Skin Care Tips : होळीच्या रंगांनी चेहऱ्याची वाट लावलीय?आंबा हळद लावा अन् चमत्कार पहा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

skin care tips

Skin Care Tips : होळीच्या रंगांनी चेहऱ्याची वाट लावलीय?आंबा हळद लावा अन् चमत्कार पहा!

सर्वांनाच आवडणारी होळी नव्या रंगांची उधळण करत तूमच्या आयुष्यात येते. त्यामूळे प्रत्येकजण होळीची आतुरतेने वाट पाहत असतात. होळी दिवशी उत्साहात कलर फेस्टीव्हलचे आयोजन केले जाते. त्यामूळे या फेस्टीव्हलमध्ये तरूण, तरूणी हजेरी लावतात. पण, खरा प्रॉब्लम तर होळीनंतर सुरू होतो.

हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरूवात झाली की चेहरा रूक्ष होणे, सतत खास होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. होळीसाठी वापरले जाणारे रंग नैसर्गिक असले तरीही अतिप्रमाणात वापरल्याने चेहरा डॅमेज होतो. अशावेळी चेहऱ्यावर अनेक प्रयोग केले जातात.

महागड्या फेस क्रीम्स, पार्लर ट्रिटमेंट यामूळे चेहरा अधिकच निस्तेज आणि रूक्ष होतो. रूक्ष चेहऱ्याला ठिक करायचं असेल तर आपल्या जवळपास असलेली एक वस्तू फायदेशीर ठरते. ती म्हणजे अंबे हळद.

अंबा हळद,साय आणि गुलाबजल

अंबे हळदीपासून एक खास मास्क बनवता येतो. जो चेहऱ्याच्या अनेक समस्यांपासून तूमच्या चेहऱ्याचे रक्षण करतात. हा मास्क बनवण्यासाठी अर्धा टीस्पून अंबा हळद आणि एक टेबलस्पून साय, चार थेंब गुलाब पाणी एकत्र करा. तयार मिश्रण एकजीव करून चेहऱ्याला लावा. दहा मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

टोमॅटो, अंबा हळद आणि दही

चेहरा टॅन झाला असेल तर त्यावर दही आणि अंबेहळदीचा हा मास्क उपयोगी पडू शकतो. हा फेस मास्क बनवण्यासाठी अंबे हळद पावडर, टोमॅटो प्युरी आणि थोडे दही घ्या. ते चांगले मिक्स करून घ्या. मास्क लावण्याआधी चेहरा स्वच्छ धुवा आणि हा मास्क चेहऱ्यावर लावा. १५ मिनीटांनी चेहरा धुवून घ्या.