esakal | मित्र-मैत्रिणींसोबत पुन्हा 'दुनियादारी' करायचीय? या टिप्स फॉलो करा Reconnecting with Friends pandemic Advice
sakal

बोलून बातमी शोधा

Crowds of friends on social media

मित्र-मैत्रिणींसोबत पुन्हा 'दुनियादारी' करायचीय? या टिप्स फॉलो करा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

तुम्हाला दीड वर्षांपूर्वीचे दिवस आठवतायत का, एखाद्या मित्राला फोन करून तुम्ही भेटायला जाऊ शकत होतात. तासनतास गप्पा चालायच्या तुमच्या. मित्र- मैत्रीणी भरपूर असले की कोणाला कधी भेटायचं, कोणत्या मित्र-मैत्रिणीशी खास नात, कोण सल्ला देऊ शकेल त्याच्याशी भरपूर गप्पा मारणं, मनातलं बोलून मोकळं होणं हे अगदी सहज होत असे. आपल्या आई-वडिलांनंतर मित्र-मैत्रीणी हे आपल्या जीवाभावाचं आणि हक्काचं स्थान असंत. एखाद्या व्यक्तीला जवळचा मित्र मानण्यास 200 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो, असे जर्नल ऑफ सोशल अँड पर्सनल रिलेशनशिप मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे . एकत्र केलेले जेवणं आणि अर्थपूर्ण संभाषणांमध्ये घालवलेले तास हे तुमच्यातील मैत्री अधिक गहिरं करत.

मात्र गेल्या वर्षी कोरोना आला आणि मैत्रीचे हे क्षण दुरावले गेले. काहींनी व्हिडीओ कॉल करून मैत्री जपण्याला प्राधान्य दिले. पण तरीही सामाजिक अंतर, मुलांची काळजी आणि वैयक्तिक जोखमीमुळे मैत्री वाढविण्यासाठी आधी देण्यात येणारा वेळ देण्याचे प्रमाण कमी झाले. पण आता लसीकरण सुरू झाल्याने लोकांनी आवडत्या मित्र-मैत्रीणींसोबत पुन्हा वेळ घालविण्यास सुरूवात केली आहे. पण मित्र-मैत्रिणींबरोबर वेळ घालवणे पुर्वीइतके सोपे नव्हते. त्यात काहीसे अंतर पडल्याचे, मिळवणारा वेळ थकवणारा असल्याचे या काळात अनेकांना समजले आहे. पण आपण मित्र-मैत्रीणींशी पुन्हा पुर्वीसारखेच कनेक्ट होण्यास, सहज संवाद साधघण्यास उत्सुक असाल तर या टिप्स फॉलो करा.

friends

friends

तुमचा दृष्टीकोन बदला
जर तुमच्यातील मैत्री अगदी घट्ट आहे. एकमेकांच्या संपर्कात राहूव जास्तीत जास्त वेळ घालवणे आवडत असेल. तर कोरोनाची भिती घेण्याची गरज नाही. तुम्ही पूर्वीप्रमाणेच पुन्हा भेटू शकता का, असा विचार करून घाबरण्याचे कारण नाही. कारण ते दिवस तुम्ही पुन्हा जगू शकता. यासाठी दृष्टीकोन बदला. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमधील क्लोज रिलेशनशिप लॅबचे मानसशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक आणि संचालक विल्यम चोपिक म्हणतात, बरेच जण भूतकाळात सकारात्मक झाले आहेत, त्यामुळे मित्र-मेत्रिणी कोरोना काळात वेगळे झाल्याची अपेक्षा करण्याचे कारण नाही.

हेही वाचा: World Gulabjam day : गुलाबजाम आईस्क्रीम ते केक, बदलतोय गुलाबजामचा थाट

निवडक व्हा

साथीच्या रोगाने प्रत्येक नातेसंबंधावर माठा परिणाम झाला आहे, कदाचित तुम्हाला सर्वांना एकाच वेळी पुन्हा भेटण्याची आवश्यकता वाटेल. हे तुमच्या भावनिक गरजांवर अवलंबून असू शकते. त्याऐवजी, आता तुम्ही कोणाबरोबर वेळ घालवू शकता, याबद्दल जरा निवडक व्हा. आधी ज्यांच्याशी तुमचे संबंध चांगले होणे गरजेचे आहे असे वाटेल त्यांना वेळ द्या. घट्ट मित्रांशी पुन्हा कनेक्ट व्हा

gym open

gym open

दिनचर्या तयार करा

हॉल या शास्त्रज्ञाच्या अभ्यासानुसार मैत्री टिकवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे दिनक्रम तयार करणे. मासिक बुक क्लब, वॉकला जाणे असो किंवा वर्कआउट क्लास, तुम्हाला मित्र केव्हा आणि कुठे भेटेल हे जाणून घेतल्याने तुम्हाला त्याला भेटण्यासाठी वेळ काढता येऊ शकतो. त्यासाठी समोरच्या व्यक्तीची आवडही लक्षात घ्या.

वेळ अर्थपूर्ण बनवा
आपण मित्रांसोबत वेळ कसा घालवता हे अत्यंत महत्वाचे आहे. संशोधनानुसार आपले विचार आणि अनुभव एकमेकांशी शेअर करणे, ज्याला परस्पर स्वयं-प्रकटीकरण म्हणतात, आणि प्रतिसाद (फॉलो-अप प्रश्न विचारणे आणि गुंतलेले असणे) जवळीक वाढवते. यामुळै तुम्ही तुमच्या मित्रांशी अधिक कनेकट् होऊ शकता.

हेही वाचा: टाटा-बिर्ला-अंबानी व्हायचंय? 'असे' मार्ग जे तुम्हाला श्रीमंत बनवतील

विचार करा
मित्र-मैत्रीणी आपल्याला तणावाचा सामना करण्यास, एकाकीपणाचा सामना करण्यास आणि आपलेपणाची भावना प्रदान करण्यात मदत करतात.-आज तुम्ही तुमच्या मित्रांना कसे पाठिंबा देऊ शकता? कशी मदत करू शकता याबद्दल विचार करा.

loading image
go to top