Relationship Tips : सगळं काही असूनही जोडीदार ‘एक बाकी एकाकी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relationship Tips

Relationship Tips : सगळं काही असूनही जोडीदार ‘एक बाकी एकाकी’

पूणे : पती –पत्नीमध्ये भांडण होण्याने त्यांच्या नात्यातील गोडवा वाढतो असे म्हणतात. पण, हीच भांडणं जर सतत होत असतील तर नात्यात कडवटपणा अधिक वाढतो. त्यामुळे नाते तूटायला लागते. त्यामुळे समजून घेणे, त्या व्यक्तीसोबत राहणे नको वाटते.

हेही वाचा: Relationship tips : अशाप्रकारे लैंगिक संबंध बनवा अधिक आरोग्यदायी

कारण एकमेकांमधील भावनिक बंध निसटायला लागतात. उद्या लक्ष्मीपूजन आहे. वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळीची सुरूवात होत आहे. अशावेळी पार्टनरसोबत काही वाद झाला असेल. तर त्यामुळे सण समारंभात उत्साह नसतो.

हेही वाचा: Relationship Tips : जोडप्यांनी Bedroom मध्ये ही काळजी घ्यावी, नाहीतर...

नात्यातील भावनिक बंध पती-पत्नीच्या पवित्र नात्याला समृद्ध करतात. पण आजच्या काळात लग्नानंतरही दोघेही नोकरी करणारे असल्याने ते एकमेकांसाठी वेळ देऊ शकत नाहीत. दोघांपैकी एक जोडीदार काम करत नसेल तर काम न करणाऱ्याला अपराधी वाटते. दुर्लक्ष झाल्यासारखे वाटते. मी माझ्या संसारासाठी काहीच करत नाही ही भावना त्याच्या मनात यायला लागते. पार्टनर आपल्याला किंमत देत नाही, मी काही पैसे कमवत नाही, असा समज तो स्वत:च करून घेतो.

हेही वाचा: Relationship tips : या ५ गोष्टी केल्यास जोडीदाराशी तुमचे नाते अधिक दृढ होईल

यामुळेच एकमेकांना वेळ देण खूप महत्त्वाचं आहे. पार्टनरला योग्यवेळी वेळ दिला की मग नात्यातील भांडणात वेळ जात नाही. तूम्ही तूमच्या पार्टनरसाठी सगळं काही करता पण तिला वेळ देत नाही यामुळेच अधिक वाद होतात. याचा परिणाम नात्यावरही होतो. त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी भावनिकदृष्ट्या कसे जोडले जावे, याबद्दल काही टीप्स पाहुयात.

हेही वाचा: Relationship Tips : सेक्स लाइफ डिस्टर्ब झालंय?; कामसूत्राच्या ‘या’ टिप्स करतील मदत!

नात्यात प्रेम कसे वाढवायचे

प्रेम आणि आपुलकीचा प्रवास एकमेकांच्या सुखाचा विचार करण्यापासून सुरू होतो. पार्टनरच्या चुकांवर अधिक रागात प्रतिक्रीया देणं टाळता येऊ शकतं. त्याउलट एकमेकांचे कौतूक करून,सरप्राईज, ट्रिट देऊन नाते अजून घट्ट बनवले जाऊ शकते. कौतुक सर्वांनाच आवडते आणि चांगल्या कामाचा उत्साहही वाढतो. त्यामुळे जोडीदाराची कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर नक्कीच प्रशंसा करा.

हेही वाचा: Relationship Tips : या ‘पाच’ चुका टाळा नाहीतर तुमचे लैंगिक जीवन उध्वस्त होईल

तूम्ही जोडीदाराच्या ड्रेसिंग स्टाईलचे कौतुक कराल तर ते रोज नवे, छान कपडे घालतील. त्यामुळे त्यांच्या मनात पॉझिटीव्हनेस वाढेल. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या दिसण्याचे कौतुक कराल तर तो रोज अधिक छान दिसण्याचा प्रयत्न करेल.

हेही वाचा: Relationship Tip : पुरुषांनो स्त्रीयांबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात बरं

दिवस हसत खेळत घालवणे कोणाला आवडणार नाही. पण, नात्यातील गोडवा कमी झाल्याने सण समारंभात उत्साह नसतो. अशावेळी कधी तरी छोटी ट्रिप काढा. पार्टनरसोबत पून्ही एकदा ते आयुष्य जगा जे तूम्ही लग्नानंतर लग्न नवे असताना जगत होता. कधी लाँग ड्राईव्हला जा, यामुळे तूमच्या नात्यातील भावनिक बंध नक्कीच दृढ होतील.