
Pregnancy Tips : प्रेग्नेंसीत सतत खाणं धोक्याचंच! का ते जाणून घ्या नाहीतर...
Pregnancy health Tips: घरातील सुनबाई गोड बातमी देणार आहे. हे समजताच सगळेच जणू तिच्यासाठी प्रोटेक्टीव्ह भूमिका घेताना दिसतात. सुनबाई हे जास्त खा, ते कमी खा, वहिणी माझ्यावेळीही मी हेच जास्त खाल्ल होतं. तूम्हीही ट्राय करा. असं म्हणून नव्यानेच आई होणाऱ्या तिला सतत काहीतरी खाऊ घातलं जातं. याचं कारण म्हणजे तिच होणारं बाळ.
स्त्री गर्भवती असताना तिला हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते. तिच्या खाण्यासाठी स्पेशल, तूप, सुकामेवा असलेले पदार्थ दिले जातात. त्या महिलेला होणारं बाळ सुदृढ जन्माला यावं, तिची प्रसुती सुखरूप व्हावी हाच यामागील उद्देश असतो. ते चुकीचे नाही. पण, या गोष्टींचा वाईट परिणाम तिच्या आरोग्यावर होतो. त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.
गर्भधारणेदरम्यान अनावधानाने वजन वाढण्याचे सर्वात सामान्य कारणांपैकी एक. परंतु अनेक महिला बाळाच्या वाढीस हातभार लावण्यासाठी जास्त खातात. गर्भधारणेदरम्यान, बहुतेक स्त्रीयांचे वजन वाढते तसे बाळाचे वजन वाढते. या अतिरिक्त वजनामध्ये बाळ, प्लेसेंटा, अम्नीओटिक द्रवपदार्थ, वाढलेला रक्त प्रवाह आणि वाढलेले गर्भाशय यांचा समावेश होतो.

Pregnancy Tips Health in Marathi

वजन वाढू देऊ नका
गर्भारपणात वजन वाढणं हे चांगलं असलं तरी डॉक्टर वजन जास्त वाढू न देण्याचा सल्ला देतात. कारण, वाढत्या वजनामूळे प्रसूतीमध्ये अडथळे येऊ शकतात. तसेच थायरॉईड सारखा गंभीर आजारही होऊ शकतो. ज्यामूळे प्रसूती सिझर करावी लागू शकते.
मग प्रेग्नंसीत काय खावं
डॉक्टरांच्या सल्ल्याने डायट सुरू ठेवा. कुटुंबातील लोक कितीही मागे लागले बाळासाठी खा तरीही तूम्ही हट्ट करा. वेळोवेळी चेकअप केल्याने बाळाचं वजन आणि त्याची वाढ लक्षात येते. त्यामूळे बाळाची वाढ योग्य असेल तर उगीचच खात बसू नका.
प्रसूतीनंतर होणाऱ्या समस्या
प्रसूती झाल्यानंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. कारण, आपलं शरीर हट्टी बनलेलं असतं. आपण प्रेग्नंट असताना जितकं वजन वाढवलेलं असतं तितकं ते कमी करणं अधिक महत्त्वाचं असतं. त्यामूळे वजन वाढवण्यावर जास्त फोकस करू नका.

Pregnancy Tips Health in Marathi
खाण्यासोबतच व्यायामही हवा
बाळाची वाढ केवळ सतत खात राहिल्याने होत नाही. तर त्यासाठी योग्य व्यायामही गरजेचा आहे. व्यायाम केल्याने शरीर उगीचच फुगत नाही. तर जे खात आहात ते अंगाला आणि बाळापर्यंत पोहोचतं.

Pregnancy Tips Health in Marathi
प्रसुतीनंतर काय करावं
जर लोकांचे सल्ले ऐकून तूम्ही खात राहिला आणि त्यामूळे तूमचं वजन वाढलं असेल. तर, प्रसूतीनंतर तरी काळजी घ्या. बाळाला पुरेसं दुध मिळत असेल तर तूप, सुकामेवा खाण्यावर भर देऊ नका. या कारणांमुळेही तूमचं वजन कमी होत नाही. नंतर ते अधिकच वाढतं.