
Summer Hair Oil : उन्हाळ्यात घामाने चिंब झालेल्या केसांनाही Cool करतील असे खास Hair Oil ; नक्की ट्राय करा!
Summer Hair Oil : उन्हाळ्यात केसांची विशेष काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळी हेअर केअर प्रोडक्ट्स वापरतात. निरोगी केसांसाठी तेल लावणे हा दिनक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषत: उन्हाळ्यात केसांसाठी योग्य तेल वापरणे महत्त्वाचे ठरते. केसांना चांगले पोषण मिळण्यासाठी आपण वेगवेगळ्या नैसर्गिक तेलांचा वापर करू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यातही केस मऊ रेशमी राहण्यास मदत होते.
उन्हाळा तुम्हाला थकवा तर देतोच. पण काही वेळा तणाव वाढवण्याचंही काम करतो. याशिवाय घाम आल्याने तुमचे केस लवकर तेलकट होतात. अशावेळी केसांसाठी थंड तेलाचा वापर करावा. तथापि, या तेलांची खास गोष्ट म्हणजे ते केवळ केसांसाठीच फायदेशीर नाहीत तर ते डोकेदुखी कमी करतात आणि मज्जातंतूंना आराम देतात.
वातावरणात उष्णता वाढू लागली आहे आणि त्याचा परिणाम डायरेक्ट होतोय तो केसांवर. केस चिकट होऊन त्यात खाज, दुर्गंध या गोष्टी जाणवू लागल्या असतील तर वेळीच तुम्ही केसांची काळजी घ्यायला सुरूवात करा. कारण आज केस धुतले तरीही घामामुळे दुसऱ्या दिवशीपर्यंत केसांची वाट लागणारच. (Hair Care Tips)
उन्हाळ्यात कोणते तेल लावावे
पेपरमिंट तेल
उन्हाळ्यात पेपरमिंट ऑईल लावल्यास केवळ केसांसाठीच फायदा होत नाही, तर यामुळे रक्ताभिसरणही वेगवान होते. याशिवाय अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल हे दोन पदार्थ टाळू स्वच्छ करून केस वाढण्यास मदत करतात.
कापूर आणि लवंग तेल
कापूर आणि लवंग तेल केसांसह आपल्या मज्जातंतूंना शांत करण्यास देखील मदत करते. याशिवाय हे तेल डोकेदुखी कमी करते आणि न्यूरॉन्स शांत करते जेणेकरून आपल्याला बरे वाटेल. हे तेल तुम्ही स्वत: ही तयार करू शकता. यासाठी तुम्ही कोणत्याही तेलात लवंग आणि कापूर शिजवा. त्यानंतर ते केसांना लावून मसाज करा.
नीलगिरी तेल
डोकेदुखी आणि तणाव कमी करण्यासाठी निलगिरीचे तेल उपयुक्त आहे. याशिवाय हे तेल मज्जातंतूंना शांत करते आणि आपल्याला बरे वाटते. त्यामुळे निलगिरीचे तेल घेऊन केसांना लावा. हे टाळू स्वच्छ करण्यास आणि कोंडा आणि टाळूचे संक्रमण कमी करण्यास उपयुक्त आहे.
बदामाचे तेल
व्हिटॅमिन ई च्या गुणधर्मांनी समृद्ध बदाम तेल केसांसाठी उत्कृष्ट क्लींजिंग एजंट आहे. केसांमधील घाण साफ करण्यास आणि त्यांना पोषण देण्यास फायदेशीर तेल आहे. दुसरीकडे केसांच्या वाढीसाठी बदामाचे तेल खूप प्रभावी आहे.
एवोकॅडो तेल
एवोकॅडो तेल जीवनसत्त्वे ए, बी, डी आणि व्हिटॅमिन ई तसेच लोह, अमीनो अॅसिड आणि फॉलिक अॅसिडचा चांगला स्रोत मानला जातो. जे केसांचे उन्हापासून संरक्षण करून नैसर्गिक कंडिशनरचे काम करते. एवोकॅडो हेअर ऑइल नियमित लावल्याने केस रेशमी, चमकदार आणि मजबूत होतात.
खोबरेल तेल
त्वचेला ओलावा देण्यापासून ते केस निरोगी राहण्यासाठी खोबरेल तेल फायदेशीर आहे. आपल्याकडे जवळजवळ प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या हे तेल वापरतो. कारण उन्हाळ्यात खोबरेल तेल लावणे खूप फायदेशीर आहे. खोबरेल तेलाच्या कूलिंग इफेक्टमुळे केसांचे उष्णतेपासून संरक्षण होते. यासोबतच केस गळणे, कोंडा आणि कोरडेपणाची समस्याही कमी होते.
जोजोबा तेल
जोजोबा तेल कोरड्या, निर्जीव आणि खराब झालेल्या केसांसाठी सर्वोत्तम उपाय आहे. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म केसांच्या सर्व समस्या कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. विशेष म्हणजे जोजोबा तेलामुळे केस चिकट दिसत नाहीत.
उन्हाळ्यात केसांच्या बाबतील होणाऱ्या या चुका टाळा
स्कार्फने डोक्याचे संरक्षण करा
हेअर सनस्क्रीन स्प्रे वापरा
हॉट स्टाइलिंग टूल्स वापरणे टाळा
केस कमी वेळा धुवा
सल्फेट फ्री शॅम्पू वापरा
लीव्ह-इन कंडीशनर लावा
केस घट्ट बांधू नका
कोरड्या केसांनी पोहणे टाळा
पोहल्यानंतर केस थंड पाण्याने धुवा