल्ट लूकने मिळेल तुमच्या व्यक्तीमत्वाला हटके लूक
दिपीका पादुकोणने लग्नानंतर देवदर्शाला जाताना हे दागिने घातले होते.
दिपीका पादुकोणने लग्नानंतर देवदर्शाला जाताना हे दागिने घातले होते. google

हे दागिने खास का?

मंदिरातील दागिन्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते. हे दागिने दक्षिण भारताचा वारसा मानला जातो. आजही, नववधूंना त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास दिवशी ही ज्वेलरी घालायची असते. टेंपल दागिन्यांमध्ये सर्वाधिक सोन्याचा वापर केला जातो. तसेच हे दागिने हिऱ्यांच्या दागिन्यांपेक्षा महाग असतात. अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नात अशाप्रकारचे दागिने वापरले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com