झूम : नेक्सॉन ईव्हीचा ‘मॅक्स’ आनंद

नेक्सॉन ईव्ही मॅक्स ही कारदेखील टाटाच्या प्रचलित ‘झिप्ट्रॉन’ तंत्रज्ञानवर आधारित आहे. यामध्ये ‘परमनन्ट मॅग्नेट सिन्क्रोनस’ मोटर दिली असून, ती १४० पीएस आणि २५० एनएम टॉर्क निर्माण करते.
Nexon Ev Max
Nexon Ev MaxSakal
Summary

नेक्सॉन ईव्ही मॅक्स ही कारदेखील टाटाच्या प्रचलित ‘झिप्ट्रॉन’ तंत्रज्ञानवर आधारित आहे. यामध्ये ‘परमनन्ट मॅग्नेट सिन्क्रोनस’ मोटर दिली असून, ती १४० पीएस आणि २५० एनएम टॉर्क निर्माण करते.

व्हेंटिलेटेड सीट, वायरलेस मोबाईल चार्जर, ऑटो होल्ड पर्यायासह इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, आकर्षक गिअर नॉब, क्रूझ कंट्रोल, ऑटो डिमिंग मिरर, एअर प्युरिफायर यासारखी फीचर्स, वाढवलेल्या ड्रायव्हिंग रेंजसह टाटाने नेक्सॉन ईव्ही ‘मॅक्स’ ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीतील कार नव्याने दाखल केली. इलेक्ट्रिक कारमध्ये अधिक ड्रायव्हिंग रेंज मिळवायची असल्यास तिची हाताळणीही तशी हवी. नेक्सॉन ईव्ही ‘मॅक्स’लाही हा निकष लागू पडतो. एकूणच या कारचा परफॉर्मन्स, ड्रायव्हिंग रेंज, रायडिंगचा अनुभव कसा होता, जाणून घेऊया...

टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्सचे एक्सझेड + आणि एक्सझेडए + असे दोन व्हेरिएंट. शिवाय यामध्ये दोन चार्जिंगचे पर्याय दिले आहेत. ३.३ किलोवॉट चार्जरद्वारे ही कार पूर्ण चार्ज करण्यासाठी १४ तासांचा वेळ लागतो, तर ७.२ किलो वॉट फास्ट चार्जरद्वारे ही कार ६.५ तासात पूर्ण चार्ज होते. या कारची एक्स शोरूम किंमत १७.७४ ते १९.२४ लाख इतकी आहे. स्टँडर्ड व्हेरिएंटच्या तुलनेत नेक्सॉन ईव्ही मॅक्स फास्ट चार्जिंगचा पर्याय असलेल्या कारची किंमत ५० हजाराने अधिक ठेवली आहे.

नेक्सॉन ईव्ही मॅक्स ही कारदेखील टाटाच्या प्रचलित ‘झिप्ट्रॉन’ तंत्रज्ञानवर आधारित आहे. यामध्ये ‘परमनन्ट मॅग्नेट सिन्क्रोनस’ मोटर दिली असून, ती १४० पीएस आणि २५० एनएम टॉर्क निर्माण करते. यामध्ये सिटी, ईको, स्पोर्ट्स असे तीन ड्रायव्हिंग मोड्स दिले आहेत. शिवाय ४०.५ किलोव्हॅट लिक्विड कूल्ड लिथियम आयन बॅटरी दिली असून, ती नेक्सॉन ईव्हीच्या (३०.२ किलोव्हॅट) तुलनेत ३३ टक्के मोठी आहे.

नेक्सॉन ईव्ही मॅक्सचे वजन बॅटरीमुळे १०० किलोने वाढवल्याने ही कार चालवताना स्टेअरिंगच्या हाताळणीवर किंचितसा परिणाम जाणवला. याकडे दुर्लक्ष केल्यास नेक्सॉन मॅक्स आधीच्या ईव्हीप्रमाणेच प्रत्यक्ष रस्त्यावरील कामगिरीने नाराज करत नाही. कारमध्ये ३५० लिटरचा बूटस्पेस दिला असून, लांबच्या प्रवासासाठी पुरेसे सामान त्यात सामावू शकते. आकर्षक लुक, तत्काळ थंड करणारी वातानुकूलन यंत्रणा, आरामदायी आसनव्यवस्था आदी या कारच्या जमेच्या बाजू आहेत. म्हणूनच किमतीच्या तुलनेत अधिक फीचर्स आणि ड्रायव्हिंग रेंज पाहता ही कार चांगला पर्याय ठरू शकते.

इतकी मिळेल ड्रायव्हिंग रेंज...

  • नेक्सॉन ईव्ही मॅक्स पूर्ण चार्जिंगवर ४३७ किलोमीटर धावणार असल्याचा दावा टाटातर्फे करण्यात आला आहे. तरीही प्रत्यक्ष अनुभव पाहता ही कार सिटी/ईको मोड्सवर चालवून त्यातही वेग मर्यादेचे भान ठेवल्यास ३५० किलोमीटरची रेंज नक्कीच देऊ शकेल.

  • रस्त्याचा प्रकार, कारमधील सहप्रवाशांची एकूण संख्या, बाहेरील वातावरण आदी योग्य असल्यास ३५० किलोमीटरहूनही अधिकची ड्रायव्हिंग रेंज ही कार देऊ शकते. परंतु, तीन ड्रायव्हिंग मोड्स दिल्याने ही कार हवी तशी पळवता येते. स्पोर्ट्स मोडवर तत्काळ पकडणारा वेग या कारच्या ताकदीची जाणीव करून देतो.

  • नेक्सॉन ईव्ही मॅक्समध्ये अॅडव्हान्स रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिम दिली असून, ज्याद्वारे बॅटरी स्वयंचलित पद्धतीने चार्ज होण्यास मदत होते. शहरी रस्त्यांवर वारंवार ब्रेक लागतो, अशावेळी बॅटरी चार्ज होते. शिवाय कारचे एक्सलरेशन सोडल्यावर ही कार आपोआप ब्रेकही घेते. परंतु हा पर्याय नको असल्यास त्यासाठी बटनही दिले आहे.

सुरक्षेची हमी

  • नेक्सॉन मजबूत गुणवत्तापूर्ण बांधणीसाठी ओळखली जाते. नेक्सॉन ईव्ही मॅक्समध्येही प्रवास करताना पहिल्यापेक्षा अधिक सुरक्षितता वाटेल याची खबरदारी टाटाने घेतली आहे. त्यासाठी चारही चाकांना डिस्क ब्रेक, इलेक्ट्रिक हँड ब्रेकसह इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम हे फीचरही दिले आहे.

  • कारमध्ये दोनच एअर बॅग दिल्या असल्या, तरी पाठीमागील प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही एअर बॅगची उणीव जाणवली. बाकी हिल होल्ड आसिस्ट, हिल डिसेंड कंट्रोल, पॅनिक ब्रेक अलर्ट (ज्याद्वारे अर्जंट ब्रेक घेतल्यास पाठीमागील वाहनचालक सावध होतो.), एबीएस+ईबीडी, ऑटो व्हेईकल होल्ड आदी सुरक्षात्मक फीचर्स दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com