Night Skin Routine : चेहऱ्यावरच्या ग्लोसाठी रात्री झोपतांना चुकूनही विसरु नका या टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Night Skin Routine

Night Skin Routine : चेहऱ्यावरच्या ग्लोसाठी रात्री झोपतांना चुकूनही विसरु नका या टिप्स

Night Skin Routine : धावत्या जगात ना मनाला शांतता आहे, न शरीराला विश्रांती आणि ना ही आपल्याला आपल्या चेहऱ्याची काळजी घेयल्या वेळ मिळतोय. छान सुंदर चेहरा कोणाला नको असतो, पण अनेकदा काळानुसार आपल तेज खालावत जात. अनेक लोकं यासाठी ब्युटी टिप्स फॉलो करतात.

हेही वाचा: Kolambi Rice Recipe : झणझणीत कोळंबी भात कसा तयार करायचा?

काहीजण आपल्या चेहऱ्याची खूप सुंदर काळजी घेतात.. अनेकदा त्यासाठी पार्लरमध्ये, स्किन केअर स्पेशालिस्ट कडे जातात पण प्रत्येकावेळी याने फरक पडतोच असं नाही.त्यापेक्षा छान झोपेसाठी आणि सुंदर त्वचेसाठी तुम्ही या सोप्या टीप्स फॉलो करू शकतात.

1. तोंड धुवा

रोज रात्री झोपण्याआधी स्वच्छ थंड पाण्याने तोंड धुवा. फेश वॉश नसेल तर साध्या पाण्याने धुवून काढा.. आपण रोज बाहेर फिरतो बाहेरची सगळी धूळ, प्रदूषण चेहऱ्यावर बसते आणि आपण तसेच झोपतो त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात.

हेही वाचा: Travel In January : जानेवारीत ट्रीपचे नियोजन करताय ? ही पर्यटन स्थळे उत्तम पर्याय ठरू शकतात

2. फेस मास्क लावा

थंडीत त्वचा खूप कोरडी पडते तुम्ही दोन तीन दिवसातून एकदा तरी चेहऱ्यावार फेस मास्क लावला पाहिजे. तुम्ही मसुरीच्या डाळीचं पीठ आणि तेलाचा मास्क लावू शकतात.

3. मेडिटेशन करा

रोज झोपण्याआधी किमान दहा मिनिट मेडीटेशन केलं पाहिजे त्यामुळे दिवसभराचे सगळा थकवा निघून जातो आणि शांत झोप लागते आणि काहीही केल तरी झोप व्यवस्थित नसेल तर चेहऱ्यावर त्याचे परिणाम दिसून येतात.

हेही वाचा: Crime News : अमेरिकेतील पहिल्या ट्रान्सजेंडर महिलेला दिली जाणार इंजेक्शनने फाशी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...

4. एक ग्लास दूध घ्या

दिवसभरात जेवण नाश्ता होईलच किंवा तो पोटभर होईलच असं नाही; अशात तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध घेवू शकतात. त्यामुळे अगदी असं झाल की दिवसभरात आपल्या शरीरात न्युट्रिशनच प्रमाण कमी झालं तरीही दूध ते भरून काढेल.

5. रोज पुस्तक वाचा

वाचन खूप महत्वाचं असतं. शब्दसंग्रह वाढावा किंवा ज्ञान वाढव म्हणून नाही फक्त जरा आपल्या विचारातून वेळ काढत अस पुस्तकं वाचल्याने आपल्याला आपल्या विचारांपासून मुक्ती मिळते.