
Relationship Tips : जोडपी एकमेकांवर प्रेम करतात तरीसुद्धा एकत्र आनंदी नाही? रविशंकरांनी सांगितलं कारण
Relationship Tips : नातं टिकवणं हे वाटतं तेवढं सोपं नाही हे नात्यात गुंतल्यानंतरच अनेकांना कळतं. जेव्हा दोन व्यक्ती नात्यात येतात तेव्हा त्यांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. अनेकदा स्वभावातील काही बदलांमुळे नात्यात आधीसारखं काहीच राहीलं नाही असं अनेकांना वाटतं. त्याला आता तुमच्या सुख-दुःखाची पर्वा नाही असेही अनेकांना वाटू लागते.त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ लागतो.
दुसरीकडे हे नातं लाईफ पार्टनर किंवा बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडचं असेल, तर मनातल्या या एका शंकेमुळे वर्षानुवर्षे नातं नकारात्मकता, मतभेद आणि भांडणानं खेचलं जातं. म्हणूनच प्रेमाची योग्य समज असणे खूप महत्वाचे आहे.
आपण सर्वजण प्रेमाने वेढलेले आहोत, काही लोकांना ते अनुभवण्याची संधी देखील मिळते. पण तरीही बहुतेक लोकांचा त्याकडे चुकीचा दृष्टिकोन आहे. यावर आध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर काय सांगतात ते जाणून घेऊया.
श्री श्री रविशंकर यांच्या एका प्रवचनात एका व्यक्तीने नात्यात होणाऱ्या वादविदातून कसे दूर राहता येईल? असा प्रश्न विचारला होता. यावर दिलेल्या उत्तराने तुमचा संभ्रही दूर होईल. आणि तुमच्या नात्यात होणाऱ्या वादावर शांतपणे विचार कराल.
श्री श्री रविशंकर यांनी आनंदी नात्याचा मूलमंत्र सांगितलाय
पार्टनरला प्रेमाचा पुरावा मागू नका
'तुझे माझ्यावर खरोखर प्रेम आहे?' जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला असे कधी सांगितले विचारले असेल तर ते चुकीचे आहे.श्री श्री रविशंकर गुरुजी सांगतात, एखाद्याला त्याच्या प्रेमाचा पुरावा कधीच मागू नये. प्रेम ही खूप खोल भावना आहे, जी कोणत्याही पुराव्याद्वारे व्यक्त केली जाऊ शकत नाही.
प्रेम स्वत:त अनुभवा
प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या, ती व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असू शकते. म्हणूनच एखाद्या व्यक्तीला तुम्हाला हवे असलेले प्रेम दाखवता येत नाही या यावरून त्या व्यक्तीला जज करणे चुकीचे आहे.यावरून त्याचे प्रेम खोटे असल्याचे सिद्ध होत नाही.
गुरूजी म्हणतात की तुमचा जोडीदार किंवा जवळचा कोणीतरी तुम्हाला हवे तसे प्रेम व्यक्त करत नसला तरी आनंदी राहा. स्वतःमध्ये प्रेम अनुभवा आणि समजून घ्या की प्रेम प्रत्येकाच्या मनात असते जरी ते त्यांच्या भावना व्यक्त करत नसले तरीही. (Relationship Tips)
तुमचं प्रेम करणंही पुरेसं आहे
गुरूजी पुढे सांगतात की, हल्ली प्रेम हा एखाद्या बिजनेसप्रमाणे झालाय. जर आपण एखाद्यावर प्रेम केले तर त्या व्यक्तीनेही आपल्यावर तितकेच किंवा त्याहून अधिक प्रेम करावे अशी आपली अपेक्षा असते. आणि जेव्हा तुमचा अपेक्षाभंग होतो तेव्हा नात्यात वाद निर्माण होतात. त्यामुळे एकमेकांवर अपार प्रेम करणारी दोन व्यक्ती एकत्र आनंदी राहू शकत नाही. (Lifestyle)
म्हणूनच श्री श्री रविशंकर गुरुजी म्हणतात की, प्रेम न करणे किंवा व्यक्त न होणे ही तुमची समस्या नसून तुम्ही तसा विचार करणे ही मोठी समस्या आहे. तुम्ही निस्वार्थ मनाने प्रेम केले पाहिजे.
असे केल्याने तुम्ही तुमचे प्रत्येक नाते तुटण्यापासून वाचवू शकता.
डिस्क्लेमर - वरील लेख श्री श्री सद्गुरू यांनी सांगितलेल्या माहितीवर आधारित आहे सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.