रविवारी करा 'या' गोष्टी आणि आठवडाभर रहा निश्चिंत !

वृत्तसंस्था
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

प्रत्येक रविवारी तुम्ही अशाप्रकारे नियोजन करुन आठवडाभर निश्चिंत राहू शकता. वाचा रविवारी कोणत्या गोष्टी केल्याने पुढच्या सहा दिवसांचे नियोजन सुरळीतपणे होऊ शकते. 

मुंबई : रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस! आठवडाभर काम केल्यावर रविवार हा फक्त विश्रांती घेण्यात जातो. हाच सनडे आरामात काढल्यावर मात्र पुन्हा धावपळीचा सोमवार उजाडतो आणि मग वेळ घड्याळ्याच्या काट्यावर पळू लागते. मग राहिलेली कामं तशीच राहतात आणि आठवडाभर त्या कामांचा ताण आपल्यावर येतोच. मग रविवारचा दिवस आरामासह तुम्ही कशाप्रकारे प्लान करु शकता हे या स्टोरीमधून जाणून घ्या. प्रत्येक रविवारी तुम्ही अशाप्रकारे नियोजन करुन आठवडाभर निश्चिंत राहू शकता. वाचा रविवारी कोणत्या गोष्टी केल्याने पुढच्या सहा दिवसांचे नियोजन सुरळीतपणे होऊ शकते. 

Image may contain: coffee cup, coffee and drink
1. टू-डू लिस्ट करा 
टू-डू लिस्ट म्हणजे तुम्हाला जी कामे किंवा गोष्टी करायचा आहेत त्यांची लिस्ट. आजच्या डिजिटलच्या जमान्यात डायरीमध्ये गोष्टी लिहिणे म्हणजे रटाळवाणं काम आहे. तुमच्या हातात असलेलं स्मार्ट डिवाइज म्हणजे सेलफोन तुम्हाला या गोष्टीमध्ये मदत करु शकेल. तुमच्या फोनमध्ये 'टू-डू लिस्ट' चा पर्याय उपलब्ध असेल. यामध्ये तुम्ही रोजच्या कामांची लिस्ट तारखेनुसार करु शकता. एवढच काय तर महत्त्त्वाच्या कामांना रिमाइंडर लावून ठेवू शकता. रविवारच्या दिवशी तुम्ही निवांत बसून ठरवा आठवड्यात नक्की कोणती कामे करायची आहेत. शॉपिंग, महत्त्त्वाचे इव्हेंट, कार्यक्रम, मिटिंग, बॅंकेची कामे अशाप्रकारच्या कामांची तारखेनुसार नोंद करुन ठेवा. जेणेकरुन कोणतेही काम न विसरता वेळेवर पार पडण्यास मदत होईल. 

Image may contain: food
2. आठवडाभराचा मेन्यू ठरवा 
ऑफिसला जायची वेळ आणि ऑफिसवर पोहोचण्यासाठी करायचा प्रवास यासर्व धापवळीमध्ये दुर्लक्ष होते ते दैनंदिन आहारावर. आजच्या शर्यतीच्या युगामध्ये प्रत्येक जण फक्त कामाच्या मागे व्यस्त आहे. अशामध्ये रोज खाण्यासाठी काय बनववायचे अशा प्रश्न पडणे साहजिकच आहे. रोजच्या कामाच्या गडबडीत खास तयारी करणेही शक्य होत नाही. अशासाठी रविवारीच तुम्ही आठवड्याचा 'डाए प्लान' तयार करु शकता. रोज वेगवेगळ्या खाण्याचे, पदार्थांचे, भाज्यांचे किंवा हेल्थी रेसिपिजचे नियोजन करा. सध्या इंटरनेटवर झटपट तयार करण्याच्या रेसिपिजची माहिती सहज उपलब्ध होते. त्याप्रमाणे रोजच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायचा हे ठरवा. 
आवश्यक असणारे साहित्य, इतर गोष्टी रविवारीच आणून ठेवा. वेळेची बचत आणि आठवडाभर आरोग्याला पोषक असणाऱ्या गोष्टींचा समावेश तुमच्या आहारात होइल.

No photo description available.
3. कपाट आवरा 
कामाच्या व्यापात रोज साफसफाई करणे शक्य होत नाही. जितकी वेळेची तुम्ही बडत कराल तितका वेळ तुम्ही स्वत: ला, परिवाराला आणि इतर कामांना देऊ शकता. त्याची सुरुवात तुमच्या कपाटापासून होते. कपड्यांची व्यवस्था करा. ऑफिसच्या कपड्यांची आणि रोजच्या कपड्यांची वेगळी व्यवस्था करा. जेणेकरुन शोधण्याचा वेळही वाचेल आणि तुमचे कपाट मेन्टेन राहण्यास मदत होईल.  रोज आवश्यक असणाऱ्या गोष्टींची जागा तयार करा. 

Image may contain: 1 person, smiling, sitting and indoor
4. वेळ द्या स्वता: ला
कामाच्या व्यापातून दुर्लक्ष होते ते आवडीच्या गोष्टींकडे आणि छंदाकडे. प्रत्येक व्यरक्तीमध्ये एखादा तरी छंद असतोच. त्यामधून त्याला आनंदही मिळतो आणि नवीव गोष्टी करण्यास उर्जाही मिळते. कामाच्या वेळेत शक्य नसलेल्या गोष्टी रविवारी करा. वेगवेगळे खेळ, स्विमिंग, क्लबला जाणे, डान्स क्लास, गाणे, सिनेमे पाहणे, पुस्तक वाचणे अशाप्रकारचे मनोरंजनाचे पर्याय आहेत. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होते. आनंदी मनामुळे इतर दिवशी काम करण्यासाठी उर्जा मिऴते. तुम्ही मनाने प्रसन्न असाल तर तुमचे स्वास्थही निरोगी राहण्यास मदत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunday tips do these things to keep yourself tension free on the week days