
Peepal Tree Puja Rules : पिंपळाची पूजा कधी व कशी करावी? फक्त या चूका टाळा!
Peepal Tree Puja Rules : गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचे झाड त्यांचेच स्वरूप असल्याचे सांगितले आहे. याच कारणामुळे पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती मिळते. या झाडाची नियमित पूजा केल्याने सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते.
पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूसोबत लक्ष्मीचा वास असतो. त्याची पूजा करणे अत्यंत लाभदायक मानले गेले आहे. पण त्याच्या पूजेचेही काही नियम आहेत. चला जाणून घेऊया त्या नियमांबद्दल.
ब्रह्मपुराणाच्या 118 व्या अध्यायात एका संदर्भाद्वारे सांगण्यात आले आहे की, स्वतः शनिदेवाने सांगितले होते की, जो कोणी शनिवारी पिंपळाची पूजा करेल, पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
त्याला शनिशी संबंधित त्रासांना कधीही सामोरे जावे लागणार नाही. अशा व्यक्तीच्या घरात लक्ष्मी वास करते आणि त्यांचे सर्व दुःख दूर होतात. येथे जाणून घ्या पिंपळाशी संबंधित काही उपाय नक्की करून पाहा जेणे करुन तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील
हिंदू धर्मात पिंपळाचे झाड पूजनीय आणि अत्यंत पवित्र मानले जाते. पौराणिक कथा आणि शास्त्रानुसार भगवान विष्णू पीपळाच्या मुळामध्ये, केशव देठात, नारायण फांद्यामध्ये, भगवान हरी पानांमध्ये आणि फळांमध्ये सर्व देव वास करतात. त्यामुळे त्याची उपासना खूप फायदेशीर आहे. मान्यतेनुसार, पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने जीवनातील दुःख आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते.
याशिवाय पापकर्मांपासूनही मुक्ती मिळते. नियमानुसार पिंपळाची पूजा केल्यास लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वादही वर्षाव होतो. दुसरीकडे, शनिवारी सकाळी नियमितपणे पिंपळाला जल अर्पण करणे आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने शनीच्या महादशेपासून मुक्ती मिळते.
शास्त्रानुसार पीपळाची पूजा नेहमी सूर्योदयानंतरच करावी. पीपळाच्या झाडाची पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. यासोबतच शत्रूंचाही नाश होतो. त्याची पूजा केल्याने ग्रह दोष, बाधा, काल सर्प दोष, पितृदोषही शांत राहतात.
पिंपळाची पूजा कशी करावी
पिंपळाची पूजा करण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून पवित्र व्हावे. पूजेच्या सुरुवातीला पिंपळाच्या झाडाला गायीचे दुध, तीळ आणि चंदन मिश्रित पाणी अर्पण करा. जल अर्पण केल्यानंतर यज्ञोपवीत फुल, नैवेद्य आणि इअतर पूजन सामग्री अर्पण करा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे धूप-दीप दाखवून दिवा अवश्य लावावा. आसनावर बसून किंवा उभे राहून मंत्र जप करावा.
पिंपळाच्या झाडापुढे नतमस्तक होऊन करा हा जप
मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे। अग्रत: शिवरूपाय वृक्षराजाय ते नम:।।
आयु: प्रजां धनं धान्यं सौभाग्यं सर्वसम्पदम्। देहि देव महावृक्ष त्वामहं शरणं गत:।।
या मंत्राचा कमीत कमी 108 वेळेस जप करावा. जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग केला जाऊ शकतो. जप केल्यानंतर आरती करावी. पिंपळाला अर्पण केलेल्या पाण्याधील थोडे पाणी घरात शिंपडावे. अशाप्रकारे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी आणि शांतता कायम निवास करते.
पिंपळाच्या झाडाच्या पूजेबाबतीत या चूका करू नका
सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाची पूजा अजिबात करू नये. त्यामुळे घरात गरिबीचे वास्तव्य असते. शास्त्रानुसार, सूर्योदयापूर्वी अलक्ष्मीचा वास पीपळाच्या झाडावर होतो, जे गरिबीचे प्रतीक मानले जाते.
याशिवाय सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा केल्यास घरात दारिद्र्य आणि जीवनातील समस्या कायम राहतात. त्यामुळे सूर्योदयापूर्वी पीपळाची पूजा करू नये आणि या झाडाजवळ जाऊ नये. एवढेच नाही तर रविवारी पिंपळाच्या झाडाला पाणीही अर्पण करू नये.