Money Plant: मनीप्लान्टची वाढ होत नाही आहे? 'या' टिप्स वापरा मनीप्लांट वाढेल जोमाने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Money Plant

Money Plant: मनीप्लान्टची वाढ होत नाही आहे? 'या' टिप्स वापरा मनीप्लांट वाढेल जोमाने

मनीप्लांन्ट हे झाडं वाढवायला अतिशय सोप असते, असं म्हणतात. पण तरीही काही जणांच्या बाबतीत हा अनुभव अगदीच उलटा असतो. त्यांच्या घरातील मनीप्लान्ट नीट वाढतच नाही. असं का होतं? आणि मनीप्लांन्टची वाढ होण्यासाठी काय कराव याची सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

मनीप्लांन्ट म्हणजे बहुतांश घरांमध्ये आढळून येणारा वेल आहे. बिअरच्या बाटलीमध्ये, कुंडीमध्ये, मातीच्या मडक्यामध्ये अगदी काही ठिकाणी तर चिनीमातीच्या बरण्यांमध्येही मनीप्लांन्ट लावलेला दिसून येतो.

बरं हा मनीप्लांन्ट अशा आहे की जो तुम्ही काही दिवस घरातही ठेवू शकता, काही वेळा अंगणातल्या सावलीतही ठेवू शकता आणि काही वेळा कडक उन्हात राहिला तरीही बिचारा जिवंत राहतो.

कोणतीही काळजी न घेताही मनीप्लांन्ट चांगला वाढतो, असं बरेच जण म्हणतात. पण खरंतर तसं नाहीये. ती एक सजीव वनस्पती आहे. त्यामुळे तिची थोडीफार काळजी घेणं, तिला काय हवं- नको ते बघणं हे आपल काम आहे

हेही वाचा: Unlucky Plants : चुकूनही घरात लावू नका ही झाडे; होईल नुकसान

आता बघू या घरातील मनीप्लांन्ट चांगला वाढावा म्हणून काय करावे ?

मनीप्लांन्ट बाबतीत एक मात्र अगदी खरं आहे की या झाडाची आपल्याला विशेष अशी काळजी घ्यावी लागत नाही. बाकीच्या झाडांना जसं ठराविक कालांतराने खतपाणी घालावं लागतं, माती बदलावी लागते तसं काहीही खास असं मनीप्लांन्टसाठी करावं लागत नाही. पण तरीही झाड- वेल म्हटलं की त्याचे काही नियम आणि पथ्यपाणी आलंच. तेवढं सांभाळलं की बघा मग तुमचाही मनीप्लांन्ट कसा जोमाने वाढतो ते.

चला तर मग आता बघू या मनीप्लांन्टची वाढ चांगली व्हावी, यासाठीच या चार खास टिप्स.

मनीप्लांन्टसाठी माती कशी निवडावी ?

मनीप्लांन्टच्या वेलींच्या चांगल्या वाढीसाठी माती, कोकोपीट आणि खत यांचं कॉम्बिनेशन परफेक्ट जमणं गरजेचं असतं. तुम्ही हँगिग पॉटमध्ये लावणार असाल किंवा मग जमिनीवर ठेवलेल्या कुंडीत लावणार असाल तरी मनीप्लान्टसाठी वजनाने हलकी माती असावी.अशी माती तयार करण्यासाठी अर्धा हिस्सा माती आणि उरलेल्या अर्ध्या भागात 50 टक्के खत आणि 50 टक्के कोकोपीट घ्या.

मनीप्लान्टसाठी कुंडी कशी निवडावी?

कुंडी निवडताना ती शक्यतो पसरट निवडावी. लहान तोंड असणाऱ्या कुंडीपेक्षा पसरट कुंडीतला मनीप्लांन्ट आणखी वेगात वाढतो. कारण लहान तोंड असणाऱ्या कुंडीत जेव्हा आपण पाणी टाकतो, तेव्हा त्याची काही पानं ओलीच राहतात, जास्त पाणी झाल्याने सडतात. ही समस्या पसरट कुंडीत जाणवत नाही. त्यामुळे त्याची वाढ चांगली होते.

हेही वाचा: परस बागेत फुलविली ५४ प्रकारची फळ-फुल झाडं!

मनीप्लांन्ट नेमका कसा ठेवावा ?

लटकता मनीप्लांन्ट अधिक चांगलाकाही वेली वर वाढवल्या तर अधिक चांगल्या वाढतात. पण मनीप्लांन्ट जर हँगिंग ठेवला तर तो अधिक चांगला वाढतो. त्यामुळे शक्य तो मनीप्लान्ट हँगिंग ठेवा किंवा मग तो बुशी म्हणजेच खूप बहरलेला करायचा असेल, तर त्याची वाढलेली पाने पुन्हा दुमडून कुंडीतल्या मातीत खोचून द्या.

मनीप्लांन्टला पाणी किती घालावं ?

मनीप्लांन्टला खूप जास्त पाण्याची गरज नसते. माती ओलसर राहील एवढंच पाणी त्याला पुरेसं आहे. खूप पाणी घातलं तर वेल सडतो किंवा मग पानं पिवळी पडतात. तसंच पाणी कमी झालं तर वेल सुकून जातो आणि त्याची चांगली वाढ होत नाही.

Web Title: Money Plant Money Plant Not Growing Use These Tips And Moneyplant Will Grow Rapidly

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :lifestylePlant