तुमच्या आवडीप्रमाणे बनवा तुमची बुलेट

Royal-Enfield
Royal-Enfield

कोणत्याही बाईक रायडरला त्याची बाईक म्हणजे जीव की प्राण असते. त्यात ती बाईक त्यालाच बनवायला मिळाली तर... आणि ती बुलेट असेल तर... तर मजाच काही और आहे... अलॉईजची खास जोडी, वेगळ्या प्रकारच्‍या सीट्स व लेदर्स, टँक डीकल किंवा स्टिकर, बीस्‍पोक मिलिटरी-स्‍टाइल पॅनिअर्स, कमांडिंग एअर-फ्लाय इंजिन गार्ड यांना ते स्‍वत:चे लुक देऊ पाहतात.

रॉयल एनफिल्‍ड मोटरसायकल्‍स त्‍यांच्‍या अनोख्‍या, सुलभ, स्‍पर्धात्‍मक व धातूमय डिझाइनसाठी ओळखल्‍या जातात. ही डिझाइन कस्टमायझेशनसाठी अत्‍यंत योग्‍य आहे. दशकांपासून राइडिंग उत्‍साहींनी रॉयल एनफिल्‍ड मोटरसायकल्‍सना पर्सनलाईझ व कस्टमाईझ लूक दिला आहे. म्‍हणजेच त्‍यांनी मोटरसायकलला स्‍वत:ला आवडणारे लूक दिले आहेत.

राइडिंगसाठी ही अस्‍सल स्‍वयं-अभिव्‍यक्‍ती व आवडीमधून प्रेरणा घेत रॉयल एनफिल्‍डने आज नवीन उपक्रम रॉयल एनफिल्‍ड मेक युअर ओन'च्‍या सादरीकरणाची घोषणा केली. हा उपक्रम ग्राहकांना खरेदीनंतर त्‍यांच्‍या मोटरसायकल्‍सचे पर्सनलाईझ व कस्टमाईझ करण्‍याची सुविधा देतो. हा नवीन उपक्रम अद्वितीय व अशा प्रकारचा पहिला उपक्रम आहे. ग्राहक बुकिंगच्‍या वेळी अॅक्‍सेसरीजच्‍या निवडीसह त्‍याच्‍या किंवा तिच्‍या मोटरसायकलला कस्टमाईझ लूक देऊ शकतो आणि अस्‍सल व होमोलोगेटेड पार्टस् व अॅक्‍सेसरीज असलेली फॅक्‍टरी-फिटेड वैयक्तिकरण मोटरसायकल मिळवू शकतो.

या नवीन उपक्रमाबा‍बत बोलताना रॉयल एनफिल्‍डचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विनोद दासरी म्‍हणाले, ''एखाद्याच्‍या मोटरसायकलचे पर्सनलाईझ व अॅक्‍सेसरायझिंग करणे हे हौशी मोटरसायकलिस्‍टसाठी अत्‍यंत खास असते. रॉयल एनफिल्‍ड मोटरसायकल्‍समध्‍ये वर्षानुवर्षे कस्टमाईझ बदल करण्‍यात आलेले आहेत. आमचा राइडिंग समुदाय व उत्‍साहींनी आम्‍हाला नेहमीच नवीन विचार व उपक्रम सादर करण्‍यामध्‍ये प्रेरित केले आहे. मेक युअर ओन हा अनोखा प्रकल्‍प आहे आणि आम्‍हाला प्रेरित केलेल्‍या आमच्‍या सर्जनशील राइडिंग समुदायाचे प्रतिबिंब आहे. मेक युअर ओनसह ग्राहक बुकिंगच्‍या वेळी काही सुलभ पाय-यांमध्‍ये त्‍यांची मोटरसायकल बुक व सानुकूल करू शकतात. हा नवीन उपक्रम ग्राहकांना ब्रॅण्‍डसोबत संलग्‍न होण्‍याची आणि अॅक्‍सेसरीज व वैयक्तिकरणासह अधिक मार्ग अनुभवण्‍याची संधी देतो. आमच्‍या स्‍टोअर्समध्‍ये आमच्‍या ग्राहकांना अधिक प्रभावी अनुभव मिळावा आणि ते त्‍यांच्‍या मोटरसायकल्‍सच्‍या माध्‍यमातून त्‍यांचे स्‍वत:चे अद्वितीय वैयक्तिकरण सादर करण्‍यामध्‍ये सक्षम व्‍हावेत अशी आमची इच्‍छा आहे.''

मेक युअर ओनच्‍या माध्‍यमातून ग्राहकांना बुकिंगच्‍या वेळी फॅक्‍टरी-फिटेड आणि विश्‍वसनीय व अस्‍सल मोटरसायकल अॅक्‍सेसरीजचा लाभ मिळतो. या अॅक्‍सेसरीजवर दोन वर्षांची वॉरण्‍टी देखील आहे. यामुळे ग्राहकांचा स्‍टॉक मोटरसायकल खरेदी करण्‍याचा त्रास दूर होतो आणि त्‍यांना स्‍वतंत्रपणे अॅक्‍सेसरीज खरेदी करता येतात. ग्राहक अनेक कार्यात्‍मक व सौंदर्यात्‍मकदृष्‍ट्या आकर्षक अस्‍सल फॅक्‍टरी-फिटेड मोटरसायकल अॅक्‍सेसरीजमधून निवड करू शकतात आणि फ्यूएल टँक किंवा साइड पॅनेल स्टिकर्सना वैयक्तिक लुक देऊ शकतात. सुरूवातीला मेक युअर ओन उपक्रम दिल्‍ली एनसीआर, बेंगळुरू, चेन्‍नई, हैद्राबाद, मुंबई व पुणे या ६ शहरांमधील १४१ स्‍टोअर्समध्‍ये राबवण्‍यात येणार आहे.

ग्राहक इंजिन गार्डस्, पॅनियर्स व रिअर लगेज रॅक सारखी वेगळी सामान सुविधा, अधिक आरामासाठी टूरिंग सीट पर्याय, एआरएआय प्रमाणित अलॉय व्हील्‍स आणि विविध इतर बीट्स व बॉब्‍स अशा संरक्षणात्‍मक पर्यायांमधून त्‍यांच्‍या मोटरसायकल्‍सचे कस्टमाईझ करू शकतात. पुढील बाजूचे वै‍यक्तिकरण करण्‍यासाठी ग्राहक फ्यूएल टँक व साइड पॅनेल स्टिकर्सच्‍या पर्यायांमधून निवड करू शकतात आणि त्‍यांच्‍या मोटरसायकलला अद्वितीय लुक देऊ शकतात. रॉयल एनफिल्‍ड जेन्‍यूएन मोटरसायकल अॅक्‍सेसरीज सुरक्षितता व दर्जाच्‍या खात्रीसह येतात. या अॅक्‍सेसरीज मोटरसायकलसह विकसित व डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत. ज्‍यामुळे योग्‍यरित्‍या फिटिंग, सखोल चाचणी व प्रमाणीकरणाची खात्री मिळते. या अॅक्‍सेसरीजवर दोन वर्षांची वॉरण्‍टी आहे.

सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये मेक युअर ओन उपक्रम नवीन क्‍लासिक ३५० मोटरसायकल बुकिंग करणा-या ग्राहकांसाठी लागू असेल. ही मोटरसायकल मर्क्‍युरी सिल्‍व्‍हर आणि प्‍युअर ब्‍लॅक या दोन नवीन रंगांमध्‍ये सादर करण्‍यात आली आहे. नवीन क्‍लासिक ३५० व्‍हेरिएण्‍ट सिंगल चॅनेल फ्रण्‍ट एबीएससह उपलब्‍ध आहे आणि १४५,९७५/- रूपये (एक्‍स–शोरूम- चेन्‍नई) किंमतीमध्‍ये सादर करण्‍यात आली आहे. हा उपक्रम टप्‍प्‍याटप्‍प्‍याने इतर रॉयल एनफिल्‍ड मोटरसायकल मॉडेल्‍ससाठी लागू करण्‍यात येईल.

नवीन क्‍लासिक ३५० व्‍हेरिएण्‍टबाबत बोलताना रॉयल एनफिल्‍डचे मुख्‍य व्‍यावसायिक अधिकारी ललित मलिक म्‍हणाले, ''सानुकूलता हा रॉयल एनफिल्‍डसाठी नेहमीच महत्‍त्‍वाचा कोनशिला राहिला आहे. आम्‍ही उपलब्‍धता, राइड अनुभव व मालकीहक्‍क या पैलूंसंदर्भात आमच्‍या मोटरसायकल्‍स सर्वोत्‍तम असण्‍याप्रती सातत्‍याने काम केले आहे. क्‍लासिक ३५०ने जवळपास दशकापासून मध्‍यम-आकाराच्‍या मोटरसायकल विभागावर प्रभुत्‍व गाजवले आहे आणि जगभरातून या व्‍हेरिएण्‍टला अद्वितीय यश मिळाले आहे. आम्‍हाला आज या फ्रँचायझीला अधिक विस्‍तारित करत दोन नवीन रंगांमध्‍ये आयकॉनिक रॉयल एनफिल्‍ड क्‍लासिक ३५० सादर करण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, नवीन व्‍हेरिएण्‍ट्स रॉयल एनफिल्‍ड समुदायामध्‍ये अधिक राइडिंग उत्‍साहींची भर करतील. नवीन क्‍लासिक ३५० लहान नगर व शहरांमधील महत्‍त्‍वाकांक्षी राइडर्सना 'प्‍युअर मोटरसायकलिंग'च्‍या विश्‍वामध्‍ये सामावून घेण्‍यासाठी परिपूर्ण मोटरसायकल आहे, यावर आम्‍हाला विश्‍वास आहे.''  

नवीन क्‍लासिक ३५० मध्‍ये आधुनिक राइडर्सच्‍या स्‍टाइलची भावना आहे. त्‍यांना सतत खरीखुरी मोटरसायकल चालवण्‍याचा अनुभव मिळत राहील. हा संपन्‍न वारसा पुढे घेऊन जात रॉयल एनफिल्‍ड दशकाहून अधिक काळापासून अद्वितीय यश मिळालेल्‍या प्रमुख क्‍लासिक सिरीजमध्‍ये नवनवीन सुधारणा करण्‍याचे काम सुरूच ठेवते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com