skin tips
skin tipsesakal

लग्न-समारंभात चेहऱ्यावर थकवा आलाय? असा मिळवा चुटकीसरशी ग्लो

लग्नादिवशी अनेकदा वधू-वरांना कंटाळा येऊ लागतो. त्यामुळे स्कीनही निस्तेज दिसू लागते.
Summary

लग्नादिवशी अनेकदा वधू-वरांना कंटाळा येऊ लागतो. त्यामुळे स्कीनही निस्तेज दिसू लागते.

लग्न (Marriage) हा आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय क्षण असतो, त्यामुळे त्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट तुमच्याशी जोडलेली राहते. यावेळी, तुम्हाला प्रत्येक गोष्ट परफेक्ट (Perfect)हवी असते, मग तो लुक असो किंवा लग्नाचा कार्यक्रम. लग्नादिवशी अनेकदा वधू-वरांना कंटाळा येऊ लागतो. त्यामुळे स्कीनही निस्तेज दिसू लागते. मात्र, लग्नाच्या दिवशीचा मेकअप (Makeup)तुमच्या लुकमध्ये भर घालतो. पण लग्न झाल्यानंतर स्कीनला फ्रेश ठेवणे आणि स्कीनचा ग्लो (Natural glow) परत येणे आवश्यक आहे. यासाठी त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. अशावेळी या काही टिप्स आहेत ज्या तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

skin tips
कॉफीमुळे तु्म्हाला थकवा येतो का? जाणून घ्या कारणे आणि उपाय

मेकअप (Makeup)व्यवस्थित काढा

लग्नावेळी अनेक कार्यक्रम असतात जे काही दिवस आधीच सुरू होतात. अशा परिस्थितीत तुमची त्वचा सुंदर दिसण्यासाठी तुम्ही मेकअपचा (Makeup) वापर करा. मात्र, लग्नानंतर ती चमक परत येण्यासाठी मेकअपपासून दूर राहिले पाहिजे. नववधूंच्या बाबतीत असे घडत नसले तरी अशा परिस्थितीत तुम्ही मेकअप करत असाल, तर कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर तो मेकअप व्यवस्थित काढा.

स्कीनला हायड्रेट (Hydrate) करा

लग्नाच्या दिवसात खाण्याच्या सवयींमध्ये फरक पडतो. अशावेळी तुमची त्वचा कोरडी (ड्राय) पडू लागते. अशा परिस्थितीत, आपल्या त्वचेला मॉइश्चरायझ करणे आणि त्याचा नियमित वापर करणे महत्वाचे आहे. स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे देखील खूप महत्वाचे आहे.

skin tips
ओला खजूर, पोषणमूल्य भरपूर; थकवा दूर करण्यास होते मदत

आहाराकडे लक्ष द्या

लग्नानंतर संतुलित आहाराकडे जाणे खूप गरजेचे आहे. नवीन नववधू (The bride) हे करू शकत नाहीत, कारण नवीन लोकांमध्ये मिक्स व्हायला थोडा वेळ लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मल्टीविटामिन टॅब्लेट घेऊ शकता.

डोळ्यांचा थकवा दूर करा

डोळे थकले की चेहरा आपोआपच निस्तेज (डल) दिसू लागतो. अशा स्थितीत दोन टी बॅग्स काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि डोळ्यांना लावा. यामुळे डोळ्यांची सूज आणि थकवा कमी होण्यास मदत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com