नवीन फॅशन ट्राय करताय? मग या बुटीकमध्ये याच!

टीम ईसकाळ
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

सीमा अचलकर या मागील वीस वर्षांपासून बुटिकच्या व्यवसायात आहेत. त्यांनी आपल्या अनुभव, संवाद आणि महिला ग्राहकांना विशेषतः तरूण मुलींना काय हवं हे जाणत लोकप्रिय असा व्यवसाय उभा केला आहे.  

फॅशन म्हणजे काही आखीव रेखीव डिझाईन नाही. सध्या तरूण- तरूणी व्यक्तिमत्व, आवडीनुसार वेशभूषा ठरवतात आपल्याला काय आवडेल ते वापरण्याला प्राधान्य देतात. असे चित्र सर्वत्र दिसते. पण मॉलमध्ये हँगरवर असेलला प्रत्येक रेडिमेड ड्रेस तुमच्या व्यक्तिमत्वाशी मॅच होतोच असे नाही. त्यासाठी व्यक्तिमत्व, स्वभाव, आवडीनुसार ड्रेस तयार करून घेण्यासाठी बुटिकचा पर्याय उत्तम ठरतो. 

पण बुटिकचा व्यवसाय देखील सोपा नाही. आपण स्वतः अपडेट राहण्यासोबतच ग्राहकांची आवड जाणनं, नव्या गोष्टी त्यांना समजावून सांगणे, त्यांच्या व्यक्तिमत्वानुसार वेशभुषेसंबंधाने त्यांच्यात अभिरूची निर्माण करणं एक आव्हान असते, आणि हे आव्हान आम्ही अनुभवाच्या जोरावर मागील सुमारे वीस वर्षांपासून पेललं असल्याचे सीमाज् फॅशन स्टुडिओच्या (सीमाज् रॅक) संचालिका सीमा विकास अचलकर विश्वासाने सांगतात...

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सीमा अचलकर या मागील वीस वर्षांपासून बुटिकच्या व्यवसायात आहेत. त्यांनी आपल्या अनुभव, संवाद आणि महिला ग्राहकांना विशेषतः तरूण मुलींना काय हवं हे जाणत लोकप्रिय असा व्यवसाय उभा केला आहे.  

डिझायनर, कुशल व अनुभवी कारागीर, स्टोअर अॅडमीन व इतर सहकारी असे मिळून सुमारे पंधरा जणांची टीम त्यांच्याकडे आहे. इंडियन, वेस्टर्न, कॅज्युअल्स, वेडिंग ड्रेस आणि ब्लाऊज डिझायनिंग अशा व आदी विविध प्रकारच्या सेवा प्रभात रोड, कमला नेहरू पार्क समोर असलेल्या विस्तीर्ण अशा सीमाज् फॅशन स्टुडिओ (सीमाज् रॅक) मधून दिल्या जात आहेत. 

ग्राहकांना अनेक उत्तम पर्याय देता यावेत यासाठी डिझायनिंग व फॅब्रिकबद्दल पॅशनेट असलेल्या सीमा अचलकर यासाठी देशभरात विविध शहरांना भेटी देतात. तिथे नवीन काय आहे, ट्रेंड काय आहे, याचा अभ्यास करतात.. आपल्या इथे येणाऱ्या ग्राहकांना त्यांची ओळख कशी करून देता येईल यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. प्रसिद्ध गायिका बेला शेंडे, सावनी शेंडे, सावनी रवींद्र, प्रियंका बर्वे, योगिता गोडबोले या व अशा अनेकविध सेलिब्रेटिजसाठी सौ. सीमा अचलकर यांनी ड्रेस डिझाईन केलेले आहेत.  

प्रत्येक ग्राहकांची आवड -निवड विस्ताराने जाणून, त्यांना कशा प्रकारातील मटेरिअल व डिझाईन हवे आहे..?  त्यानुसार त्यांच्याशी दोन तीन वेळा स्वतंत्रपणे संवाद साधून त्यांच्यासाठीचा ड्रेस डिझाईन करण्याची वेगळी व्यवस्था त्यांनी उभी केली आहे. मागील सुमारे वीस वर्षांपासून हे काम त्या समर्पित भावनेने करत आल्या आहेत, त्यामुळेच आम्ही ग्राहकांचा विश्वास संपादन करू शकलो, हे त्या आवर्जून सांगतात. 

ग्राहकाचा विश्वास संपादन करताना, त्यांची आवड जाणून घेताना त्यांच्याशी संवाद हा महत्त्वाचा आहे. त्यांची आवड, मानसिकता, व्यक्तिमत्वानुसार त्यांना डिझाईनचे योग्य संख्येने पर्याय देतो. नंतर ते प्रत्यक्षात ड्रेस डिझाईन करतो... अशा प्रकारे ग्राहक समाधानाचा प्रवास आम्ही पूर्ण करीत आलेले आहोत... असे सीमा अचलकर अभिमानाने सांगतात.

सीमाज् फॅशन स्टुडिओच्या (सीमाज् रॅक) विस्तार व भविष्यकालीन योजनेचा भाग म्हणून त्यांना आता वॉर्डरोब कन्सलटिंग क्षेत्रात देखील पदार्पण केले आहे. त्याचासाठी एक नवा कोरा स्टुडिओ देखील त्यांनी सुरू केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seema s Fashion studio blog by Seema Achalkar