झूम : ग्लँझा : क्रॉस बॅजिंगची यशस्वी कार!

क्रॉस बॅजिंग म्हणजे चिन्हांची अदलाबदल. वाहने तीच, तंत्रज्ञान किंवा इतर गोष्टीही सारख्याच; परंतु चिन्ह आणि नाव वेगवेगळे.
Glanza Movie
Glanza MovieSakal
Summary

क्रॉस बॅजिंग म्हणजे चिन्हांची अदलाबदल. वाहने तीच, तंत्रज्ञान किंवा इतर गोष्टीही सारख्याच; परंतु चिन्ह आणि नाव वेगवेगळे.

क्रॉस बॅजिंग म्हणजे चिन्हांची अदलाबदल. वाहने तीच, तंत्रज्ञान किंवा इतर गोष्टीही सारख्याच; परंतु चिन्ह आणि नाव वेगवेगळे. मारुती सुझुकी आणि टोयोटाने व्यावसायिक डावपेचांच्या दृष्टीने २०१८ मध्ये क्रॉस बॅजिंगअंतर्गत काही वाहने भारतीय बाजारात दाखल करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. यापूर्वी इतर कार कंपन्यांनीही (उदा. महिंद्रा-रेनॉ, रेनॉ-निस्सान) क्रॉस बॅजिंगअंतर्गत काही वाहने बाजारात आणली. परंतु, हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यानंतरही टोयोटाने क्रॉस बॅजिंगअंतर्गत आपले पहिले उत्पादन ग्लँझाच्या रूपात भारतीय बाजारात जून २०१९मध्ये आणले. हा निर्णय धाडसी असला तरी तो काही अंशी यशस्वी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

ग्लँझाच्या अधिक माहितीपूर्वी तिची किंमत आणि व्हेरिएंट जाणून घेणे गरजेचे आहे, तर ग्लँझा एकूण पाच प्रकारात येते. केवळ पेट्रोल इंधनामध्येच ही कार येत असून ‘जी’ हे तिचे सुरुवातीचे व्हेरिएंट आहे. या व्हेरिएंटची मुंबईतील ऑनरोड किंमत ८.७० लाख इतकी आहे. त्यानंतर ‘जी स्मार्ट हायब्रीड'', ‘व्ही’, ‘जी सीव्हीटी’ आणि ‘व्ही सीव्हीटी’ आदी व्हेरिएंट येत, असून त्यांची किंमत अनुक्रमे ९.४५, ९.६९, १०.१० आणि १०.९० लाख इतकी आहे. ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गीअरबॉक्ससह या कारमध्ये ११९७ सीसी, ४ सिलिंडर, के-सिरीज पेट्रोल इंजिन दिले, असून जे ६००० आरपीएमला ६१ किलोवॉट ताकद निर्माण करते.

भन्नाट वैशिष्ट्ये

ग्लँझाचे केवळ समोरील ग्रीलचे डिझाईनच तिचे बलेनोपासूनचे वेगळेपण टिकून ठेवते. टोयोटाचा लोगो आणि ग्लँझाचे बॅजिंग वगळले तर इतर अंतर्गत-बाह्य रचना बलेनोसारखीच आहे. ३३९ लिटरचा बूटस्पेस, पुढील आणि मागील आरामदायी आसन व्यवस्था, चालकासाठी उंचीनुसार मागे-पुढे, खाली-वर (टेलिस्कोपिक-टील्ट) करता येणारी स्टिअरिंग आणि आसनव्यवस्था, हातळण्यास सहज असलेले गिअर लिव्हर, चांगली दृष्यमानता ही या कारची वैशिष्ट्ये आहेत. चांगल्या दृष्यमानतेमुळे शहरी रस्त्यांवर, वाहतूक कोंडीत किंवा अरुंद रस्त्यांवरून ही कार चालवताना विशेष अडचणी येत नाहीत.

कारच्या सस्पेन्शनच्या बाबतीत काही गोष्टी सुधारणा करण्यासारख्या आहेत. अधिक ग्राऊंड क्लिअरन्समुळे खड्डेमय रस्त्यावर किंवा गतीरोधकावरही ही कार आदळत नाही. शहरी, कच्चे-खड्डेमय, घाट रस्त्यांवरही या कारच्या ताकदीचा अंदाज येतो. कारमध्ये पूर्ण पाच प्रवासी बसून वातानुकूलन यंत्रणा लावूनही तिची ताकद तेवढीच राहते, हे तिचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. महामार्गावर ओव्हरटेक करताना अधिक आरपीएमला पूर्ण ताकद मिळून ही कार तत्काळ वेग धारण करते. टोयोटाने ऑटोमेटिक व्हेरिएंटसाठी १९-२० किलोमीटर प्रतिलिटर मायलेज सांगितले असले तरी ही कार सर्वप्रकारच्या रस्त्यावरून चालवल्यानंतर सरासरी १५-१६ चे मायलेज देते.

एकूणच बलेनो आणि ग्लँझाचे इंजिन किंवा इतर बाबी सारख्याच असल्या, तरी ग्लँझा चालवण्याचा अनुभव तुलनेने सुखावह होता. भारतीय बाजारात टोयोटाच्या वाहनांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मारुती सुझुकीला पर्याय म्हणून छोटी परंतु दमदार कार म्हणून टोयोटाची ग्लँझा अशा ग्राहकांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

फीचर्स आणि सुरक्षा

रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, टील्ट अँड टेलिस्कोपिक स्टिअरिंग, अँड्रॉईड ऑटो अॅपल कार प्लेसह ऑडिओ टचस्क्रिन सिस्टिम, टीएफटी मल्टी इन्फो डिस्प्ले, स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, इंजिन पूश स्टार्ट/ स्टॉप आणि स्मार्ट की एंट्री, अल्ट्रा व्हायोलेट प्रोटेक्ट ग्लास, ऑटेमेटिक क्लायमेट कंट्रोल आदी प्रमुख फीचर्स ग्लँझामध्ये देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्लँझामध्ये दोन एअर बॅग, एबीएस-ईबीडी, टेक्ट बॉडी (टोटल इफेक्टिव्ह कंट्रोल टेक्नॉलॉजी), आयएसओएफआयएक्स चाईल्ड सिट्स, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, सिटबेल्ट रिमाईंडर, फॉलो मी होम हेडलँप, अँटी पिन्च ड्रायव्हर पॉवर विंडो आदी बाबी देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com