
Remedies For Dry Cough :खरं की काय! अननस खाऊन खोकला बरा होतो?
Remedies For Dry Cough : बदलत्या हवामानामुळे आपल्याला छोट्या-मोठ्या आजारांची लागण होते. यातही सर्दी, खोकला आणि ताप येण्याच्या तक्रारी अधिकतर उद्भवतात.
सर्दी आणि तापामुळे खोकल्याचा त्रास अधिक बळावतो. त्यातही कोरडा खोकला त्रासदायक असतो. योग्य वेळेत यावर उपाय केल्यास तुम्हाला आराम मिळेल. पण दुर्लक्ष केलं तर प्रकृती गंभीर देखील होऊ शकते.
खोकल्याचा त्रास कमी प्रमाणात असला तरीही त्यावर उपाय करणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही घरगुती तसंच नैसर्गिक उपचारांची मदत तुम्ही घेऊ शकता. सर्दी, खोकला होणे ही छोटी समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका.
याच निष्काळजीपणामुळे गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. आजारांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी आपल्या आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.
गुळाच्या मदतीने खोकला दूर होईल
खोकला कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून आल्याचा फार पूर्वीपासून वापर केला जात आहे. आल्याचा छोटा तुकडा बारीक कुटून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा. हे मिश्रण आता आपल्या दाढेखाली ठेवा आणि त्याचा रस हळूहळू घशामध्ये उतरू द्या किंवा जो रस निघेल तो गिळत राहा.
पाच मिनिटांनंतर आले बाहेर फेका आणि कोमट किंवा साध्या पाण्याने गुळण्या करा. पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ आले तोंडामध्ये ठेवू नका.
खोकला बरा होण्यासाठी चहा, शेंगदाणे किंवा तीळ सोबत गुळाचे सेवन करू शकता. याशिवाय आले गरम करून गुळासोबत खावे. याच्या मदतीने खोकल्याची समस्या दूर होऊ शकते.
दालचिनीने मिळेल आराम
किचनमधील एक महत्त्वाचा असलेला मसाला तुमचा खोकला पळवून लावू शकतो. तुम्ही खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी दालचिनीचे सेवन करू शकता.
दालचिनी हे अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे, ज्यामुळे खोकला आराम मिळतो. तुम्ही दालचिनीचा चहाही घेऊ शकता. तर, किंवा खोकल्यासाठी बनवल्या जाणाऱ्या तुळशीच्या काढ्यातही दालचिनी घालू शकता.
लसूण
खोकल्यापासून लवकरात लवकर सुटका व्हावी असं वाटतं असेल तर लसणाचे सेवन करू शकता. कारण, लसणात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म खोकला घालवण्यात मदत करतो.
अननस
खोकला आल्यावर अननसाचे सेवन करा. अननस खाल्ल्याने तुमच्या शरीराला भरपूर व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात, ज्यामुळे खोकला आणि श्लेष्माचा त्रास नैसर्गिकरित्या कमी होतो.
गरम पाण्याची वाफ
सर्दी खोकल्यामुळे कधी कधी आपल्याला श्वास घेणे सुद्धा कठीण होते. अशावेळी गरम पाण्याची वाफ घ्यावी. गरम पाण्याच्या वाफेमुळे कफ बाहेर पडतो.
श्वासोच्छवास करताना होणाऱ्या अडचणी दूर होतात. तसंच चेहऱ्यावरील रोम छिद्रांमध्ये जमा झालेली धूळ, माती आणि दुर्गंध देखील बाहेर फेकली जाते. पण आठवड्यातून दोन वेळाच हा उपाय करावा. अन्यथा चेहऱ्याच्या त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात.
तुळशीची पाने
कोरड्या खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी तुळशीची पाने देखील खूप फायदेशीर आहेत. तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, जे सर्दी आणि फ्ल्यूची लक्षणेही कमी करण्यास उपयुक्त ठरतात. रात्री झोपण्यापूर्वी तुळशीची काही पाने मधासोबत खावीत. यामुळे तुमचा खोकला खूप कमी होईल.
काळी मिरी व मीठ
कोरडा खोकला दूर करण्याचा आणखी एक चांगला मार्ग म्हणजे काळी मिरी आणि मीठ यांचे सेवन करणे. त्यासाठी एका भांड्यात कुटलेली किंवा पावडर केलेली काळी मिरी घ्या आणि त्यात थोडेसे मीठ घाला. नंतर त्यामध्ये थोडा मधही घालावा. झोपण्यापूर्वी नियमितपणे या मिश्रणाचे सेवन केल्यास रात्री कोरडा खोकला येत नाही.