झूम : नेहमीपेक्षा हटके ‘टीव्हीएस रोनिन’

गेल्या वर्षी जुलै महिन्यात टीव्हीएस मोटर्सने ‘रोनिन २२५’ ही बाईक भारतीय बाजारात आणली. ही बाईक पाहिल्यावर तिची ‘श्रेणी’ कोणती, असा प्रश्न पडतो.
TVS Ronin
TVS Roninsakal

गेल्या वर्षी जुलै महिन्यात टीव्हीएस मोटर्सने ‘रोनिन २२५’ ही बाईक भारतीय बाजारात आणली. ही बाईक पाहिल्यावर तिची ‘श्रेणी’ कोणती, असा प्रश्न पडतो. क्रूझर, स्क्रँबलर की स्पोर्ट्स? पण तिची राईड केल्यानंतर वरील सर्वांचे मिश्रण या बाईकमध्ये असल्याचे दिसून येते. रोनिन ठराविक उद्देशासाठी बाजारात न आणता टीव्हीएस कंपनीने तिला दैनंदिन वापर, लाँग राईड, ऑफ रोडिंगच्या उद्देशाने आणले आहे.

टीव्हीएस कंपनीने २०१८च्या ऑटो एक्स्पोमध्ये ‘झेप्पेलिन’ संकल्पना सादर केली होती. रोनिनचा प्रवासही तेथूनच सुरू होतो. अशा या रोनिनमध्ये एसओएचसी, २२५ सीसी, सिंगल सिलिंडर, फोर-वॉल्व्ह, ४-स्ट्रोक ऑईल कूल्ड इंजिन दिले आहे. रोनिन ७,७७५० आरपीएमला २०.१ बीएच पॉवर आणि ३,७५० आरपीएमला १९.९३ एनएम टॉर्क जनरेट करते.

रोनिनमध्ये इंटिग्रेटेड स्टार्टेड जनरेटर (आयएसजी) दिले असून, त्यामुळे इंजिन एकदम स्मूथली सुरू होते. अधिक आवाज होत नाही. ५ स्पीड ट्रान्स्मिशन, ४ वॉल्व्हमुळे इंजिनमध्ये रिफाईन्मेंटही दिसून येते. रोनिनमध्ये एसएस, डीएस आणि टीडी असे तीन व्हेरिएंट येतात, ज्यांची दिल्ली एक्स शोरूम किंमत अनुक्रमे १ लाख ४९ हजार, १ लाख ५६ हजार ५००, १ लाख ६८ हजार ७५० इतकी ठेवण्यात आली आहे.

रोनिनची हटके डिझाईन आकर्षित करते. एलईडी हेडलाईटवर ‘टी’ शेप डीआरएल (डे टाईम रनिंग लाईट) लक्ष वेधून घेते. यामुळे रोनिनला एक डिस्टिंक्ट आयडेंटिटी मिळते. ४१ एमएमचे यूएसडी (अपसाईड-डाऊन) फोर्क्स जे या श्रेणीत सर्वात मोठे आहेत. रोनिनच्या टॉप व्हेरिएंटमध्ये फोर्क्सला गोल्डन टच दिला आहे. अधिक रुंद फ्रंट मडगार्ड, ब्लॉक पॅटर्न १७ इंची टायर, ॲरो शेप टर्न इंडिकेटर यामुळे रोनिनचा समोरील लूक भरदास्त दिसतो.

रोनिनमध्ये विशेष काय?

रोनिनमध्ये ‘जीटीटी’ अर्थात ‘ग्लाईड थ्रू टेक्नॉलॉजी’ दिली आहे, ज्याद्वारे ट्राफिकमध्ये कोणत्याही अधिक प्रयत्नांविना कमी वेगातील राईडचा आनंद घेता येतो. यामध्ये एक ते तीन गिअरमध्ये एक्सलरेशन न देताही बाईक १० ते १५ च्या वेगात धावते.

रोनिनमध्ये रेन आणि अर्बन असे दोन ड्राईव्ह मोड्स येतात. तसेच स्लिप-असिस्ट क्लच, फ्रंट-रिअर डिस्क ब्रेक्स, ड्युएल चॅनेल एबीएसही दिले आहेत. यामध्ये फायबरचे इंजिन गार्ड लावण्यात आले आहे. सस्पेन्शचे सेटअपही दर्जेदार असून कोणतेही धक्के जाणवत नाहीत.

रोनिनचे हँडल बार सरळ रचनेत दिले असून, सीटिंग पोझिशनच्या दृष्टीने त्याची ठेवण एकदम योग्य वाटते. सलग काही तास चालवल्यानंतरही हात किंवी पाठीवर ताण येत नाही. पायांची ठेवणही लाँग राईडला अनुसरून आहे. सीट्सही चालक आणि सहप्रवाशासाठी आरामदायी आहेत.

रायडिंग एक्स्पिरिअन्स

रोनिन ३,७५० आरपीएमला १९.९३ एनएम टॉर्क जनरेट करते. त्यामुळे इनिशिअल पिकअप चांगला मिळतो. गिअर शिफ्टिंग स्मूथ असून, वारंवार गिअर शिफ्ट करण्याची गरज पडत नाही. पाचव्या गिअरमध्ये ३० च्या वेगातही बाईक चालवू शकतो. १०० च्या वेगात तितकी व्हायब्रेट होत नाही. हे व्हायब्रेशन केवळ फूटरेस्टला जाणवते. ही बाईक हँडलिंगला थोडी आव्हानात्मक वाटली. टायर्स ग्रिप चांगली असल्याने कॉर्नर राईडला अडचण येत नाही. रोड प्रेझेन्स चांगला आहे. सुमारे ३५० ते ४०० किलोमीटर चालवल्यानंतर रोनिनने सरासरी ३५ ते ३८ चे मायलेज दिले, जे या श्रेणीत तुलनेने पुरेसे आहे.

फीचर्सचे परिपूर्ण पॅकेज

रोनिनच्या हँडल बारवर सिंगल पॉड इन्स्ट्रूमेंट क्लस्टर दिला आहे. यामध्ये स्पीडोमीटर, ऑडोमीटर, फ्यूएल गेज, डिस्टन्स टू एम्प्टी (उपलब्ध फ्युएलमध्ये किती किलोमीटर धावेल), लो फ्युएल वॉर्निंग आणि एबीएस मोड इंडिकेटर आदी फीचर्सचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com