Relationship Tips : जोडीदारासोबत सतत भांडल्याने होतो हा गंभीर आजार; वाचा संशोधन काय सांगतयं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relationship Tips

Relationship Tips : जोडीदारासोबत सतत भांडल्याने होतो हा गंभीर आजार; वाचा संशोधन काय सांगतयं

Relationship Tips : संसारात भांड्याला भांडे लागले की, पती-पत्नीमधील प्रेम वाढते असे म्हणतात. पण, हे भांडे जर सतत आणि जोरात एकमेकाला धडकत असेल तर प्रेम वाढेल की नाही माहिती नाही.

हेही वाचा: Relationship Tips : घटस्फोटाचा निर्णय तुमचा मात्र स्फोट मुलांच्या मनाचा

पण, त्या दोघांनाही गंभीर आजाराचा सामना करावा लागेल. म्हणजे पती-पत्नीमध्ये सतत वाद, भांडणे (violent figh) होऊन त्यातून कौटुंबिक हिंसाचार घडत असेल तर त्याचा थेट परिणाम दोघांच्याही आरोग्यावर होतो. हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: Relationship Tips : वैवाहिक आयुष्यासाठी उत्तम आहेत या ६ लैंगिक स्थिती

पती-पत्नीमध्ये रोज होणाऱ्या वादात हिंसाचार होत असेल. तर त्याचा दोघांनाही मानसिक आणि शारीरीक त्रास होतो. तरूण वयात झालेला मानसिक आणि शारीरीक त्रासामुळे काही वर्षांनी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

हेही वाचा: Relationship Tips : लग्नानंतर नात्यातील मतभेदांना जा असं सामोरं

यूएस नॅशनल डोमेस्टिक व्हायोलेन्स हॉटलाइन (US National Domestic Violence Hotline) यांच्या अहवालानुसार, 18 ते 34 वयोगटातील महिला व पुरूषांना या वयात शारीरीक अधिक सहन करावा लागतो. हा पेपर अमेरिकन हार्ट असोसिएशन सायंटिफिक सेशन्स 2022 शिकागो (American Heart Association Scientific Sessions 2022 Chicago) येथे 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान सादर केला जाणार आहे.

हेही वाचा: Relationship Tips : 'या' चॉकलेटने सुधारते पुरुषांची लैंगिक क्षमता

शिकागो येथील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या फेनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनमधील (Northwestern University's Feinberg School of Medicine) पेपरच्या प्रमुख लेखक कॅथरीन रेक्टो (Katherine Recto) यांच्या माहितीनूसार ,मानसिक किंवा शारीरीक हिंसाचार (intimate partner violence) हे हृदयविकाराने मृत्यू होण्याचे एक सामान्य कारण आहे. हिंसाचारातून होणारे आघाताचे रूपांतर हृदय आणि रक्तवाहिन्याशी संबंधित आजारांमध्ये होते.

हेही वाचा: Relationship Tips: शारीरिक संबंधासाठी महिला उत्सुक आहे, हे कसं ओळखायचं?

जोडपे एकमेकांना डेट करत असेल किंवा त्यांचे लग्न झाले असेल तरी वाद होतातच. वादातून हिंसाचारासारखे घृणास्पद कृत्य घडते. लोक अशा नात्यातून बाहेर पडले तरी तरूणपणी झालेल्या आघातामुळे त्यांना हृदयविकार होण्याचा धोका 34 टक्क्यांनी वाढतो. मागिल वर्षभराच्या केसेसमधून असे लक्षात आले की, हिंसाचाराला सामोरे गेलेल्या लोकांमध्ये मृत्यूचा धोका 59 टक्क्यांनी वाढला आहे.

हेही वाचा: Relationship Tips: तुमचा पार्टनर तुम्हाला यूज करतोय का? असे ओळखा

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन येथील प्रोफेसर रँडी फोरकर म्हणाले की, केवळ कौटुंबिक हिंसा झाल्यानेच हृदयविकार होतो असे नाही. त्याची अनेक कारणे आहेत. पण, हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी हिंसाचार कमी करावा. तसेच, धूम्रपान, मद्यपान कमी करावे. काही गोष्टी त्रासदायक वाटल्या तर त्यावर लवकर उपचार करावे.