काय सांगता! कुत्र्यांनाही फोनवरुन मालकाशी बोलता येणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dog
काय सांगता! कुत्र्यांनाही फोनवरुन मालकाशी बोलता येणार?

काय सांगता! कुत्र्यांनाही फोनवरुन मालकाशी बोलता येणार?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अनेक लोकांना घरी कुत्रा पाळायला आवडतो. या कुत्र्यांना घरातले लोकं छान प्रशिक्षित करतात. घरातल्या लोकांबरोबर त्याचा संवाद पाहून, एेकणं पाहून पाहणाऱ्यांचा विश्वासच बसत नाही. म्हणूनच की काय एक पाऊल पुढे जात आता शास्त्रज्ञांनी डॉगफोन डिव्हाईस तयार केला आहे. यामुळे घरात असलेल्या कुत्र्यांना त्यांच्या मालकांशी बोलता येईल. शास्त्रज्ञांनी प्रोटोटाइप डॉगफोन उपकरण तयार केले असून ते डिव्हाइस बॉल सारखे दिसते. ते कॉम्प्युटरला जोडता येते. त्यामुळे हालचाली ओळखणे सोपे जाते. याच्या मदतीने तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता. अशा प्रकारचा हा पहिला शोध असल्याचे सांगितले जात आहे. ग्लासगो विद्यापीठातील डॉ. इलियेना यांनी आल्टो विद्यापीठातील सहकाऱ्यासह हे उपकरण तयार केले आहे.

हेही वाचा: Startup : नीट झोप येत नाही? तर वापरा ‘झेड स्लिप केअर’ यंत्र

असे घडले उपकरण

आपला 10 वर्षांचा कुत्रा जॅकसाठीण डॉ. इलियेना हिरस्कीज-डग्लस (Dr Ilyena Hirskyj-Douglas) यांनी हे उपकरण बनवले आहे. इलियेना या अॅनिमल-कम्युटर इंटरअॅक्शनमध्ये मास्टर आहे. त्यांचे म्हणणे आहे की, इंटरनेटशी जोडलेली सर्व स्मार्ट खेळणी सध्या बाजारात उपलब्ध आहेत. तरीही कुत्र्यांच्या मालकांना त्यांच्या पाळीव प्राण्यांशी बांधून राहण्यासाठी एक उपकरण हवे आहे. जेव्हा जॅकने डॉग फोन डिव्हाइस वापरला, तेव्हा अनेक वेळा अपघाताने घडला, अनेक वेळा त्याने स्वतः कॉल केला. जेव्हा चेंडू हलला तेव्हा त्यातील एक्सेलेरोमीटरने काम केले आणि यामुळे व्हिडिओ कॉल लागला, ही चांगली गोष्ट झाल्याचे इलियेना सांगतात.

दूर राहून असे करा बोलणे

इलियेना 16 दिवसांसाठी बाहेर असताना तिने जॅकला हे उपकरण दिले. त्याने अनेकवेळा फोन केला तेव्हा इलियानाला स्क्रीनवर पाहून जॅकला खूपच आनंद झाला. घरी असताना जशी तो तिला आपली खेळणी दाखवायचा तशीच खेळणी त्याला तिला दाखवायची होती. तिने जॅकला आपल्या आजूबाजूचे वातावरण दाखविण्याचा प्रयत्न केला. जॅकला इलियेनापासून लांब असतानाही तिच्याशी फोनवर बोलायचे होते, हे यातून स्पष्ट झाले. हे उपकरण सुधारण्यासाठी अजूनही संशोधन सुरू आहे.

हेही वाचा: World Men's Day : पुरुषांना असतो "या" कामात इंटरेस्ट

loading image
go to top