Women's Day 2023 : फक्त कामाच्या ठिकाणीच असं नाही तर एकंदरीत सगळीकडेच महिलांना असते या गोष्टींची अपेक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women's Day 2023

Women's Day 2023 : फक्त कामाच्या ठिकाणीच असं नाही तर एकंदरीत सगळीकडेच महिलांना असते या गोष्टींची अपेक्षा

What Women's Want : महिलांना आपल्या कामाच्या ठिकाणी नक्की काय हवं असतं? फार काही अपेक्षा नसतात खरंतर कोणत्याही व्यक्तीला अपेक्षित असतील त्याच गोष्टी. फक्त कामाच्या ठिकाणीच असं नाही तर एकंदरीत सगळीकडेच महिलांना असते या गोष्टींची अपेक्षा. बघूया या अपेक्षा...

१. समान वेतन :

फक्त ती एक स्त्री आहे म्हणून तिच्याच्याने तितकं काम होणार नाही अशी धारणा काही लोकांची असते, अशात आजही काही कंपनी मध्ये महिलांचा पे रोल हा पुरुषांपेक्षा कमी असतो. अनेकदा स्त्रिया पुरुषांइतका ओव्हर टाइम करु शकत नाही, त्यांना घरच्या जाबबादऱ्या असतात असं सांगत त्यांचा पगार वाढ कमी केला जातो.

२. फ्लेक्झिबिलीटी आणि सशुल्क रजा

महिलांना अनेक गोष्टींमधून जावे लागते जसे की बाळतंपण, मुलांचे संगोपन त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी असते, घरचे कितीही समजूतदार असले तरी एका काळापर्यंत बाळाला आपली आईच लागत असते, शिवाय मासिक पाळीच्या वेळेस स्त्रीला होणारा त्रास कोणीही संजू शकत नाही, अशावेळेस जरा समजून जर त्या महिला कर्मचारीला आपल्या कामाच्या वेळेत जरा फ्लेक्झिबिलीटी दिली किंवा रजा दिली तर काही हरकत नाही.

३. टीम लिडिंग

महिलांमध्ये सुद्धा कंपनीचे नेतृत्व करण्याची क्षमता असते, आणि त्यांना प्रतिनिधित्व करायचे आहे. अशात जरी तिची त्या पदावर नियुक्ती झाली तरी अनेकदा तिच्या हाताखाली काम करणारे लोकं तिची बदनामी करत सुटतात. असं न करता तिला समजून घेतलं तर चित्र काहीतरी वेगळं असू शकतं.

४. ओळख आणि सन्मान

अनेक क्षेत्रात महिलांची संख्या वाढवण्यासाठी अनेक कंपन्या आणि संस्था काम करत आहेत हे कौतुकास्पद आहे, पण आजही जिथे स्त्री काम करते तिला जरा कमी लेखण्याचे अनुभव येतात, त्यात जर ती ज्युनियर असेल तर विचायरलाच नको मग तिला जास्त त्रास सहन करावा लागतो.

५. करियरमध्ये नवीन संधी

नोकरी करणार्‍या महिलांना घर आणि मुलांच्या जबाबदाऱ्यांसोबत करिअरची धुरा सांभाळावी लागते, यात जरा घरुन आणि कामाच्या ठिकाणाहून साथ मिळाली तर त्या खूप उल्लेखनीय कामगिरी करु शकतात.

६. तिच्या कार्यक्षमतेनुसार काम

अनेकदा महिलांना त्यांच्या "पॅशन प्रोजेक्ट्स" वर काम करण्याची संधी मिळत नाही, कारण त्या स्त्री आहेत, जरी त्यांची त्या प्रोजेक्टसाठी काम करण्याची पूर्ण तयारी असेल तरीही त्यांना ते काम मिळत नाही.

एकंदरीत महिलांना थोडं समजून घेतलं आणि समान संधी दिली तर त्यांच्याहून सुंदर ते काम कोणीही करु शकणार नाही याची खात्री आहे.