Mehndi Designer : लग्न समारंभ, सण, उत्सवात वाढली डिझाइनर मेहंदीची क्रेझ; ग्रामीण भागातही लोण

केवळ लग्न समारंभातच नाही तर वर्षभर सण, उत्सव आणि अनेक प्रसंगी मेहंदी लावण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे.
Wedding Ceremony Arabic Sticker Mehndi
Wedding Ceremony Arabic Sticker Mehndiesakal
Summary

पूर्वीपासूनच लग्नसमारंभात मेहंदी लावण्याची परंपरा होती. त्यानुसार वरवधूंच्या हातावर मेहंदी काढली जायची.

निपाणी : सर्वत्र लग्नसराईचा (Wedding Ceremony) हंगाम सुरू आहे. लग्नसमारंभात वधूवरांच्या हातावर डिझाइनर मेहंदी (Mehndi Designer) लावण्याची परंपरा बदलली आहे. त्याचे लोण आता ग्रामीण भागातही पोचले आहे. आता मेहंदी लावण्यासाठी व्यावसायिक कलाकाराला बोलावण्याची प्रथा रूढ झाली आहे.

या व्यवसायातून अनेक कलाकार उदरनिर्वाह करत आहेत. केवळ लग्न समारंभातच नाही तर वर्षभर सण, उत्सव आणि अनेक प्रसंगी मेहंदी लावण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे. हातावर काढलेल्या मेहंदीने सौंदर्यात अधिकच भर पडते. खास करून लग्न सराईत मेहंदी हमखास लावली जाते.

पूर्वीपासूनच लग्नसमारंभात मेहंदी लावण्याची परंपरा होती. त्यानुसार वरवधूंच्या हातावर मेहंदी काढली जायची. आता मात्र ट्रेंड पूर्णपणे बदलला आहे. नवीन युगात सोशल मीडियाच्या प्रभावामुळे बहुतांश लोक आधीच डिझाइन निवडून ठेवतात. त्यानुसार कलाकारांना हातावर मेहंदी काढावी लागते. स्टॅप्ड डिझाइनर, अरेबिकचा ट्रेंड महिलांमध्ये जास्त आहे, त्यामुळं महिला पारंपरिक मारवाडी दिसून येते.

Wedding Ceremony Arabic Sticker Mehndi
Maharashtra Politics : आमच्या घराण्यात विश्‍वासघात करण्याची परंपरा नाही; उदयनराजेंचा शरद पवारांवर थेट वार

आजकालच्या युवा वर्गात ग्राफिक्स मेहंदी, थ्रीडी स्टाइल मेहंदीचा ट्रेंड वाढला आहे. हाताने बनवलेल्या मेहंदीला मागणी जास्त असल्याचे कलाकार सांगतात. मेहंदीच्या पावडरमध्ये निलगिरी तेल आणि साखर आवडीनुसार मिसळावी लागते. त्यामुळे मेंदीचा चांगला परिणाम दिसून येतो.

मेहंदी लावण्यासाठी वेगवेगळे दर आकारले जात आहेत. वधूच्या हातावर आणि पायावर मेहंदी लावण्यासाठी ग्रामीण भागात दोन ते तीन हजार रुपये दर आहेत. केवळ तळहातावर मेहंदी लावण्यासाठी १०० रुपयांपासून दर सुरू होतात. कोपरा पासून मेंदी लावण्याचे दर २०० ते ३०० पर्यंत आहेत. मात्र, प्रसिद्ध कलाकारांना अधिक ऑर्डर असल्यास दर वाढविले जात आहेत. शहरांमध्ये स्पर्धा असून, मेहंदी लावण्यासाठी पाच ते सहा हजारांपर्यंत खर्च येतो.

Wedding Ceremony Arabic Sticker Mehndi
Karnataka Result : बंडखोरीमुळं काँग्रेसनं गमावल्या 'इतक्या' जागा; फेरमतमोजणीत उमेदवाराचा 16 मतांनी पराभव

मेहंदीचे प्रकार

फॅन्टसी स्टाईल, जरदौसी मेहंदी, अरेबिक मेहंदी, स्टिकर मेहंदी, ठसा मेहंदी असे अनेक प्रकार आहेत. साधी मेहंदी ही हात भरून काढली जाते. ही मेहंदी लग्न समारंभात महिला वर्ग आवर्जून काढतात.

Wedding Ceremony Arabic Sticker Mehndi
Pregnant Women : गर्भवती महिलांसाठी महत्वाची बातमी! पहिल्या तिमाहीत HIV तपासणी करण्याचे निर्देश

सध्या साध्या मेहंदीसह विविध प्रकारची मेहंदी लग्न समारंभ व इतर कार्यक्रमाच्या वेळी लावल्या जात आहेत. त्यासाठी चांगली मागणी असून ग्रामीण भागात साधी मेहंदी तर शहरांमध्ये विविध प्रकारच्या मेहंदीला पसंती दिली जात आहे.

-अर्चना जाधव, मेहंदी डिझायनर, निपाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com