Mother Daughter Relationship : आई मुलीच्या नात्यात दुरावा आलाय? या टीप्स करतील मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mother Daughter Relationship

Mother Daughter Relationship : आई मुलीच्या नात्यात दुरावा आलाय? या टीप्स करतील मदत

Mother Daughter Relationship : सगळेच लोक सासू सुनेचे नाते कसे असावे यावर बोलतात. त्याबद्दल टिप्सही देतात. कारण, वाद केवळ सासू सुनेच्या नात्यात होतात अशी समजूत आहे.

हेही वाचा: Mother Daughter : माय-लेकीचं नातं घट्ट करण्यासाठी करा असा संवाद

त्यामुळे लोक लग्न होण्याआधी मुलीला आणि होणाऱ्या सासूला काही टिप्स देतात. पण कधीकधी या टिप्सची गरज आई आणि मुलीच्या नात्यातही पडते. कारण वरवर दिसायला आई मुलीत सगळं अलबेल असले तरी काहीतरी खटकत असत.

हेही वाचा: Bollywood Mother-Daughter: बॉलिवूडमधल्या प्रसिध्द मायलेकी

आई मुलींना आपली सावली समजते. जी कठीण प्रसंगात तिला खंबीरपणे उभे राहण्याची हिंमत देते. प्रत्येक परिस्थितीत मूलीच्या मागे उभी राहणारी आईच असते. पण आयुष्यात अनेक प्रसंग येतात ज्यामुळे आई आणि मुलीमध्ये अंतर निर्माण होते. अशा परिस्थितीत जर तुमच्यामध्येही अंतर आले असेल तर तुम्ही या टीप्स पाहून तुमचे नाते पुन्हा मजबूत करू शकता.

हेही वाचा: Daughter's Day: या कलाकारांच्या मुली गाजवतायत बॉलीवूड..

नेहमी संवाद करावा

लग्नानंतर मूली सासरी जातात. त्यामूळे जोवर माहेरी आईजवळ आहात तोवर तिच्याशी बोलून तूमचे नाते अधिक घट्ट बनवा. कधीकधी आई स्वत:ला एकटे समजते. घरात तूमचा वावर नसल्याने तिला एकाकी वाटू शकते. त्यामूळे तिच्या प्रकृतीची वारंवार चौकशी करा. असे केल्याने तिची काळजी घेण्यासाठी कोणीतरी आहे याचा आधार तिला वाटेल.

हेही वाचा: Kajol Daughter: सिंघमच्या मुलीला आला राग, नेटकरीही चिडले!

आईची काळजी घ्या

आईला लागणाऱ्या वस्तू, तिचे रूटीन चेकअप याची काळजी घ्या. तिला रूटीन चेकअपसाठी घेऊन जा. तिला बाजारात घेऊन जा. ज्यामूळे तिला तूम्ही सोबत आहात असे वाटेल.

हेही वाचा: Daughters To Inherit Father's Property : "वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलीचाच हक्क", सुप्रीम कोर्ट

सणात आई एकटी नको

सणसमारंभात आईला एकटे सोडू नका. जेव्हा तूम्ही सिंगल चिल्ड्रन असता आणि तूमचे लग्न झाल्यावर आई एकटी पडली असेल. तर सण समारंभात आईला एकटे सोडू नका. सणात तूमच्याही घरी काम असेल तरीही आईसाठी वेळ काढा. किंवा आईला तूमच्या घरच्या कार्यक्रमात सहभागी करून घ्या.

हेही वाचा: Mother Health: बाळंतपणानंतर वजन का वाढतं? वाढल्यास ते लगेच कमी करणे बाळासाठी ठरेल...

माफ करायला शिका

कोणत्याही गोष्टीवरून तूम्ही आईवर रागावला असाल तर तिला माफ करा. सध्या आईला तूमची गरज आहे याहून मोठी गोष्ट कोणतीही नसेल. त्यामूळे तिला माफ करून तिचे मन जपा.