Anti Aging : ना कुठलं क्रिम, ना कुठला मेकअप; फक्त या पदार्थांनी रहा दीर्घकाळ तरुण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anti Aging Food

Anti Aging : ना कुठलं क्रिम, ना कुठला मेकअप; फक्त या पदार्थांनी रहा दीर्घकाळ तरुण...

Anti Aging Food: तरुण दिसायला कोणाला आवडतं नाही? दीर्घकाळ तारुण्याची हाव अनेकांना असते. अगदी पुराणात म्हटलं की शरीर कधी ना कधी संपेलच आणि आपण आपलं वर्तन चांगलं ठेवलं पाहिजे. तरी ययातिचे धडे विसरायला नको. अर्थात तरुण (young and healthy) दिसण्यासाठी ययाति इतकं मोठं काही करणं अशक्यच आहे.

प्रत्येकजण दीर्घकाळ सुंदर आणि तरुण दिसण्याची इच्छा बाळगतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही वृद्धत्वामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषांमुळे चिंतेत असाल तर आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत, त्यांचा आहारात समावेश करून तुम्ही दीर्घकाळ तरूण दिसू शकता. 

त्वचेची देखभाल करण्यासाठी तसंच त्वचा चिरतरुण राहावी, यासाठी नियमित फेस पॅक लावण्याची आवश्यकता नाहीये. स्किन केअर रुटीनसह आहारामध्ये काही पौष्टिक खाद्यपदार्थाचा (Skin Care Food) समावेश केल्यासही त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. तज्ज्ञमंडळीच्या सल्ल्यानुसार आहारामध्ये पोषक घटकांचा समावेश केल्यास वृद्धत्वाची लक्षणे कमी होऊ शकतात.

आपण आपल्या आवडीनुसार व डाएटिशियनच्या सल्ल्यानुसार आहारामध्ये शाकाहारी तसंच मांसाहारी पदार्थांचा पर्याय निवडू शकता. पण संतुलित आहाराचे (Balanced Diet To Control Ageing) सेवन करण्याचाच प्रयत्न नेहमी करावा. जेणेकरून शरीराला मुबलक प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होईल आणि त्वचा चिरतरुण राहील.

या पदार्थांमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म आहेत जे तुमच्या त्वचेतील घट्टपणा वाढवतात ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या कमी दिसतात, चला तर मग जाणून घेऊया अॅन्टी एजिंग (Anti Aging Food) फूडबद्दल....

पपई (Papaya) :

जर तुम्हाला दीर्घकाळ तरुण दिसायचे असेल तर पपईचा आहारात नक्कीच समावेश करा. पपई खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होते. याशिवाय पपईचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

व्हिटॅमिन सी असलेले फ्रूट (Vitamin C Fruits) :

जर तुम्हाला स्वतःला दीर्घकाळ तरूण दिसायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध अन्नाचा समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक तर राहिलच. यासोबतच तुमचे केसही काळे होतात. म्हणूनच संत्री, गोड चुना, डाळिंब आणि सफरचंद इत्यादी रोज खावे.

लाल सिमला मिरची (Red Capsicum) :

लाल सिमला मिरचीत ॲण्टिऑक्सिडण्ट्सचं प्रमाण भरपूर असतं. यात क जीवनसत्वाचं प्रमाण भरपूर असल्यानं कोलॅजनची निर्मिती वाढण्यास मदत होते.  लाल सिमला मिरचीतील कॅरोटेनाॅइडस या ॲण्टिऑक्सिडण्टमुळे त्वचेचं सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होतं. तसेच लाल सिमला मिरची दाह आणि सूजविरोधी गुणधर्म असल्यानं चेहेऱ्यावर सूज येत नाही.  लाल सिमला मिरचीचा समावेश कच्च्या स्वरुपात सॅलेडमध्ये करता येतो तसेच केवळ परतलेली भाजीही छान लागते.

ब्रोकोली (Broccoli) :

ब्रोकोलीमध्ये सूज आणि दाहविरोधी गुणधर्म असतात. क आणि के जीवनसत्वं, ॲण्टिऑक्सिडण्टस , फायबर, फोलेट, ल्युटिन, कॅल्शियम हे घटकही असतात. ब्रोकोलीमधील क जीवनसत्वामुळे कोलॅजन या त्वचेसाठी महत्वाच्या असलेल्या प्रथिनांची निर्मिती होण्यास चालना मिळते. त्वचेची लवचिकता वाढते. ब्रोकोली कच्च्या स्वरुपात सॅलेडमध्ये किंवा थोडी शिजवून  परतलेल्या भाजीच्या स्वरुपात खाता येते. 

पालक (Spinach vegetable) :

पालकामध्ये पाण्याचं प्रमाण आणि ॲण्टिऑक्सिडण्ट्सचं प्रमाण जास्त असतं. पालकामधील घटकांमुळे शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो. पालकामध्ये अ. क, ई आणि के ही जीवनसत्वं, मॅग्नेशियम, लोह, ल्युटेन हे महत्वाचे घटक असतात. पालकाच्या भाजीतील क जीवनसत्वामुळे कोलॅजनची निर्मिती वाढते. यामुळे त्वचा घट्ट आणि मऊ होते. पालकाच्या भाजीतील अ जीवनसत्वामुळे केसही मजबूत होतात. के जीवनसत्वामुळे पेशींचा दाह टळतो. स्मूदी, सॅलेड, पातळ/ कोरडी भाजी या स्वरुपात पालक खाता येतो. 

सुकामेवा (Dry Fruits) :

सुकामेव्यात त्वचेसाठी विशेषत: बदाम खाण्याला महत्व आहे. बदामात त्वचेतील पेशी दुरुस्त करणारे, त्वचेला पुरेशी आर्द्रता पुरवणारे आणि त्वचेचं सूर्याच्या घातक किरणांपासून संरक्षण करणारे ई जीवनसत्वं जास्त असत. तर आक्रोडमध्ये सूज आणि दाह विरोधी घटक, ओमेगा 3 फॅटी ॲसिड यांचं प्रमाण जास्त असतं. त्याचा उपयोग पेशी मजबूत होण्यासाठी, सूर्याच्या अति नील किरणांपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी, त्वचेतील नैसर्गिक तेलाचा समतोल साधून त्वचेवर चमक येण्यासाठी होतो.

स्ट्रेसपासून दूर रहा (Live Stressfree):

जर तुम्ही जीवनात सकारात्मक विचार ठेवला तर तुमचे आरोग्यही चांगले राहते कारण तुम्ही कोणत्याही प्रकारचा ताण घेतला तर त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावरही दिसू लागतो. यामुळे तुम्ही तुमच्या वयाच्या आधी म्हातारे दिसता. म्हणूनच आपण नेहमी तणाव घेणे टाळले पाहिजे.