Rishabh Pant: कसा असतो आइस पॅक?गुडघ्यांना बांधताच ऋषभ पंतचंही दुखणं होतं गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishabh Pant Ice Pack

Rishabh Pant: कसा असतो आइस पॅक?गुडघ्यांना बांधताच ऋषभ पंतचंही दुखणं होतं गायब

Health: आयसीसी टी -20 वर्ल्ड कप टूर्नामेंटमध्ये भारतीय टीमची पहिली मॅच पार पडली. यात ऑस्ट्रेलियाला यश मिळाल. यानंतर मात्र भारतीय खेळाडू परत एकदा चर्चेत आले. के.एल राहुल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, ऋषभ पंत आणि बऱ्याच खेळांडूचा नेटकऱ्यांच्या चर्चेत कायमच समावेश असतो. नुकत्याच पार पडलेल्या मॅचमध्ये ऋषभ पंतने ना गोलंदाजी केली ना विकेटकिंपींग केली. त्यामागचं कारण काय ते जाणून घ्या. तुम्हालाही होईल फायदा.

वृषभ पंतच्या गुडघ्यांना झाली ईजा

ऋषभला चाहत्यांनी जेव्हा टेलीव्हिजनवर बघितले तेव्हा त्याच्या गुडघ्यांना आइस पॅक लाउन तो बसलेला दिसला. त्याच्या आइस पॅक लावलेल्या गुडघ्यावर अनेकांची नजर गेली. आणि अनेकांना अनेक प्रश्नही पडले. माहितीनुसार नेट्स दरम्यान त्याच्या गुडघ्याला ईजा झाली होती. त्यामुळे त्याने गुडघ्याला आइस पॅक लावला होता.

आइस पॅक शरीरात कसं काम करतं?

शरीरातील अनेक भागांवरील सूजन कमी करण्यास बर्फाची महत्वाची भूमिका असते. विशेषत: मासपेशींवर किंवा पायावर सूजन आल्यास बर्फाचा शेक दिल्यास तुम्हाला दुखण्यापासून दिलासा मिळतो. सूजन कमी करण्यासाठी एका कपड्यात चार ते पाच बर्फाचे तुकडे टाकून त्याचा शेक दिल्यास लवकर आराम मिळतो. क्रिकेटकिपरला मॅचदरम्यान कायम उठबस करावं लागतं. त्यामुळे गुडघ्यांना ईजा होण्याची शक्यता असते. असे झाल्यास मॅच टीमचंही टेंशन वाढतं.

हेही वाचा: Health: अंजीर खाण्याचे अनेक फायदे, मात्र अंजीर खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे काय?

तुम्हालाही जर गुडघ्याचं दुखणं जाणवलं तर हा उपाय तुमचं दुखणं काही वेळात घालवू शकतो. प्रसिद्ध क्रिकेटपटू देखील हेच उपाय करत असतात. मॅचबाबत बोलायचं झाल्यास अंतिम सामन्यात १२ बॉलिंगने ऑस्ट्रिलियाने भारताला हरवलं. टीम इंडियाने सात विकेटमध्ये १८६ रन काढलेत.