Diwali Festival 2020 : आई, मला पैठणीचा आकाशकंदील हवा !

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

दरवर्षी चिनी आकाशकंदीलांना मोठी मागणी असली तरी यंदा मात्र, देशी आकाशकंदील घेण्याकडे लोकांचा कल दिसत आहेत. कागद, धागा, कार्डबोर्ड, कापडापासून बनविलेले सुंदर आणि वेगवेगळ्या डिजाइन्सचे देशी आकाशकंदील बाजारात उपलब्ध आहेत, पण यंदा पैठणीचे आकाशकंदील हे मुख्य आकर्षण ठरत आहे.

पुणे : दिवाळी म्हटलं की, आकाशकंदील हवाच! पुर्वी घरीच तयार केलेला गोटीव कागदाचा आकाशकंदील वापरला जात असे. आता बाजारात सुंदर आणि आकर्षक तयार आकाशकंदील बाजारात उपलब्ध असतात. यामध्ये देशी आणि चिनी आकाशकंदील देखील उपलब्ध आहेत.

दरवर्षी चिनी आकाशकंदीलांना मोठी मागणी असली तरी यंदा मात्र, देशी आकाशकंदील घेण्याकडे लोकांचा कल दिसत आहेत. कागद, धागा, कार्डबोर्ड, कापडापासून बनविलेले सुंदर आणि वेगवेगळ्या डिजाइन्सचे देशी आकाशकंदील बाजारात उपलब्ध आहेत, पण यंदा पैठणीचे आकाशकंदील हे मुख्य आकर्षण ठरत आहे.

Diwali Festival 2020 : वसुबारस : पहिला दिवा आज लागणार दारी

पैठणीच्या पदपरावरील जरतारीचा मोर आता आकाश कंदिलावरही झळकणार आहे.


कागद, लाकूड अशा पर्यावरणपूरक वस्तू वापरुन कंदील बनवण्यात आले असून पैठणी साड्यांची जोड देत बनवलेले नाविन्यपूर्ण कंदील प्रत्येकाच्या पसंतीला उतरत आहेत.


कंदीलांच्या नावानुसारच कंदीलांचे डिजाईन्स बनविलेले आहेत. ‘राजश्री, ‘तेजोमय’, मयुर, नभोमणी, अरण्या, अनन्या, गुलकंद, नक्षत्र अशी नावे आकाश कंदीलांची आहेत.

दीर्घकाळ टिकणारे ​हे कंदील असल्यामुळे दरवर्षी नवे कंदील घेण्याची गरज नाही.

पैठणीच्या आकाशकंदीलांना सध्या प्रचंड प्रतिसाद मिळत असून मुंबई, विरार, बोरिवली, पुणे, लालबाग आदी भागातून मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे.

Diwali 2020 : दिपावली सण आपण का साजरा करतो? जाणून घ्या काय आहे रहस्य?

नवी मुंबईतील राहणाऱ्या हर्षदा साटम आणि अभिषेक साटम या दाम्पत्याने हे अनोखे कंदील साकारले आहेत. पैठणी साडीपासून खास कंदील त्यांनी तयार केले आहेत.

''गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक कंदील बनवतो. मागील वर्षी जरीच्या साड्या, खण, लोकर यांची सजावट कंदीलांना केली होती. यंदा पहिल्यांदाच पैठणी साड्यांचे वेगळे कंदील बनविल्याचे साटम दाम्पत्याने सांगितले. 


 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paithani Made Sky lantern is Trending In Market