Relationship Tips: तुम्ही दोघं खरंच आहात का Made For Each Other? असं करा चेक!

तुम्हाला खरंच एकमेकांची काळजी आहे का?
Relationship Tips
Relationship Tipsesakal

Relationship Bonding : कधी एखाद्या कार्यक्रमात एक छान जोडपं पाहिलं. जे एकमेकांची काळजी घेत असतात. एकमेकांचा आदर करतात. एकमेकांना काय हवं नको ते पाहतात. तेव्हा असं वाटतं अरे हे तर ‘मेड फॉर इच अदर’ आहेत. पण, जेव्हा त्याउलट एखादी जोडी आपण पाहतो तेव्हा वाटतं की का या दोघांनी लग्न केलं, केलंच आहे तर ते निभावणंही जमायला हवं.

तुम्हीही तुमच्या जोडीदारासोबत खुश असाल. पण, लोकांना तुमच्याकडे पाहून नक्की काय वाटतं. ते तुम्हाला ‘एक दुजे के लिये’ बनलेत असं म्हणत असतील का? की तुमच्यातील मतभेद आणि वाद पाहुन तुमच्या एकत्र राहण्याला ते नावं ठेवत असतील. याबद्दलच आज आपण जाणून घेऊयात.  (Relationship)

जर तुमच्यात मजबूत बॉन्डिंग असेल तर तुमच्यात एक अद्भुत आत्मविश्वास निर्माण होतो. तुम्ही प्रत्येक गोष्टीला नवीन आणि सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्यास सुरुवात करता. तुमचा जोडीदार तुम्हाला कुठेतरी सोडून जाईल अशी भीती तुमच्या मनात नसते.

Relationship Tips
Relationship Tips : पहिल्या डेटवर पार्टनरला असं करा इम्प्रेस

तुम्ही एकमेकांबद्दल काळजी करत नसाल तर तुमच्यातील नाते किती घट्ट आहे हे यावरून दिसून येते. जर तुमचा एकमेकांवर विश्वास आणि विश्वास असेल तर ते तुमचे नाते कधीही तुटू देणार नाही. तुमचं तुमच्या जोडीदारासोबत किती बॉन्डींग आहे. हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही बातमी पुर्ण वाचा. तुमच्या नात्यात आहेत का ही पाच लक्षणं तर

तुमचं बोलणं कसं आहे?

जर तुमच्यात आणि जोडीदारात सर्व काही अलबेल असेल तर असेल ते तुमच्यातील मजबूत नातेसंबंधाचे लक्षण आहे. वास्तविक, जेव्हा तुम्ही दोघंही एकमेकांशी संवाद साधण्याला प्राधान्य देता. तेव्हा तुमच्यातील नातं कधीच कमकुवत होणार नाही.

भांडणात माघार घेता का?

संसार दोघांचाही आहे त्यामुळं भांड्याला भांड लागणारचं. त्यामुळं भांडा, चेष्टा मस्करी करा. पण ते भांडणं मिटवा. भांडणं सुरू ठेवल्यानं नात्यात दुरावा येतो. पण कोणं जिंकतं कोणं नाही यावर इगो मोठा माणून लोकं वाद मिटवायला पाहत नाहीत.

Relationship Tips
Types of Relationships : एवढ्या प्रकारचे असतात लव्ह रिलेशनशिप्स, तुम्ही यातील कोणत्या रिलेशनशिपमध्ये आहात?

एका दिवसापेक्षा जास्त वेळ भांडू नका

भांडण करायला नाही तर मिटवायला पुढाकार घ्या. त्याने किंवा तिने तुमची मनधरणी करावी आणि तुम्ही वाद वाढवावा. हे असंच सुरू असेल तर त्या नात्याला काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे वाद मिटवण्यावर भर द्या. तिनेच विषय काढावा, प्रेमाने बोलावं या अपेक्षा ठेवण्यातच तुमचा सगळा वेळ जातो.  

Relationship Tips
Relationship goals: पहिल्या भेटीत मुलांच्या कोणत्या गोष्टी पोरी करतात नोटिस माहितीये

एकत्र राहणं

अनेक जोडप्यांचा असा प्रॉब्लेम असतो की आमचे जॉब वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यामुळे आम्ही एकत्र राहत नाही. एकत्र राहिलो तरी केवळ रात्री जेवण आणि एकत्र झोपणं इतकाच वेळ आम्हाला मिळतो. पण हे चुक आहे. तुम्ही एकत्र राहता तितका वेळ तुम्ही आनंदी असता की वादच घालता यावरही तुमचं नातं स्पेशल आहे हे समजत.

Relationship Tips
Types of Relationships : एवढ्या प्रकारचे असतात लव्ह रिलेशनशिप्स, तुम्ही यातील कोणत्या रिलेशनशिपमध्ये आहात?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com