Natural Hair Care: चमकदार व मऊ केसांसाठी बीटापासुन तयार करा घरच्या घरी नॅचरल हेअर कलर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Natural Hair Care

Natural Hair Care: चमकदार व मऊ केसांसाठी बीटापासुन तयार करा घरच्या घरी नॅचरल हेअर कलर

केसांसाठी केमिकलयुक्त ट्रीटमेंट करण्याऐवजी आपण घरच्या घरीच रामबाण नैसर्गिक उपाय करू शकता. यापैकीच एक म्हणजे बीटरूट. केसांवरील  नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी आपण बिटाचा वापर करू शकता. केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हेअर केअर रुटीनमध्ये बिटाचा समावेश करावा. तुम्ही बीट खाऊ देखील शकता आणि केसांवर लावूही शकता. पण काही लोकांना बिटाची चव आवडत नसल्याने या आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक कंदमुळाचे सेवन करणं टाळतात. केसांसाठी बिटाचा वापर करण्याची योग्य पद्धत कोणती? याचीच सविस्तर माहिती आज आपण या लेखात जाणून घेऊ या

बिटामध्ये लोह आणि व्हिटॅमिनची सर्वाधिक मात्रा असते. यामुळे आपल्या केसांना खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते आणि मुळांसह केस मजबूत देखील होतात. पुरेशा प्रमाणात केसांना पोषक घटक मिळाल्याने केस सुंदर व चमकदार दिसतात. बिटाच्या नैसर्गिक गडद रंगामुळे केसांवरील नैसर्गिक चमक पुन्हा येण्यास मदत मिळते. तसंच बिटाचा रसाच्या वापरामुळे कोरड्या व निर्जीव केसांची समस्या दूर होण्यास मदत होते. 

केसांवर केमिकलयुक्त कलर ट्रीटमेंट करण्याऐवजी बिटाच्या रसाचा वापर करावा. यामुळे केसांना भरपूर लाभ मिळतील.जी लोक आपल्या आहारामध्ये बिटाचा समावेश करतात, त्यांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होत नाही. तसंच रक्तभिसरणाची प्रक्रिया देखील योग्य पद्धतीने सुरू राहते. यातील पोषक घटकांमुळे केसांनाही ऑक्सिजनचा आणि पोषण तत्त्वाचा पुरवठा होण्यास मदत मिळते. यामुळे केस चमकदार होतात.नॅचरल हेअर कलरचा वापर आपण महिन्यातून एकदा करू शकता. पण हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तीन ते चार तासांचा वेळ काढणे आवश्यक आहे. बिटाचे नॅचरल हेअर कलर लावल्यास तुमच्या केसांना पूर्णतः नैसर्गिक रंग मिळेल. 

चला तर मग बघु या बिटापासुन नॅचरल हेअर कलरकसा तयार करायचा ?

नॅचरल हेअर कलर तयार करण्यासाठी मध्यम आकाराचे चार बिट घ्यावा आणि स्वच्छ धुऊन त्यावरील साल काढा. आता बीट कापून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटा. जाडसर पेस्ट तयार करा. तयार झालेली पेस्ट एका भांड्यामध्ये गाळा आणि रसामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. आपण आपल्या आवश्यकतेनुसार सामग्रीचे प्रमाण ठरवू शकता. हे मास्क लावण्यापूर्वी केस स्वच्छ धुऊन घ्या पण कंडिशनर लावणे टाळा.  बीटरूट हेअर कलर  दोन ते तीन तासांसाठी लावून ठेवा. यानंतर केस पुन्हा स्वच्छ धुऊन घ्या. यावेळेस आपण कंडिशनरचा उपयोग करू शकता. अशा पद्धतीने बीटरूट हेअर कलरचा वापर केल्यास तुमच्या केसांवरील नैसर्गिक चमक पुन्हा येण्यास मदत मिळू शकते.