
Live In Relationship : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे हे फायदे माहिती आहेत का?
Live In Relationship : लिव्ह-इन रिलेशनशिपविषयी अनेकांच्या मनात अनेक संभ्रम असतात. कुणाला लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणे चांगले वाटते तर कुणाला चुकीचं. हल्ली लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे ही प्रत्येकाची वैयक्तिक चॉइस आहे. याचे अनेक फायदे आहे. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. (Live In Relationship advantages )
एकमेकांसोबत तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवू शकता. त्यामुळे तुम्हाला जोडीदाराला समजून घेण्यास सोपं जातं. जोडप्यांना एकमेकांच्या सवयी, एकमेकांविषयी नवीन गोष्टी जाणून घेण्यास मदत होते.
तुम्ही सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्हाला एकमेकांची सवय होते आणि तुम्ही एकमेकांची कंपनी एन्जॉय करू शकता. तुमची एक गोड फॅमिली तयार होते. तुम्ही प्रत्येक गोष्टी एकमेकांशी शेअर करता आणि तुमची बॉंडीग वाढते.
तुम्ही जेव्हा लिव्ह इन मध्ये राहता तेव्हा भविष्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत आणि त्या कश्या फेस करायच्या आणि त्यासाठी कसं तयार राहायचं, याचा तुम्हाला अंदाज येतो. तुम्हाला फ्युचर प्लॅनिंग करणे सोपी जाते.
लिव्ह इन मध्ये आल्यानंतर लग्नानंतरचं आयुष्य कसं असणार, याची पुर्वकल्पना तुम्हाला येते.
दिवसरात्र पार्टनरसोबत असल्याने आपल्याला पार्टनरच्या सवयी, त्याच्या स्वभाव खूप जवळून अनुभवता येतो. त्याला जवळून समजून घेता येतं.
अनेकदा लिव्ह इन रिलेशनेशिपमध्ये राहल्याने आपण योग्य पार्टनरसोबत आहोत की नाही, याची शाश्वती मिळते. एवढंच काय कधी कधी चुकीच्या व्यक्तीसोबत आपण रिलेशनमध्ये असल्याचं कळल्यावर वेळेआधी नात्यातून बाहेरही पडता येते.
अनेकदा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सुरवातीला काही दिवस चांगले जातात मात्र नंतर भांडणे होण्याची शक्यता असते. पण याच भांडणांमधून तुम्ही बरंच काही शिकू शकता. एकमेकांना समजून घेऊ शकता.