न्याहारीकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने होतात ‘हे’ दुष्परिणाम!

Skipping breakfast can have these health effects
Skipping breakfast can have these health effectsSkipping breakfast can have these health effects

न्याहारी (breakfast) हा सर्वांत महत्त्वाचा आहार मानला जातो. न्याहारी (breakfast) हे दिवसाचे पहिले जेवण असल्याने वारंवार टाळायला नको. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा न्याहारी करण्याचे राहून जाते. कामावर जाण्याची घाई किंवा दुसऱ्या अन्न कारणामुळे असे घडत असते. असे झाले तर व्यक्ती नंतर जास्त प्रमाणात खातो. यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा होतात. ज्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. (Skipping breakfast can have these health effects)

कधी कधी उशिरा उठल्यानंतर आपल्यायाल काही खावेसे वाटत नाही. असे केल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे वजन वाढणे (Weight gain), अन्नाची लालसा वाढणे, मंद चयापचय (Poor nutrition), ठरावीक कालावधीत प्रतिकारशक्ती कमी होते आदी समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अभ्यासकांनी न्याहारी वगळण्याचा संबंध उच्च पातळीच्या मृत्यू आणि कोलेस्टेरॉलच्या पातळीशी जोडला आहे.

नियमित न्याहारी खाणाऱ्यांची संज्ञानात्मक कार्यक्षमता, शैक्षणिक कामगिरी, अन्नाची लालसा कमी होणे, तृप्तता सुधारणे यासह इतर गोष्टी चांगल्या असतात. फिजियोलॉजी ॲण्ड बिहेवियरमध्ये प्रकाशित झालेल्या २०१५ च्या अभ्यासात असे आढळून आले की, नाश्ता न केल्याने शरीरात फ्री कॉर्टिसोलची एकाग्रता वाढू शकते, असे डॉ. आशित भगवती, मानद सल्लागार इन इंटरनल मेडिसिन आणि मानद शैक्षणिक संचालक आयसीयू, भाटिया हॉस्पिटल मुंबई यांनी स्पष्ट केले आहे.

Skipping breakfast can have these health effects
टिळा लावला म्हणून अल्पवयीन विद्यार्थिनीला मारहाण; शाळेतील प्रकार

वजन वाढते

शरीर आधीच रात्रभर उपाशी असल्याने न्याहारी टाळल्याने शर्करायुक्त आणि चरबीयुक्त अन्नाची इच्छा करू लागेल. तेव्हा दिवसाचे पहिले जेवण वगळल्याने शरीर साखरयुक्त, चरबीयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा करेल. हे तीव्र भूक देखील निर्माण करेल. यामुळे चयापचय दर कमी होईल. ही भूक फक्त जेवणाच्या वेळी जास्त खाण्यास प्रवृत्त करेल. त्यामुळे पुढे लठ्ठपणा आणि वजन (Weight gain) वाढते.

उच्च रक्तदाब, डोकेदुखी व चक्कर

नाश्ता (breakfast) न केल्याने मायग्रेन, डोकेदुखी किंवा चक्कर येऊ शकते. कारण, शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हायपोग्लाइसेमिया देखील होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीच्या रक्तदाबात अचानक वाढ देखील दिसू शकते. ज्यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेन होतो.

मंद चयापचय

चयापचय हा मुख्य घटक आहे. जो शरीराला आवश्यक ऊर्जा देतो. सकाळी न्याहारी न केल्याने चयापचय दरावर परिणाम होतो. जो कमी दराने चालेल आणि कमी ऊर्जा निर्माण करेल. ​​जास्त वेळ न खाल्ल्याने शरीरातील कॅलरी जाळण्याची क्षमता कमी होते. ज्यामुळे चरबी जमा होते.

खराब पोषण

न्याहारी न केल्याने आपण शरीराला आवश्यक पोषक तत्त्वांपासून वंचित ठेवता. कारण, नाश्ता वगळल्याने शरीरात पोषक तत्त्वांची अपुरी मात्रा होऊ शकते.

Skipping breakfast can have these health effects
कोरोना XE चा रुग्ण आढळल्याने चिंता वाढली; वेगाने पसरणारा!

अनियंत्रित रक्तातील साखरेची पातळी

न्याहारी न केल्याने रक्तातील साखरेची पातळी प्रभावित होऊ शकते. तुम्हाला एकाच वेळी भूक आणि राग येऊ शकतो. वेळेवर जेवल्यावर चयापचय क्रिया जागृत होते आणि अधिक कॅलरी

जाळण्यास मदत होते.

कमी ऊर्जा

न्याहारी (breakfast) न केल्याने शरीराला ऊर्जा मिळत नाही. जी शरीराला आवश्यक असते.

कमी प्रतिकारशक्ती

जास्त वेळ उपवास केल्याने प्रतिकारशक्ती कमी होते. कारण, रोगप्रतिकारक शक्ती कमी करणाऱ्या पेशींना नुकसान होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com