इट्स स्मार्ट कीचन टाईम! जाणून घ्या काही सोप्या टीप्स

small-kitchen-
small-kitchen-

नागपूर : अलिकडे महिला स्मार्ट वर्क करतात. नोकरी-व्यवसाय सांभाळून घरही खूप छान सांभाळतात. मात्र नोकरी आणि घर अशी तारेवरची कसरत करताना त्यांना थोड्या स्मार्ट टीप्सची गरज असते.

मैदा, रवा आणि हरभरा डाळीच्या पिठा पासून बनणारे पदार्थ सगळ्यांनाच आवडतात. पण बंद पाकिटात असलेले हे पदार्थ उघडल्यावर काही दिवसातच खराब होऊ लागतात. काही दिवसातच यामध्ये कीटक किंवा आळ्या होऊ लागतात. यामुळे या गोष्टींचा साठा घरात कमीच करावा लागतो. 

काही सोपे मार्ग आहेत ते वापरून आपण या गोष्टी बऱ्याच काळ साठवून ठेवू शकतो.

* गव्हाचं पीठ खराब होऊ नये यासाठी पिठात कडुलिंबाची पाने ठेवून द्या. कडुलिंबाची पाने नसल्यास, आपण त्याचा ऐवजी तेजपान किंवा मोठी वेलची देखील वापरू शकता.

* रवा आणि गव्हाचा सांजा सुरक्षित ठेवण्यासाठी कढईत भाजून घ्या आणि थंड झाल्यावर यामध्ये ८ ते १० वेलची घालून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवून द्या. असे केल्यास कीटक आणि अळ्या होणार नाहीत.

* मैद्याला आणि हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाला पटकन किडे लागतात. कीड लागू नये यासाठी हरभराच्या डाळीचे पीठ आणि मैदा एका डब्यात ठेवून त्यामध्ये मोठी वेलची टाकून द्या. या मुळे किडे लागणार नाही.

* तांदुळाला आद्रता आणि बारीक किडे लागण्यापासून वाचविण्यासाठी १० किलो तांदुळात ५० ग्रॅम पुदिन्याची पाने घालून ठेवा, या मुळे तांदुळात किडे होणार नाही.

* बदलत्या हंगामात हरभरे किंवा डाळीला कीड लागते या पासून वाचण्यासाठी डाळी आणि हरभऱ्यात कोरडी हळद किंवा हळकुंड आणि कडुलिंबाची पाने घालून ठेवू शकता. या मुळे किडे होणार नाही.

* साखर आणि मीठ ओलसर होऊ नये यासाठी काचेच्या डब्यात किंवा बरणीत ठेवावं. आपण साखरेच्या आणि मिठाच्या डब्यात थोडे तांदूळ देखील ठेवू शकता.

* फ्रिजला वास येत असल्यास त्यात लिंबाची फोड ठेवा.

* कपावरचे चहा किंवा कॉफीचे डाग काढण्यासाठी त्यात कोणता ही प्रकारचा सोडा भरून 3 तास तसेच ठेवा.

* हिरव्या मिरच्या चिरल्यावर बोटांची आग होत असेल तर बोटं साखर मिश्रित थंड दुधाच्या भांड्यात ठेवावी.
* चीझ किसल्यानंतर किसणी स्वच्छ करण्यासाठी त्यावरून बटाटा किसून घ्या, याइमुळे किसणीच्या छिद्रातून साठलेले चीझ स्वच्छ होईल.

* लादीवर अंड पडल्यास, त्यावर मीठ भुरभुरून काही वेळ तसेच ठेवा. मग त्याला पेपर किंवा टॉवेलने पुसून काढा, अंड सहजपणे स्वच्छ होणार.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com