झूम : आत्मनिर्भरतेला बळकटी

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये प्रामुख्याने ‘लिथियम आयन’ बॅटरींचा वापर होतो; परंतु लिथियमसाठी भारताला पूर्णत: इतर देशांवर अवलंबून राहावे लागते.
electric vehicles
electric vehiclesesakal
Summary

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये प्रामुख्याने ‘लिथियम आयन’ बॅटरींचा वापर होतो; परंतु लिथियमसाठी भारताला पूर्णत: इतर देशांवर अवलंबून राहावे लागते.

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये प्रामुख्याने ‘लिथियम आयन’ बॅटरींचा वापर होतो; परंतु लिथियमसाठी भारताला पूर्णत: इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. जम्मू-काश्मीरमधील रेसाई जिल्ह्यात लिथियमचा ५९ लाख टन साठा सापडल्याचे भारतीय भूगर्भ सर्वेक्षणाने (जीएसआय) गेल्या आठवड्यात जाहीर केले. सध्या संशोधनाच्या प्राथमिक टप्प्यात असला, तरी भारतासाठी हा साठा म्हणजे भविष्यातील ‘लिथियमसंपन्न’तेचा आशेचा किरण आहे.

बाजारात उपलब्ध बॅटरींची ऊर्जावहन क्षमता वाढल्याने विद्युत वाहने (इलेक्ट्रिक व्हेईकल) मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. बॅटरीच्या ऊर्जावहन क्षमतेतील वाढीमध्ये लिथियम महत्त्वपूर्ण घटक ठरतो. विद्युत वाहनांना ऊर्जा पुरवण्याचे काम लिथियम करते. तो एक आम्लधातू असून, जो वजनाने खूप हलका असतो. विश्वनिर्मितीच्या महास्फोटात किंवा त्यानंतर काही काळानंतर या धातूची निर्मिती झाली; परंतु १८१७ मध्ये त्याचा खरा शोध लागला. भविष्यातील ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अनेक अपारंपरिक प्रकारच्या उपाययोजना केल्या गेल्या. ‘लिथियम आयन’चा शोधही त्यापैकीच एक.

लिथियम आयन बॅटरीच्या शोधामुळे इलेक्ट्रॉनिक जगतात नवे पर्व सुरू झाले. ही बॅटरी १९९१ मध्ये पहिल्यांदा बाजारात आली. सध्या आपल्या रोजच्या वापरातल्या अनेक उपकरणांमध्ये लिथियम बॅटरी वापरल्या जातात. या बॅटरींमध्ये लिथियम धातू वापरला जातो. म्हणून या बॅटरीला ‘लिथियम आयन’ बॅटरी म्हणतात.

लिथियमचा वापर...

1) मोबाइल, लॅपटॉप तसेच इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांमध्ये लिथियम बॅटरींचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. लिथियम हा बॅटरीतील महत्त्वाचा घटक आहे. आणि बहुतांश सर्वच इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लिथियम आयन बॅटरींचा वापर होतो.

2) सध्याच्या बॅटरीतही संशोधन करून भविष्यात अधिक ड्रायव्हिंग रेंज देणाऱ्या, टिकाऊ बॅटरीनिर्मितीवर भर दिला जात आहे. मोबाईलमध्ये टिकाऊ बॅटरीसाठी संशोधन केले जात आहे. वैद्यकीय क्षेत्र, अण्वस्त्रांमध्येही लिथियमचा वापर केला जातो.

या देशांत आढळतो लिथियम

भारत लिथियमची सर्वाधिक आयात ऑस्ट्रेलियाकडूनच करतो. लिथियमचा सर्वाधिक साठा चिली देशात (९२ लाख टन) आढळतो. त्याखालोखाल ऑस्ट्रेलियाकडे ५७ लाख टन लिथियमचे साठे आहेत. ऑस्ट्रेलियापाठोपाठ अर्जेंटिनात २२ लाख टन, पोर्तुगालमध्ये १५ लाख टन, चीनमध्ये १५ लाख टन, तर अमेरिकेत ७.५ लाख टन लिथियम आढळते.

भारतात लिथियमचे महत्त्व

भारतात हरितऊर्जा (ग्रीन एनर्जी) धोरणाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक ई-वाहनांच्या बॅटरीमध्ये लिथियमचा महत्त्वाचा भाग असतो; परंतु हे लिथियम मोठ्या प्रमाणात आयात करावे लागते. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून २०३० पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या ३० टक्क्यांनी वाढवण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. सरकारच्या प्रयत्नांना काश्मीरमधील लिथियम साठ्यांनी अधिक चालना मिळू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com