No Makeup Look : वट सावित्रीच्या दिवशी असा करा नो मेकअप लूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

No Makeup Look

No Makeup Look : वट सावित्रीच्या दिवशी असा करा नो मेकअप लूक

No Makeup Look : ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला वट सावित्रीची पूजा म्हणजे स्त्रियांसाठी एक पर्वणीच असते. या दिवशी महिला आपल्या नवऱ्यांसाठी दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी वटवृक्षाची पूजा करतात.

हा सण प्रत्येक महिलेला आवडतो, कारण या दिवशी महिला साजशृंगार करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही या कठीण उपवासातही स्वतःला सुंदर ठेवू शकता. शिवाय हा मेकअप लूक तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं आणि उठावदार दिसून यायला मदत करेल.

या दिवशी वेगवेगळ्या प्रकारची टिकली लावायला महिलांना आवडतं. पण तुम्ही लाल किंवा मरून रंगाची साधी टिकली लावावी. त्याचवेळी, लाल किंवा मरून रंगाची लिपस्टिक निवडा. यामुळे तुम्हाला परफेक्ट लुक मिळेल.

यानंतर डोळ्यांचा मेकअप करा. पूजेदरम्यान डोळे शांत ठेवा. काजल, आयलायनर आणि मस्करा लावून डोळे बोल्ड करा म्हणजे तुमच्या सौंदर्यात भर पडेल. त्याचवेळी चेहऱ्यावर कन्सीलर वापरा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग लपतील. चेहऱ्यावर त्वचेच्या टोनशी जुळणारे कन्सीलर लावा. पण मेकअप करण्यापूर्वी तुम्ही क्लींजिंग मिल्कने चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा, त्यानंतरच मेकअप करा.

काही स्त्रिया चेहऱ्यावर गरजेपेक्षा जास्त फाउंडेशन लावतात, जे खूप पॅची दिसते. आपल्या मूळ रंगापेक्षा वेगळे दिसते. त्यामुळे चेहऱ्याचा रंग लक्षात घेऊन फाउंडेशनची निवड करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चेहऱ्यावर मॉइश्चरायझरही लावू शकता.