झूम : रेसिंग : जोखीम, तरी करिअरची संधी

बहुतांश रेसरनी त्यांच्या करिअरची सुरुवात लहानपणापासून केली आहे. त्यातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांची द्वारे त्यांना कमी वयात खुली झाली.
Racing
RacingSakal

बहुतांश रेसरनी त्यांच्या करिअरची सुरुवात लहानपणापासून केली आहे. त्यातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांची द्वारे त्यांना कमी वयात खुली झाली. ‘मोटोजीपी’ आणि ‘डब्ल्यूएसबीके’ (वर्ल्ड सुपर बाईक) स्टार्सपैकी बहुतेकजण वयाच्या पाचव्या वर्षापासूनच मिनीबाईकद्वारे रेसिंग/राईडिंगचे तंत्र अवगत करू लागले. इतर खेळांप्रमाणे बाईक रेसिंगमध्ये पारंगत झाल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन एखादा क्लब किंवा महिंद्रा, होंडा यासारख्या संघांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. त्याचप्रमाणे स्पर्धांमध्ये एखाद्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी प्रायोजकत्व मिळू शकते. याशिवाय, काही व्यावसायिक बाईक रॅली आणि इंडियन नॅशनल रॅली चँपियनशीपसारखे ऑटोस्पर्धांमध्ये भाग घेतल्यास विजेत्यांना चांगली रक्कम मिळते.

तत्पूर्वी व्यावसायिक रेसिंग क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी काही प्राथमिक बाबींची माहिती गरजेची आहे.

१) फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एफएमएससीआय) ही संस्था देशातील सर्व राष्ट्रीय स्तरावरील मोटरस्पोर्ट्सचे नियमन करते. भारतात स्पर्धात्मक रेसिंगसाठी वैध ''एफएमएससीआय'' परवाना काढणे आवश्यक आहे. याचा सर्व तपशील एफएमएससीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

२) रेसिंग लायसन्ससाठी वय १३ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. रेसिंग शिकताना चांगल्या दर्जाचे हेल्मेट, ग्लोव्हज, जॅकेट, शूज व आवश्यक सुरक्षात्मक साधने (राईडिंग गिअर) असणे गरजेचे आहे.

३) इतर खेळांप्रमाणे ग्लॅमर रेसिंगमध्ये नसते. निदान भारतात या खेळाला अनुकूल परिस्थिती नाही. त्यामुळे एका पॅशनने प्रोत्साहित होऊन या क्षेत्रात येण्यासाठी आर्थिक बाजू भक्कम असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर इतर सर्व खेळांप्रमाणे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खंबीर असणे आवश्यक आहे.

रेसिंगसाठी कुटुंबीयांकडून प्रेरणा

अनेक पालक सुरक्षेवरून मुलांना या क्षेत्रात येण्यापासून रोखतात. परंतु अनेक बाईक रेसर्स असेही आहेत ज्यांनी आपल्या कुटुंबीयांकडून प्रेरणा घेत या क्षेत्रात प्रवेश केला. रॉयल एनफिल्डची कॉन्टिनेन्टल जीटी कप २०२१ ही स्पर्धा नुकताच पार पडली. या स्पर्धेत लोणावळा येथील २४ वर्षीय धिरज विजय बैकर, लातूर येथील २७ वर्षीय नरेश कानमे यांनी भाग घेतला होता. धिरजने वडिलांच्या पाठिंब्यानेच या क्षेत्रात प्रवेश केला. त्याची बहिणही रेसर आहे. तर मेकॅनिकल इंजिनिअर असलेला नरेश अनेक वर्षांपासून या क्षेत्रात आहे. चेन्नई येथील सुधीर सुधाकर, कोईम्बतूर येथील राज कुमार, पड्डुचेरी येथील लानी झेना फर्नांडिझ हे रेसर्स स्पर्धेत सहभागी झाले होते. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच हे सर्वजण स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करू शकले.

स्पर्धा अन् प्रशिक्षण संस्था

१) भारतात मोटो जीपी, सुपर बाईक रेसिंग, मोटोक्रॉस, एण्डुरो, ट्रँक रेसिंग असे अनेक रेसिंगचे प्रकार आहेत. तर मद्रास मोटर स्पोर्ट क्लब (तमिळनाडू), टीव्हीएस रेसिंग (तमिळनाडू), रजिनी अकँडमी ऑफ कॉम्पेटेटिव्ह रेसिंग (चेन्नई, कोईम्बतूर, दिल्ली), अँपेक्स रेसिंग अकँडमी (चेन्नई, कोईम्बतूर), कँलिफोर्निया सुपर बाईक स्कूल (चेन्नई) आदी ठिकाणी रेसिंगचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते.

२) बाईक रेसिंगच्या स्पर्धांचे दरवर्षी आयोजन केले जाते. रायल एनफिल्डची कॉन्टिनेन्टल जीटी कप, होंडा टेन रेसिंग, चेन्नई सुपर स्पोर्ट, जेके टायर, एमआरएफ, टीव्हीएस वन मेक चँपियनशीप आदींतर्फे स्पर्धांचे आयोजन केले जाते. यात बहुतांश स्पर्धा या एफएमएससीआय अंतर्गत भरवल्या जातात. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोटरसायकल ग्रँड प्रिक्स, सुपर स्पोर्ट रेसिंग आणि मोटर क्रॉस रेसिंग या स्पर्धा होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com