Summer Tips : उन्हात निघताच तुम्हाला चक्कर येते काय? हे लक्षण इग्नोन करू नका, नाहीतर...l summer health care cause of dizziness in sunlight know home remedies | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Summer Tips

Summer Tips : उन्हात निघताच तुम्हाला चक्कर येते काय? हे लक्षण इग्नोन करू नका, नाहीतर...

Summer Tips : उन्हाळ्यात उन्हात बाहेर पडणे एखाद्या समस्येपेक्षा कमी नाही. वाढत्या तापमानामुळे घाम येणे, उष्णता आणि चक्कर येणे यासारख्या समस्या सुरू होतात. अनेकवेळा जास्त वेळ उन्हात राहिल्याने अनेकजण बेशुद्ध पडतात.

जर तुमच्यासोबतही असे घडत असेल तर आम्ही तुम्हाला या लेखात त्याबद्दल सविस्तर सांगत आहोत. खरे तर जास्त वेळ उन्हात राहिल्याने अनेकांना त्रास होऊ शकतो. घाम येतो. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. पाण्याच्या कमतरतेने तुम्हाला चक्कर येऊ शकते. याशिवाय रक्तदाब कमी झाल्यामुळेही चक्कर येते. तेव्हा वेळीच व्हा सावध.

उन्हात चक्कर का येते?

सामान्यत: चक्कर येण्याची समस्या अशा लोकांमध्ये जास्त दिसून येते ज्यांना उन्हाळ्यात खूप घाम येतो. कडक उन्हात बाहेर पडताना डोक्यात जडपणा जाणवतो. असे यासाठी घडते कारण घामासोबत मीठ आणि आर्द्रता देखील शरीरातून बाहेर पडते. याशिवाय उन्हाळ्यात उष्माघातामुळे चक्कर येण्याची समस्याही उद्भवू शकते. अनेक वेळा नीट जेवण करून घराबाहेर पडत नाही, त्यामुळे रक्तदाब कमी होण्याची तक्रार असते आणि या स्थितीतही चक्कर येते.

Summer Tips

Summer Tips

उन्हाच्या समस्येपासून बचाव कसा करायचा?

हलक्या रंगाचे कपडे घाला. गडद रंग उष्णता शोषून घेतात ज्यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते.

उन्हात बाहेर पडण्यापूर्वी सन हॅट घाला. सूर्याची किरणे डोक्यापासून आणि चेहऱ्यापासून दूर ठेवल्याने शरीराचे तापमान नियंत्रणात राहते.

जेव्हा तुम्ही उन्हात बाहेर जाल तेव्हा थोड्या वेळाने पाणी पिऊन स्वतःला हायड्रेट ठेवा. उन्हात बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवा.

चक्कर आल्यास सर्वप्रथम थंड जागी बसावे.

थंड पाण्याने चेहरा धुवा आणि शक्य असल्यास लगेच लिंबू पाणी प्या. (Health)

उन्हाळ्यात अशी घ्या स्वतःची काळजी

उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवा. शरीराला दररोज 8 ते 10 ग्लास पाण्याची गरज असते. दिवसभर पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

याशिवाय या समस्येवर मात करण्यासाठी रोज मूठभर बदाम खा. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि ई मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे चक्कर येण्याची समस्या दूर होते.

घराबाहेर पडताना चहा किंवा कॉफीचे सेवन करण्याऐवजी हर्बल चहाचे सेवन केल्याने चक्कर टाळता येते. (Summer)

ताज्या फळांचा रस पिणे देखील खूप फायदेशीर आहे दररोज सकाळी ताज्या फळांचा रस प्या.