झूम : सिट्रॉन सी-५ : लक्झरिअस कारची अपेक्षापूर्ती

चांगली आसनव्यवस्था, वेगवान, सुलभ हाताळणी, तत्काळ नियंत्रित होणारी आणि दणकट, तर सहप्रवाशांसाठी ऐसपेस, आरामदायी अशी कार प्रत्येकाला हवी असते.
citroen c5 car
citroen c5 carsakal

चांगली आसनव्यवस्था, वेगवान, सुलभ हाताळणी, तत्काळ नियंत्रित होणारी आणि दणकट, तर सहप्रवाशांसाठी ऐसपेस, आरामदायी अशी कार प्रत्येकाला हवी असते. भारतीय बाजारात प्रीमियम एसयूव्ही श्रेणीत अनेक लक्झरिअस कार उपलब्ध आहेत. त्यात या वर्षाच्या सुरुवातीलाच फ्रान्सच्या ‘सीट्रॉन’ कंपनीने ‘सी-५ एअरक्रॉस’ ही एसयूव्ही श्रेणीतील कार दाखल करून भारतात दमदार पदार्पण केले. सुरुवात चांगली तर पुढे सर्व चांगले, असे म्हणतात. सीट्रॉनची ‘सी-५’ चालवल्यानंतर नेमका हाच अनुभव येतो.

‘जीप’, ‘किया’ आणि ‘एमजी’ या परदेशी कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत भारतीय वाहन क्षेत्रात दमदार प्रवेश करून चांगलाच जम बसवला आहे. त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवलेल्या फ्रान्सच्या ‘सिट्रॉन’ या कार कंपनीनेही भारतात पदार्पण करून वाहनप्रेमींना परदेशी कारमध्ये आणखी एक पर्याय दिला. भारतात तमिळनाडूमध्ये या कारची निर्मिती केली जात आहे. या कारमध्ये फील आणि शाईन असे दोन व्हेरिएंट असून, त्यात मोनो टोन आणि वाय टोन असे दोन पर्याय दिले आहेत. या कारची दिल्ली एक्स शोरूम किंमत ३० ते ३२ लाख आहे.

सिट्रॉन कार चालवण्याचा अनुभव अद्भुत असाच आहे. २.० लिटर, ४- सिलिंडर, १९९७ सीसी क्षमतेचे फक्त डिझेल इंजिन या कारमध्ये दिले असून, ते १७७ पीएस ताकद, ४०० एनएम टॉर्क निर्माण करते. ही कार केवळ ऑटोमेटिक ट्रान्समिशनमध्येच (८ स्पीड) येते. त्यामुळे स्टेअरिंग हातात येताच आणि एक्सलिरेटरवर पाय दिल्यानंतर कार जो तत्काळ वेग पकडते ते पाहून आपण परदेशी कार चालवत असल्याचा फील नक्कीच येतो. या कारमध्ये नॉर्मल, ईको आणि स्पोर्ट््‌स असे ड्रायव्हिंग मोड्स दिले आहेत.

सिट्रॉन सी-५ मजबूत आणि दर्जेदार आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी ‘फ्लाइंग कार्पेट इफेक्ट’ ही प्रगत हायड्रॉलिक कुशन असलेली सस्पेन्शन यंत्रणा देण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे, गतिरोधकावरून कसलेही धक्के जाणवत नाहीत. या कारची अंतर्गत आणि बाह्य रचनाही आकर्षित करणारी आहे. समोरून सिट्रॉनच्या लोगोला जोडलेला ग्रील अधिक उठावदार दिसतो. त्याचबरोबर खाली चारही बाजूने क्रोम इफेक्ट असलेली चौकोनी फ्रेम कारच्या सौंदर्यात भर घालते. केवळ बटणावर मागे-पुढे. तसेच वर-खाली करता येणारे आसन, तसेच चालकाच्या उंचीनुसार हवी तशी मागे-पुढे होणारी स्टेअरिंग यांमुळे कार चालवताना दमछाक होत नाही. कारची दृष्यमानताही चांगली आहे.

कारची वैशिष्ट्ये....

  • सिट्रॉन सी-५ प्रतिलिटर १८.६ किलोमीटर मायलेज देत असल्याचा दावा केला असला, तरी सरासरी १३ ते १४च्या दरम्यान मायलेज देते.

  • १२.३ इंची सेमी डिजिटल ‘ड्रायव्हर डिस्प्ले’, ८ इंची इन्फोटेन्मेंट टचस्क्रीन, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटो आदी तांत्रिक सुविधांचा समावेश आहे.

  • शाईन या व्हेरिएंटमध्ये पॅनोरामिक सनरूफ, मल्टिपल ड्राईव्ह सर्फेस पर्यायासह अनोखी ग्रीप कंट्रोल सिस्टिम, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टिम दिली आहे

  • पार्किंग सहायक यंत्रणा, शाईन व्हेरिएंटमध्ये फूट ऑपरेटेड हॅन्ड्स-फ्री इलेक्ट्रिक टेलगेट, इंजिन स्टॉप व स्टार्ट सिस्टिम आदी फीचर्स दिले आहेत.

  • सुरक्षेच्या दृष्टीने सिट्रॉन सी-५मध्ये ६ एअरबँग, एबीएस आणि ईबीडी, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर, ईएसपी आणि ट्रॅक्शन कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल आदी मुख्य फीचर्स दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com