जोडीदार सोबत असताना एकटेपणा जाणवतोय? जाणून घ्या कारणे, उपाय

एकमेकांशी बोला आणि तुमच्या समस्या शेअर करा.
Relationship Tips
Relationship TipsEsakal

जोडीदार (Partner) सोबत असला की, आपण पण खूश असतो. मात्र अनेक कपलमध्ये याउलट असते. जोडीदार सोबत तर असतोच पण नात्यात एकटेपणा (Loneliness) जाणवतो. त्यामुळे अशी बरीच कपल (Couple)असतात जे डिप्रेशनचे शिकारही होतात. जर तुम्हालाही तुमच्या नात्यात (Relationship)एकटेपणा जाणवत असेल तर त्यामागील नेमके काय कारण असू शकते, आणि तुम्ही स्वतःला कसे आनंदी ठेवू शकता हे आज जाणून घेऊया..

Summary

प्रत्येक व्यक्तीसाठी एकटेपणा खूप धोकादायक असतो. अशावेळी बाहेरील जगापासून दूर राहू नका. प्रत्येक नात्याचे सौंदर्य परस्पर संवादाशी निगडीत असते. त्यामुळे नेहमी एकमेकांशी बोला आणि तुमच्या समस्या शेअर करा. तुम्हाला एकटेपणा वाटणार नाही.

एकटेपणा का वाटतो

एकटेपणा जाणवण्याचे महत्वाचे कारण म्हणजे पार्टनरकडून जास्त अपेक्षा ठेवणे. जोडीदाराकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही पण परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्या जोडीदाराचे आणि तुमची ड्यूटी टायमिंग वेगळे असेल तर समजून घ्या. नको त्याठिकाणी अट्टाहास करू नका.

Relationship Tips
मुलींनो, लग्नानंतर आईला सांगू नका पाच गोष्टी!कोणत्या ते वाचा

कमजोर भावनिक बाँडिंग

प्रत्येक नात्यामध्ये इमोशन्समुळे नातं टिकल जाते आणि कोणत्याही वाईट परिस्थितीत एकमेकांना जोडून ठेवण्याचे काम इमोशन्स करतात. जेव्हा इमोशन्सस कमकुवत होतात तेव्हा तुमचे बाँडिंग विस्कळीत होते आणि एकटेपणा जाणवू लागतो.

जोडीदाराला वेळ न देणे

आजकाल व्यस्त लाईफस्टाईलमुळे कधी-कधी आपल्या जोडीदाराला वेळ देऊ शकत नाहीत. मात्र नात्याला खुलवण्यासाठी, नातेसंबंध चांगले होण्यासाठी थोडा वेळ काढण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर सतत कारणे देत असाल तर तुमच्या नात्यात सतत अडचणी निर्माण होतील.

मोबाईलमध्ये व्यस्त असणे

आजकाल मोबाईल म्हणजे आपला जवळचा मित्र आहे असं जणू समीकरणच झाले आहे. याचमुळे नातेसंबंध बिघडू लागले आहेत. आपण फोनमध्ये इतके व्यस्त असता की जोडीदाराशी, पालकांशी बोलायलाही वेळ मिळत नाही. हे देखील तुमच्या एकाकीपणाचे एक कारण असू शकते.

एकटेपणावर मात करण्यासाठी उपाय

नात्यातील एकटेपणावर मात करायची असेल तर जोडीदाराशी बोलून समस्येवर मात करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही सोबत असता तेव्हा फोनचा वापर टाळा. जरी तुमचे छंद वेगवेगळे असतील तरी एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन तुम्ही तुमचा छंद जोपासू शकता. एकमेकांना वेळ द्या.

प्रत्येक व्यक्तीसाठी एकटेपणा खूप धोकादायक असतो. अशावेळी बाहेरील जगापासून दूर राहू नका. प्रत्येक नात्याचे सौंदर्य परस्पर संवादाशी निगडीत असते. त्यामुळे नेहमी एकमेकांशी बोला आणि तुमच्या समस्या शेअर करा. तुम्हाला एकटेपणा वाटणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com