Safe Holi Celebration : होळीचे रंग हृदयाचे आरोग्य बेरंग करतील?काय आहे तज्ज्ञांचे मत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Safe Holi Celebration

Safe Holi Celebration : होळीचे रंग हृदयाचे आरोग्य बेरंग करतील?काय आहे तज्ज्ञांचे मत!

होळीच नाव ऐतलं की अनेकांच्या मनात नवा उत्साह संचारतो. लहानपणीच्या रंग खेळाच्या आठवणी आताही ताजेतवाणे करतात. कारण होळी हा रंगांचा सण आहे. होळीचे रंग आपल्याला आनंद देतात आणि कधीही आठवलं तरी आपला मूड ठिक करतात.

होळीचा सण साजरा करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्लॅनिंग झालेले असते. रंग खेळण्यासाठी शॉवर, कलर, लोकेशन असे सगळे प्लॅनिंग झालेले असते. पण, रंग खेळल्याने अनेक आजार उद्भवतात. होळी खेळताना योग्य ती काळजी घेतली नाही तर हे रंग आपल्यासाठी घातकही ठरू शकतात. (Safe Holi Celebration : holi colours harmful for skin and heart patients)

उत्तरप्रदेशमधील एका डॉक्टरांनी असे सांगितले की, रंग हृदयासाठी घातक ठरू शकतात. त्यामूळे रंग खेळताना योग्य ती काळजी घ्यावी. रंग अंगावर उडवताना त्याची धूळ उडल्याने लोकांना श्वसनाचे आजार होतात. त्यामूळे श्वसनाचे, बीपी, दम्याचे आजार असलेल्या लोकांनी सतर्क रहावे असा सल्ला डॉक्टर देतात.

तसेच, केमिकलयुक्त रंग आपल्या शरीराला चिटकून बसतात. ते पटकन निघत नाहीत. ते त्वचेतून आपल्या रक्तात मिसळतात. त्यामूळे हृदय रोग उद्भवू शकतो, असेही डॉक्टरांनी सांगितले. त्यामूळे हृदय रोग असलेल्या लोकांनी केमिकलयुक्त रंगांपासून दूर रहावे असा सल्लाही डॉक्टरांनी दिला.    

रंगांमध्ये असलेले केमिकल केवळ बाह्य त्वचेवरच नाही. तर आपल्या अंतर्गत अवयवांवर, जसे की मूत्रपिंड, यकृत यांनाही इजा पोहोचवते. गर्भवती स्त्रीयांनीही विशेष काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टर देतात.