#PCOS :  १८ ते ३५ वयोगटातील २० टक्के महिलांना पीसीओएसचा धोका

#PCOS :  १८ ते ३५ वयोगटातील २० टक्के महिलांना पीसीओएसचा धोका

पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस) या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. बदलती जीवनशैली, आहार तसेच व्यायामाचा अभाव या कारणामुळे १८ ते ३५ या वयोगटातील २० ते ३०टक्के स्त्री पीसीओएससारख्या आजाराने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे.  पीसीओएस सारख्या आजारामध्ये महिलांना गर्भपात, गर्भधारणा न होणे, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मुदतीपूर्व प्रसूती आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पीसीओएसचा त्रास टाळण्यासाठी योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं सध्याच्या काळात गरजेचं झालं आहे. तसंच अशा महिलांनी आहारात कोणते बदल करावेत ते जाणून घेऊयात.
 

पीसीओएस या आजारामुळे हॉर्मोन्सचे समतोल बिघडते. परिणामी, दर महिन्याला स्त्रीच्या शरीरात तयार होणाऱ्या स्त्रीबीजाचे प्रमाणही घटते. यामुळे पुढे जाऊन वंधत्व येण्याची शक्यता असते. ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि जास्त कार्बोहायड्रेट आणि ट्रान्स फॅट्सचे आहारातील सेवन केल्यामुळे पीसीओएस सारख्या समस्येला सामोरं जावं लागतं. पीसीओएस असलेल्या महिलांना मधुमेह, हृदयाशी निगडीत आणि रक्तवाहिन्यांच्या समस्येचा जाणवू लागतात. अनियमित पाळी येणे आणि बीजांडकोषात अनेक गाठी निर्माण होऊन हॉर्मोन्सचा समतोल बिघडणे ही पीसीओएसची लक्षणे आहेत. 

आहारात करा हा बदल

१. इन्सुलिनची पातळी कमी करण्यासाठी आणि आपल्या आतडे निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.

२. बियाणे, बेरी, शेंगा, संपूर्ण प्रकारचे धान्य खा. 

३. चिकन, मासे, सोयाबिन, टोफू यांचा आहारात समावेश करा. 

४. एवोकॅडो, ब्राऊन राईस, पालक खा . 

५. पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये टाइप -2 मधुमेहाचा धोका जास्त असतो. त्यामुळे त्यांनी काजू, बियाणे, फळे, भाज्या आणि कमी कार्बोहायड्रेट्स असणारे पदार्थ खा. 

६. मिठाई, प्रक्रिया केलेले पदार्थ, मेदयुक्त पदार्थ टाळा. 

७. मुरुम किंवा केस गळती कमी करण्यासाठी आपल्या डॉक्टरांनी दिलेली औषधांचे सेवन करा.

( डॉ. गिरिजा वाघ या  पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रो हॉस्पिटलच्या प्रसूति व स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com