Personality Tips : आयुष्य आउट ऑफ कंट्रोल होतंय असं वाटतंय? अजून बिघडण्याआधी या ५ टिप्सने सावरा l Personality Tips How To Control Your Life positive thoughts | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Personality Tips

Personality Tips : आयुष्य आउट ऑफ कंट्रोल होतंय असं वाटतंय? अजून बिघडण्याआधी या ५ टिप्सने सावरा

How To Control Your Life : आपल्या रोजच्या धकाधकीत आपण फार स्ट्रेसमध्ये वावरत असतो. स्वतःकडे नीट बघयाला वेळही नसतो. अशात आपल्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी घडत असतात. तेव्हा आपल्याला आपण आपल्या आयुष्यावरचा कंट्रोलच हरवत आहोत असं वाटतं. पण यामुळे अजून ताण घेण्याची गरज नाही. प्रत्येकालाच कधीना कधी असं वाटत असतं.

माझ्या आयुष्यात काहीच नीट होत नाहीये, असं वाटतं. त्यामुळे निराशा वाढते. ताण आणि एन्झायटी वाढते. पण अशावेळी परत कसा कंट्रोल मिळावा हे जाणून घ्या.

Personality Tips

Personality Tips

काय करावे?

स्वतःला शिस्त लावा : आयुष्याला रुळावर आणण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला स्वतःला शिस्त लावयला हवी. यासाठी तुम्ही एक वेळापत्रक बनवून ते काटेकोरपणे पाळायला हवे. जेव्हा तुम्ही हे वेळापत्रक नियमित फॉलो करायला लागाल तेव्हा काही दिवसातच तुमचं तुम्हालाच छान वाटू लागेल. आयुष्याची गाडी रुळावर आणण्याची ही पहिली पायरी आहे.

वेळेचे नियोजन करायला शिका : जर आयुष्यावर कंट्रोल मिळवायचा असेल तर वेळेचे नियोजन करता यायलाच हवे. जर ते जमले नाही तर करण्यासारख्या गोष्टी खूप दिसतील आणि त्या कशा कराव्या हे न समजल्याने ताण वाढेल. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा कंट्रोल घ्यायचा असेल तर स्ट्रेस दूर करणं फार आवश्यक आहे.

Personality Tips

Personality Tips

जबाबदाऱ्या घ्या : जर जीवनाचा कंट्रोल घ्यायचा असेल तर पहिले जाबाबदारी घेण्याची तयारी ठेवायला हवी. यात तुम्हाला इतरांची नाही तर स्वतःच्या कृतीची जबाबदारी घ्यायला शिकायला हवं. जेव्हा तुम्ही तुमच्या कामाची जबाबदारी घ्यायला लागाल तेव्हा तुम्ही ते जास्त मेहन आणि मनापासून कराल. त्यामुळे जेव्हा काम मनापासून कराल तेव्हा गोष्टी आपोआप चांगल्या घडायला लागतील. आयुष्यात चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकाल.

नकारात्मक विचार बाजुला करा : जेव्हा आपलं आयुष्य कंट्रोलमध्ये नसतं तेव्हा आपल्याला नकारात्मक विचार यायला सुरुवात होते. या नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांनी संपवायचे आहे. जेव्हा नकारात्मक विचार येईल तेव्हा सकारात्मक विचार जाणूनबुजून करायचा. नकारात्म विचार वाढले की आयुष्य आउटऑफ कंट्रोल वाटू लागतं. त्यामुळे आयुष्यात पुढे सरकता येत नाही.

Personality Tips

Personality Tips

गोल्स सेट करा : जेव्हा जीवन आउट ऑफ कंट्रोल होतंय असं वाटतं तेव्हा एक नवीन गोल (ध्येय) सेट करावं. जेव्हा तुम्ही ध्येय ठरवतात तेव्हा ते मिळवण्याची नवी आशा निर्माण होते. त्यासाठी मेहनत घेण्याची इच्छा होते, प्रयत्न होतात. त्यामुळे गोष्टी प्लॅन करून त्या पुर्ण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आयुष्य आपोआप तुमच्या कंट्रोलमध्ये येतं.

नवीन काही नक्की शिका : एक गोष्ट जी तुम्हाला कायम नकारात्मक विचारांपासून दूर ठेवते ती म्हणजे नवीन काही शिकण्याची इच्छा. त्यामुळे जीवन रुळावर नाही असं वाटेल तेव्हा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. नवीन गोष्टी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने विचार करण्याची, समजण्याची शक्ती देतात. यामुळे तुम्ही सकारात्मक राहतात. जीवन स्वतः कंट्रोल करण्यासाठी सकारात्मक राहणं फार आवश्यक असतं.