Lemon Peel Use : उन्हाळ्यात लिंबू वापरताना साल फेकू नका, असा करा वापर; वाचा टू इन वन उपाय l summer special lemon peels skin and home cleaning benefits know 2 in 1 use | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lemon Peel Use

Lemon Peel Use : उन्हाळ्यात लिंबू वापरताना साल फेकू नका, असा करा वापर; वाचा टू इन वन उपाय

Lemon Use : उन्हाळ्यात गरम होत असल्याने लिंबू पाणी सगळ्यात जास्त पिण्यात येतं. जागोजागी तुम्हाला लिंबू पाण्याचे स्टॉल लागलेले दिसतील. मात्र लिंबाचा रस काढून उरलेलं साल बरेच लोक फेकून देतात. कारण अनेकांना लिंबाची साल देखील फार फायद्याची आहे हे माहिती नसते. चला तर लिंबाच्या सालीचा कसा उपयोग करायचा ते जाणून घेऊया. ज्याने तुमचं घर सुद्धा चकाचक दिसेल आणि चेहऱ्यावरचे पिंपल्स आणि डागसुद्धा घालवता येईल.

घरातील मुंग्या घालवण्यास उपयोगी

तुमच्या घरात जिथे मुंग्या लागल्या आहेत त्या ठिकाणी लिंबाची साल ठेवा. लिंबाच्या वासाने मुंग्या दूर पळतील.

दाग धब्बे घालवण्यातही उपयोगी

तुमच्या घरी असलेल्या कपाला डाग लागले असतील तर त्याला साफ करण्यासाठी त्यात पाणी घाला आणि त्यात लिंबाची साल टाकून ठेवा. एक तासानी कप धुवून घ्या. कपला लागलेले सगळे डाग निघून जातील.

मायक्रोवेवसुद्धा चमकवू शकता

एका बाउलमध्ये पाणी घ्या आणि त्यात लिंबाचे साल टाका. त्यानंत हे बाउल मायक्रोवेवमध्ये गरम होण्यासाठी ठेवा. या बाउलमधील पाण्याची वाफ मायक्रोवेवच्या संपूर्ण कोपऱ्यांत पसरेल.त्यानंतर एका साफ कपड्याने मायक्रोवेव साफ करून घ्या. मायक्रोवेव अगदी नवीन दिसेल.

त्वेचेचा निखार वाढवण्यासही उपयोगी

ब्लीचिंग एजंट्स लिंबू सोलून त्याची साल तुम्ही त्वचेच्या गडद भागावर लावू शकता. लिंबू त्वचेवर क्लिनरसारखे काम करते. यासाठी, आपण लिंबूची सोलून घ्या आणि आपल्या कोपर आणि टाचवर घासा. हे आपली मृत त्वचा सहजपणे काढून टाकेल, ज्यामुळे आपला चेहरा तसेच त्वचा अगदी ताजी दिसेल.

लिंबाचेसुद्धा बरेच फायदेदायी उपाय आहेत. तुम्ही चण्याच्या डाळीच्या पिठात लिंबाचा रस घालून त्याचा फेसपॅक चेहऱ्याला लावू शकता. त्याने तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल. चेहऱ्यावरील सगळं टॅनिंग निघून जाइल.